राजकारणात आता गांधी युग संपुन आता बराच कालावधी उलटून गेला ,सत्तेचा समाजसेवेसाठी वापर हे तत्त्व ही नेते विसरून गेले ,सत्तेसाठी पैसा आणि पैशासाठी सत्ता हे सुत्र आता राजकारणात रुढ झाले.आणि यातुनच सत्तेसाठी या पक्षातुन त्या पक्षात ऊडया मारनारी निती ,निष्टा नसलेली नेते मंडळी ऊदयास आली.एका पक्षाची उमेदवारी मीळवुन आमदार वा खासदार म्हणून निवडून यायचे आणि सत्ताधाऱ्यांनी मंत्रीपदाचे गाजर दाखवताच पक्ष आणि पदाचा राजीनामा देवून सत्ताधाऱ्यांच्या कळपात सामिल होउन मंत्रीपदाची वा आपल्या वारसदार असलेल्या पुढील पीढीची सोय लावायची हेआता सुरु झाले आहे. पक्षांतर बंदी कायद्याच्या कचाटयात सापडु नये म्हणुन यांनी हा नवा फंडा शोधून काढला आहे .पण त्या पक्षाच्या मतदारांचे काय ? त्यांनी तर पक्षाला मतदान केले होते त्यांची ही प्रतारणा नाही का. ? त्यासाठी पक्षातंर बंदी कायद्यात सुधारणा करणे गरजेच आहे एखादा ऊमेदवार ज्या पक्षाकडून निवडून आला त्याला त्याच्या पदाचा कालावधी संपेपर्यंत पक्ष बदलता येणार नाही अशी सुधारणा का करु नये
पक्षांतरबंदी कायद्यात सुधारणा करणे आता गरजेचे झाले आहे का ?
Submitted by ashokkabade67@g... on 11 July, 2019 - 11:17
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा