कसे जगावे

Submitted by राजेंद्र देवी on 6 July, 2019 - 00:16

कसे जगावे

एव्हढे का सुखासाठी मी झगडावे
आता दुःखही लागले मला आवडावे

रोज वाटत होते, नित्यनवे घडावे
का पण सतत फासे उलटे पडावे

घालत होतो नशिबाला सतत साकडे
नक्षत्रांचे होते साताजन्माचे वाकडे

कर्मच आले कामी, समजले कसे जगावे
पाय पसरण्यापुरते अंथरूण नसावे

राजेंद्र देवी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिली 3 कडवी नकारार्थी असून शेवटचे कडवे कर्मवादी अन ध्येयवादी आहेत, मला तरी ती योग्य वाटत आहेत. धन्यवाद