मराठी शब्दचा अर्थ

Submitted by मी-ज्योती on 11 July, 2019 - 04:16

आपली मराठी भाषा विविध अलंकार,म्हणी,शब्द, वाक्यप्रचार इत्यादीने नटलेली आहे. कधी कधी असे काही शव्द असतात कि त्याचे नेमके अर्थ आपणाला कळत नाहीत...जसे कानडा (कानडा राजा पंढरीचा ) म्हणजे काय , राजहंस माहित आहे पण मग परमहंस (रामकृष्ण परमहंस) या शब्दचा अर्थ काय, बिलोरी या शब्दचा अर्थ मोठा तर कोणी नक्षीकाम केलेला असे सांगितला होता तर त्याचा नेमका अर्थ काय आहे
व अश्या शब्दाचे नेमके अर्थ कळतील अशी कोणती साईट आहे का...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुक्तीकडे जातानाची एक अवस्था परमहंस आहे हे वाचले होते. तुरिया अवस्था, अजून काही आहेत. बहुतेक मुमुक्षू, साधक वगैरे. परमहंस म्हणजे जीवनमुक्त अवस्था परमानंदाला प्राप्त झाल्याची असावी.
मलाही व्यामिश्र, व्यवच्छेदक वगैरे शब्द जड वाटतात व अर्थ लागलेला नाही.
काळाच्या ओघात बऱ्याच वस्तू रूप बदलतात, नष्ट होतात त्यामुळे त्यांची विशेषणं सुध्दा लुप्त होतात. बिलोरी आरसा हा आरशाचा जुन्या काळातील वेगळा / मौल्यवान प्रकार असू शकतो.