सहवास तुझा नि माझा

Submitted by योगेश क्षिरसागर on 2 July, 2019 - 12:28

तुझं सवे क्षण घालवता
मन माझे हे उमलले ।
आनंदाने अन हर्षाने
ते काठोकाठ भरले ।।
दोन दिवसाचे ते क्षण
भरभरून मी जगले ।
भावनांचे ते भांडे
आज तृप्त जाहले ।।
नैराश्य, अधोगती
सर्व अलगद गळुनी पडाले ।
दोन दिवसांचे ते क्षण संपता
दुःख पुन्हा जाहले ।।
आता वाटते या जिवा
ते क्षण का दविले देवा ।
आठवण येताच पुन्हा
दुःख क्षणांत डोकावले।।

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users