स्वप्न…!!!
स्वप्नांच्या दुनियेत स्वप्नांचे इमले ...
स्वप्नांच्या इमारती अन स्वप्नांचे बंगले ...!!
कधीही व्हा श्रीमंत
कधीही व्हा गरीब …!
आपल्याच हातात मेहनत अन
आपल्याच हातात नशीब …!!
क्षणात व्हा छोटे तर
कूस बदलताच मोठे ...!
अगदी सहज मिळतं इथे
कसलेच नाही तोटे ...!!
सगळचं चांगलं होतं इथे, वाईट होत नसतं ...!
जरी घडवलं मुद्दामून, तरी solution मात्र असतं ...!!
आईबाबा ताई दादा रुसत कधीच नाही..!
लग्न झालं तरी, घर कधीच तुटत नाही ...!!
प्रेम कधीही मिळवता येतं इथे, शेकडो युक्त्या लढवून ...!
दाखवताही येत ते, बरेच प्रसंग निर्माण करून ...!!
मित्रांसाठी जगता येत, अशक्य तेही करवून …!
ओठावर हसू येतं, तुटलेला मित्र सहज जोडून …!!
स्वप्नांच्या या मस्त दुनियेत सगळेच अमर असतात …!
किती काळ गेला तरी नाती कधी मरत नसतात ...!!
वय झालं तरीही स्वप्नं म्हातारी होत नाहीत ...!
सगळं मिळालं आयुष्यात तरी पोट काही भरत नाही …!!
स्वप्नं जरी पाहिली तरी त्यास पक्के ठाऊक असते …!
जगायची खरी मजा तर सत्यात अनुभवायची असते ...!!
शेवटचं कडवं जास्त आवडलं.
शेवटचं कडवं जास्त आवडलं.
मला तुमची कविता वाचताना सुचलेल्या काही ओळी.
स्वप्नांच्या पलिकडेही
एक सुंदर जग असतं.
ज्याचं नाव आयुष्य
अस असतं.
या आयुष्यात असतात;
रोजचे नवनवीन प्रवास.
त्यांना अनुभवण्यातच
मजा आहे खास.
हे अनुभवच आणतात,
जगण्यात खरी मिठास..
स्वप्नांच्या अलिकडेही कसे
स्वप्नांच्या अलिकडेही कसे वाटते
मन्या S ... छान सुचवलंत ...
मन्या S ... छान सुचवलंत ... continue करायचा प्रयत्न करतो . प्रतिसादासाठी आभार
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे ..
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे ... प्रतिसादासाठी आभार