अमेरिकेतील मायबोलीकर

Submitted by झुलेलाल on 3 July, 2019 - 08:59

माझ्या मित्राची मुलगी उच्च शिक्षणासाठी पीटर्सबर्ग येथील कार्निगीमेलन युनिवर्सिटीत प्रवेश घेत आहे. या परिसरात कुणी मायबोलीकर मित्र असतील तर तिला काही प्राथमिक मदत लागलीच तर मिळेल का?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

तुमच्या मित्राचे, तिच्या मुलीचे अभिनंदन !

http://www.mmpgh.org/ ही पिट्सबर्ग मधल्या मराठी मंडळाची लिंक. कार्नेगी मेलन मधे , युनिव्हर्सिटी ऑफ पिट्सबर्ग मधे बरेच भारतीय विद्यार्थी / विद्यार्थिनी आहेत. तुमच्या मित्राच्या मुलीला फारशी अडचण येऊ नये.

अरे वा! कार्नेगी मेलन! अभिनंदन तुमच्या मित्राच्या मुलीचे. युनिवर्सिटीतल्या देशी विद्यार्थ्यांचे सपोर्ट ग्रूप असतात, ते पण मदत करतील.

वा छान! मित्राच्या मुलीचे अभिनंदन! काही वर्षांपूर्वी मला देखील कार्निगीमेलन मधून admit आले होते. काही कारणामुळे दुसरी युनिव्हर्सिटी निवडावी लागली. परंतु नो रिग्रेट्स! तुमच्या या धाग्याच्या निमित्ताने जुन्या आठवणी जाग्या झाल्या. असो.
मित्राच्या मुलीला www.edulix.com ला भेट द्यायला सांगा. तिथे युनिव्हर्सिटी/कॉलेज प्रमाणे भरपूर discussion ग्रुप्स आहेत. बरेच आजी माजी भारतीय विद्यार्थी तिथे मार्गदर्शन करीत असतात. तिथे तिला कॉलेज मधील अनेक मित्रमैत्रिणी भेटू शकतील ज्यांची गरज लागल्यास नक्की मदत होऊ शकेल.