Submitted by बेफ़िकीर on 22 July, 2019 - 11:15
स्फुट - तुझे आळसणे
=====
माझ्या मिठीत
तुझ्या आळसण्याची चव
दिवसेंदिवस
खारट होत चाललीय
ओशट होत चाललीय
तुझी चाल
सकाळच्या पावसाळी, कांगावखोर,
बोभाट्याच्या उन्हात
एक दिवस येईल
जेव्हा तू मी होऊन
आणि मी तू होऊन
ओलावे वाटत फिरू
नजीकच्या प्रत्येक ऋतूला
आणि मग ऋतूंचे सरोवर
किंचित खारट होईल
तुझ्याकाठी आळसून
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूप छान.
खूप छान.