Submitted by राजेंद्र देवी on 3 July, 2019 - 11:13
हात तुझा हातात होता....
हात तुझा हातात होता
ऋतू पण ऐनभरात होता
लागली चाहूल वसंताची
कोकिळ पण स्वरात होता
हात तुझा हातात होता
जलमेघ अंबरात होता
बरसला मनभावन
श्रावण दारात होता
हात तुझा हातात होता
तळपता तारा ज्वरात होता
तुझ्या प्रेमाच्या सावलीत
जीव माझा स्थिरावत होता
हात तुझा हातात होता
काजवा तिमिरात होता
कळले ना कधी चंद्रमा
पश्चिमेच्या पदरात होता
हात तुझा हातात होता
ओठात अमृतानुभव होता
कळले ना कधी
समर्पणाचा ठहराव होता
राजेंद्र देवी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाह्ह! खुप सुंदर!!
वाह्ह! खुप सुंदर!!
धन्यवाद
धन्यवाद
खुप सुरेख,विलोभणीय.
खुप सुरेख,विलोभणीय.
धन्यवाद
धन्यवाद
खुप सुंदर ..
खुप सुंदर ..
धन्यवाद अजयजी
धन्यवाद अजयजी
सही जमलीये एकदम !!
सही जमलीये एकदम !!

हात तुझा हातात होता
काजवा तिमिरात होता
कळले ना कधी चंद्रमा
पश्चिमेच्या पदरात होता>> हे तर छानच
आधी मी चुकून "तुझ्या हातात काजवा होता" असं वाचलं
Anjali cool धन्यवाद
Anjali kool धन्यवाद
सुंदर...
सुंदर...
धन्यवाद शशांकजी
धन्यवाद शशांकजी
सुरेख
सुरेख
धन्यवाद डॉ विक्रांतजी
धन्यवाद डॉ विक्रांतजी