गंभीर समस्या - मदत करा अर्जंट

Submitted by थॅनोस आपटे on 30 June, 2019 - 00:44

सध्या माझ्याकडे एक विचित्र प्रॉब्लेम झालेला आहे.

मंडळी इथे लोक स्क्रीनशॉट टाकतात. तर ते माझ्या कठीण तबकडीत आपोआपच साठवले जात आहेत. डिलीट करण्यासाठी म्हणून त्याच्यावर क्लिक केलं तर ते पिक्चर एडीटर मधे उघडतंय . समस्या ही आहे की हे स्क्रीनशॉट्स क्रॉप केलेले असतील तर क्रॉप टूलने त्या पुन्हा ताणून पूर्ववत करता येत आहेत. म्हणजे आपोआप होत आहे. त्यामुळे काय होतंय की क्रॉप करण्याआधी स्क्रीनशॉटमधला इतर मजकूरही वाचता येऊ लागला आहे.

स्क्रीनशॉट घेणार व्यक्ती ज्या आयडीने लॉगिन झालाय त्याच आयडीने स्क्रीनशॉट दिला तर प्रॉब्लेम नाही. पण इथे अनेकदा स्क्रीनशॉट घेतानाचा खाली लॉगिन आयडी वेगळा दिसतोय आणि पोस्ट करतानाचा आयडी वेगळा दिसतोय. हे असं ब-याच जणांच्या बाबतीत होतंय. ज्यांनी लॅपटॉपवरून स्क्रीनशॉट घेतले होते त्यांची पूर्ण स्क्रीनच वाचता येतेय. त्यात जीमेल ने लॉग इन झाल्याचा आयडी उजव्या कोप-यात आणि जेव्हढे टॅब उघडले तेव्हढे डाव्या कोप-यात. बाप्रे, काय काय पाहतात लोक ! शिव शिव !!

मी एक अत्यंत भोळा आणि बालमनाचा मनुष्य असून त्यावर हे सांस्कृतिक आघात सहन होत नाहीयेत. त्यामुळे हे कसं बंद करायचं कुणी सांगू शकेल का ? हे फार अर्जंट हवं आहे. कारण आता स्क्रीनशॉट एडीट करणे ही काळाची गरज झालेली आहे. जर हे बंद झाले तर ना रहेगा बास ना बजेगी बासुरी.

अजून एक याच प्रकारचा प्रॉब्लेम नुकताच सुरू झालेला आहे.
एखादा आयडी नवीन पोस्ट करतो किंवा कमेण्ट करतो तेव्हां त्या आयडीच्या नावावर कर्सर नेला की आल्सो लॉग्ड इन अ‍ॅज असं म्हणून बरीच नावे येत आहेत. दोन चार आयडी असे आहेत की ती लिस्ट पुढच्या पानांवर जातेय. त्यामुळे मला कमेण्ट वाचता येत नाहीत.

अ‍ॅडमिनची विपू मनोरंजक असते असे कळल्यावरून तिकडे गेलो तर आल्सो लॉग्ड इन अ‍ॅज समीर असे दिसते. त्यातली तारीख दोन वर्षांपूर्वीची आहे तर अ‍ॅडमिनची तीन महीन्यांपूर्वीची. वेबमास्टर हा एक ड्युआआयडी पाहिला. तो आल्सो लॉग्ड इन अ‍ॅज अजय असे दाखवतो. यांच्याही तारखा सहा महीन्यांपूर्वीच्या आहेत.

( हे रहस्य उघड केल्याबद्दल संबंधितांची क्षमा मागत आहे )

मला हे सर्व नको आहे. पण आता उपलब्ध असल्याने आपोआप कर्सर नावांवर जातो. अगदी भीतभीतच.. आणि अरे देवा !
जय ! मै तुम्हे क्या समझ रहा था और तुम क्या निकले .. असा डायलॉग सतत तोंडातून बाहेर पडतोय.

मंडळी हे सर्व बंद करायला मदत करा. यातच तुमचे सौख्य सामावलेले आहे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता “तो” धागा वाचला अन क्लिअर झालं Lol
-- कोणता धागा.
वेबमास्टर हे अजय गल्लेवाले आहेत. तेव्हा त्यांचे दोन आयडी असू शकतात. त्यात विशेष काही नाही.