Submitted by अत्रुप्त आत्मा on 2 July, 2019 - 03:45
कविता सुचत नाही
मन ही रितेच काही
लिहू काय? म्हणता म्हणता
सापडले ओले पान.
ही कविता पिंपळपान!
थेंब थेंबा जाग आली
रेष रेषा बोलू लागली
ना लिहिता आले कैसे
मज लेखणिस भान?
ही कविता पिंपळपान!
हे असेच असते सारे
ना सुचता हलते वारे
पाचोळा नसता कोठे
गर्द जागे होते रान
ही कविता पिंपळपान!
घरट्याच्या अवती भवती
पाऊस थेंबांची गर्दी
मी मिटून घेता दारे
पाऊस करी मूकगान
ही कविता पिंपळपान!
म्हटले या पावसाला
मन हळवे नकोच सोडू
भिजवूनि जा चिंब मनाला
मग लाभे पाऊस-दान
ही कविता पिंपळपान!
===×====×====×===×===
अतृप्त...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुंदर लिहिलीये!
सुंदर लिहिलीये!
आवडली कविता.
आवडली कविता.
मन्या,srd - धन्यवाद.
मन्या,srd - धन्यवाद.
छाने...
छाने...
आवडली
आवडली