पहिली भेट

Submitted by Yogita Maayboli on 22 July, 2019 - 06:35

पहिली भेट

तशी आमची भेट ठरवूनच झाली. पण घरच्यांना न कळविता. माझी बहीण त्याला एकमेव साक्षीदार. तसे हे स्थळ arrange marriage through आलेले. पण दोघांचे ही आईवडील गावी आणि आम्हाला भेटण्याची भलतीच घाई.
शेवटी मॉल मध्ये भेटण्याचे ठरले. कारण बाहेर कुठे भेटलो असतो तर कोणीतरी बघण्याची आणि उगाच गैरसमज होण्याची भीती जास्त.
भेटण्याचा दिवस उजाडला. त्या दिवशी मी स्वतःला १०० वेळा तरी आरशात बघितले असेल. किती सेल्फी घेतले त्याला काही मापच नाही. त्यातलाच एक त्याला सेंड केला. त्याच्याकडून हवा तो smiley आला. आणि मी भलतीच खुश झाली.

त्या W brand च्या कुर्ती आणि ब्लॅक जीन्स मध्ये मी भलतीच खुलली होती ते नंतर भेटल्यावर त्याने सांगितले. तो दिवस खूपच स्लो जात होता .लक्ष सर्व घड्याळाकडे कडे. कधी ५:३० वाजणार आणि मी निघणार. शेवटी वाजलेच. मी पटकन वॉशरूम मध्ये जाऊन थोडा touchup केला. त्याच्ये messages चालूच होते आणि ते वाचून मी गालात उगाचच हसत होती. मी भरभर खाली उतरली. त्या वेळेस माझे ऑफिस परेल मध्ये होते आणि मुंबई मला भलतीच जवळची त्यामुळे वातावरण माझ्या आनंदी मूड ला साथ देत होते.

तो भेळपुरी वाल्याच्या मागे जरा लपुनच माझी वाट बघत होता. पाहताक्षणी तो ओळखता नाही आला कारण ती आमची पहिलीच भेट. फोटोत बघितले होते पण फोटो खऱ्या चेहऱ्याला तितकासा न्याय देत नाही. त्याला पाह्ताक्षानी काळजाला धस झाले. एक गुलाबी झळकाळजाला लागली त्याच्या गुलाबी वर्णा सारखी. तोही थेट ऑफिस मधून आलेला ट्रेन ने प्रवास करून माझ्यासाठी खूप लांबून त्यामुळे तोही फॉर्मल attire मध्ये. खूप आवडला मला तो. मला हवा तसा.

फिकट कलर च्या शर्ट मध्ये तो भलताच उठून दिसत होता. त्याची मला साजिशी अशी height . सडपातळ बांधा आणि आणि स्मार्ट face. सगळंच कसे मला आवडणारे असे. आई खर बोलते मी बाह्यरुपावर भुलते. त्याने ही तशीच जादू केली.

आम्ही टॅक्सी मध्ये बसून मॉल मध्ये गेलो आणि मूवी बघायचे ठरले. मूवी फक्त निमित्त खरे तर आम्हाला बोलायचे होते. माझ्या favourite अक्षय कुमार चा मूवी. पण आज दुसराच अक्षय कुमार आला होता मला भेटायला. मॉल मध्ये फिरताना आम्ही खूप बोलो एकमेकांशी. जशी काही ती पहिली भेट नव्हतीच आधी पासूनच ओळखत होतो एकमेकांना . नकळतच त्याने हातात हात घेतला आणि मीही नकार दिला नाही. आम्ही हातात हात घेऊन theatre मध्ये आमच्या कॉर्नर सीट वर बसलो.
त्यादिवशी खूप बोललो आम्ही. arrange marriage ला लागणारी सर्व माहिती एकमेकांना विचारली आणि हो एकमेकांना जणू काही आपसूकच होकार दिला. घरच्यांना न विचाराता. आमची मने कधीच एकमेकांमध्ये अडकून गेली होती. आणि कधीच एकमेकांना साथीदार म्हणून निवडले होते. खूप काही बदलले होते या पाहिल्याभेटीमुळे.

योगी

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान.
काय बोलणं झालं, भविष्यातील स्वप्नं, आवडीनिवडी, करियर याविषयी लिहून लेख अजून खुलला असता. पहिल्या भेटीची अनामिक हुरहुर छान रंगवली आहे. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

सो रोमँटीक!
अजुन लिहा माझ्यासारख्यांना तेवढाच गाइडेंन्स मिळुन जाईल.