सांग कधी कळेल का?

Submitted by अजय चव्हाण on 23 July, 2019 - 05:38

सांग कधी कळेल का,
प्रेम माझ्या वेड्या मनातले..
आज तुला शपथ घालते
शब्द माझ्या ओठातले...

शब्द शब्द एक होऊन
कविता तुझी मी व्हावे
त्या शब्दांना अर्थ मात्र सख्या तुझेच उरावे..
आज आले हे क्षण..
सांगण्या शब्द ह्रदयातले..
सांग कधी कळेल का
प्रेम माझ्या वेड्या मनातले...

तु मुक्त स्वप्नाची ही पहाट..
तुझीच ही बहरलेली वाट..
वाटेवरती साथ तुझी देशिल का?
जमलंच तर मिठीत मला घेशिल का?
ऐकू दे सुर मलाही तुझ्या स्पंदनातले..
सांग कधी कळेल का,
प्रेम माझ्या वेड्या मनातले

सांग कधी कळेल का
प्रेम माझ्या वेड्या मनातले..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कविता वाचताना " सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला" हेच गीत आतून ऐकू येत होते. हे गीत माझे फार आवडते आहे.

चक्रमपणा करतोय तर चक्रमच म्हणायचं. माझ्या आधीच्या नावावर एकानं आक्षेप घेतला म्हणून मी चक्रम झालो. काय सांगू कहाणी..

Nice