चला कवितेच्या गावा

Submitted by अनुजय on 22 July, 2019 - 15:42

चला कवितेच्या गावा

चला कवितेच्या गावा
शब्दात गुंफूनी शब्द
अनोख्या शब्दछटांंचे जग
शब्द माधुर्यातूनी अनुभवा
चला..
अमोल अनुभूतींचाआविष्कार
अनुप्रास आनंदाचा आधार
शब्दात मोजूनी मांडीत जावा
चला..
निखळ सौंदर्याचा खेळ
लावेल उपमेचे वेड
शब्दांनंद द्विगुणीत व्हावा
चला...
चालता वैगुण्य दिसता
जन पदोपदी बसता
शब्दातूनी व्रजाघात करावा
चला...
दिसैल चराऊ कुरणे
माजलेले दांभिकतेचे रण
शब्दातून सत्यबाण सोडावा
चला...
थोरामोठ्यांनी निर्मिले आदर्श
करुनी विचारांना स्पर्श
शब्द पुनरर्थाने सजवावा
चला..
नव कल्पनांचे साक्षात्कार
बना निर्मिचे साक्षीदार
शब्दांतून नवशब्द बनवावा
चला..
जिथे कुठे ना आधार
विचारांचा असे भडिमार
व्यक्तहोण्या मुक्तछंद वापरावा
चला..
रुचेना काही मनाला
सूचेना काही प्रतिभेला
शब्द नाचवूनी विद्रोह करावा
चला..,...
प्रा.महेश बि-हाडे

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users