इथे जोत दगडाचा अन वासा लोखंडाचा

Submitted by सिद्धेश्वर विला... on 12 July, 2019 - 05:38

इथे जोत दगडाचा अन वासा लोखंडाचा

गेला गेला तो जमाना विटेवर जगण्याचा

उभा पर्वत तो भात आणि मातीची आमटी

तरीही ढेकर तो नाही , अशी कशी हि भामटी ?

त्याला बसवून विटेवर , उभा तिथेच डाम्बला

कोंबला त्या राऊळात , माझ्या ईठूला कोंबला

लोक नादावती सारे , झेलुनी उनपाऊसवारे

मागे राहिला तो प्रपंच ,बायका अन पोरे

कधी भेटला का कुणा तो , गराड्यात बडव्यांच्या

फुका नाम ते श्रीहरी , गळ्या माळा त्या तुळशीच्या

पुण्य भेटत का कधी , घेऊनि विठूचे दर्शन

सोडूनि प्रपंच तो सारा , उगा देहाचे घर्षण

मी पहिला विठूला, आत मनमंदिरात

देव नाही तेथे जाणा , वसला चांगल्या कर्मात

जरी दिंडीस निघाला , वाटे पाहिला कोणाला

तरी सोडूनिया दिंडी , करा मदत तयाला

तोच मागतो मदत , घेतो परीक्षा आपली

मोजुनी कर्माची ती फळे देतो मोक्षाची सावली

{{इथे जोत दगडाचा अन वासा लोखंडाचा

गेला गेला तो जमाना विटेवर जगण्याचा

उभा पर्वत तो भात आणि मातीची आमटी

तरीही ढेकर तो नाही , अशी कशी हि भामटी ?

त्याला बसवून विटेवर , उभा तिथेच डाम्बला

कोंबला राऊळात , माझ्या ईठूला कोंबला

लोक नादावती सारे , झेलुनी उनपाऊसवारे

मागे राहिला तो प्रपंच ,बायका अन पोरे

कधी भेटला का कुणा तो , गराड्यात बडव्यांच्या

फुका नाम ते श्रीहरी , गळ्या माळा त्या तुळशीच्या

पुण्य भेटत का कधी , घेऊनि विठूचे दर्शन

सोडूनि प्रपंच तो सारा , उगा देहाचे घर्षण

मी पहिला विठूला, आत मनमंदिरात

देव नाही तेथे जाणा , वसला चांगल्या कर्मात

जरी दिंडीस निघाला , वाटे पाहिला कोणाला

तरी सोडूनिया दिंडी , करा मदत तयाला

तोच मागतो मदत , घेतो परीक्षा आपली

मोजुनी कर्माची ती फळे देतो मोक्षाची सावली

{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults