राजस्थानच्या वाळवंटातून स्वार घोड्यावरून संथगतीने चालला होता.
त्याला कसलीच घाई नव्हती.
जेसलमेर अजून पाच सहा तासांच्या अंतरावर होतं
वाळवंटात दूर कुठे ना झुडूप, ना पाणी..
(एव्हढं मोठं वाळवंट ? लेखक बाबूराव झिंगले का ? - नाही नाही. कथेची गरज म्हणून सिनेमॅटिक लिबर्टी घेतली)
स्वाराला कशाचीच फिकीर नव्हती.
धुळीने भरलेल्या गावाची एक कमान दिसू लागली.
कथा ही अक्षरं अजून जीव टिकवून होती.
स्वाराने गावाच्या बाहेर घोडा थांबवला.
आतून एक उंच धिप्पाड पठाण आला,
त्याच्या हातात डबल बोअर ची रायफल होती. त्याने स्वाराचे आपादमस्तक निरीक्षण केले.
स्वाराचा चेहरा रापलेला आणि वेष अत्यंत गबाळा होता. दाढीची खुटं वाढलेली. कपडे कित्येक महीने धुतले नसावेत. चष्म्याला तडा गेला होता. धोतर वर चौकडीचा अंगरखा. त्यावर चामड्याचे जाकीट आणि त्याला पुंगळ्यांचा बेल्ट. डोईला राजस्थानी मुंडासं.
स्वाराला बघून पठाण हसू लागला.
" इन द विशसैनप्बोबिया ऑफ होल कंट्री इन बिटुमिनसओरॅकलिंगनास्ट्रानिअस सोसायटी, व्हू आर यू ?"
"फॅन्टाब्युलशिटीयन्स झेंडोफिकेशन टिंक्श्चरआयोडाइज्ड रिप्लाय.. माय नेम ईज "
" ओ पाव्हणं, हॉलीवूड नाही हे. मराठीत बोला "
" आरं पण वेस्टर्न स्टोरी म्हनल्यावर "
" भो"
" नीट बोला "
" भोळ्या माणसा, हे राजस्थान आहे आणि बाबूरावांना राजस्थानी आणि हिंदी येत नाही. तेव्हां ब-या बोलाने मराठीत बोलता कि नाही ?"
"इंग्रजी तरी कुठं येतंय ?"'
"कुणाला ?"
' हेच की आपल्याला !"
"आंग अश्शी "
"कुठं निघालासा ?"
" जेसलमेर ला"
" सांगलीचं दिसताय "
" कुठचं का असंना "
" जेसलमेरला काय काम काडलं ?"
" ते असं सांगता यायचं नाही "
" बरं राहीलं."
स्वार आता रिलॅक्स झाला होता.
त्याला खायला आणून दिलं गेलं. पाणी मिळालं
आता स्वाराला तरतरी आली. घोड्याला पाणी पाजून स्वाराने टाच दिली....
पुढच्याच क्षणाला भन्नाट वेगात घोडं दिसेनासं झालं.
गावकरी आ वासून स्वाराकडे बघत होते.
" अरे भ..."
' नीट बोला "
" भद्र लोकहो, घोड्याला काय चारलं ? मला न घेताच पळाला "
"अॅक्शन ५०० "
" म्हणजे ?"
"फॉर्म्युला अॅक्शन ५००. पाण्यात दिलं की घोडं ५०० च्या स्पीडने सलग ५ तास पळत सुटतंय"
" म्हणजे थेट जेसलमेरच ?"
" हो "
" अजून आहे का ?"
" काय ?"
" अॅक्शन ५००?"
" कशाला ?"
"आणा म्हणतो ना"
" ए अॅक्शन ५०० पाण्यातून एक लोटा "
" आता ?"
" झोपा..."
" का ?"
" घोड्याला उभ्या उभ्या एनिमा येतोय करायला. तुम्हाला झेपणार का ?"
स्वाराचे डोळे पांढरे व्हायच्या आत तो आडवा झाला आणि पुढच्याच क्षणी एक किंकाळी घुमली...
पाचच मिनिटात स्वार वा-याच्या वेगाने जेसमलेर कडे धावत होता.
गाव त्याच्याकडे आ वासून बघत होता.
जेसलमेरची वेस आली. घोडा थांबलेला होता,
स्वारही थांबला.
आता दोघेही हाफ हाफ करत धापा टाकत होते.
एक कळकट पोरगं विचारतं झालं
"पाणी पाहीजे का ?"
" अॅक्शन ५०० ?"
" काय ?"
" काही नाही . आण"
पुन्हा पाणी पिल्याने घोडा आणि स्वार दोघेही फ्रेश झाले.
स्वाराने पुन्हा घोड्याच्या पाठीवर आपली बैठक जमवली.
हेमन कर्णिकांच्या ब्लॅकस्टारप्रमाणे घोडा संथ लयीत जाऊ लागला...
आणि एका हॉटेलसमोर येऊन थांबला.
शान ए मायबोली !!
घोडा बोर्ड वाचून खिंकाळला...
धावत लॉजचा पो-या आला.
स्वाराकडे सामान असं नव्हतंच. पो-याने घोडा नेऊन बांधला...
स्वार पाय-या चढून दारात उभा राहिला
आणि गलका झाला
" बाबूराव आले , बाबूराव आले"
गल्ल्यावरचा मनुष्य हसत आला.
" या बाबूराव स्वागत आहे "
"बाबूराव आत्ता कुट्ट कुट्ट जायचं नाही" एल लाडीक सूचना आली.
" बाबूराव, बाबूराव"
खूप हाका वाढल्या....
तसा स्वार शुद्धीत आला.
"मै कहा हूं ?"
" तुम अपने शान ए मायबोलीमेच हो"
" मराठी बोला रे "
" मी इथं कसा आलो ?"
" कुत्री मागे लागल्यासारखे प़ळत येताना तुम्ही दिसला. आणि वेशीजवळ कोसळला"
" मग ?"
"मग काय, तुम्हाला शुद्धीत आणायचे प्रयत्न केले "
"हो, आणि शुद्धीत येईपर्यंत तुम्ही बरळत होता "
" काय ?"
" वेलकम बाबूराव म्हणून "
" हे बाबूराव कोण ?"
" मीच की "
" स्वतःलाच वेलकम का बरं ?"
" नाही ते मायबोलीकर "
" वेड लागलंय का ? मायबोलीकरांना काही झालेलं नाही. आहेत तसेच ठणठणीत आहेत. ते बरं स्वागत करतील कुणाचं ?"
" नाही म्हणजे मलाच वेड लागलं होतं. शान ए मायबोली सोडून गेलो होतो"
" मग कशाला कडमडलात परत ?"
" बाहेरचं जग नाही बरं . आलो परत "
" काय पीडा आलीय परत "
आणि बाबूरावांच्या जिवात जीव आला.
होमकमिंगचा फील आला.
बाबूराव मायबोलीवर परत आले.
वेलकम बाबुराव.. वर्जिनल आयडी
वेलकम बाबुराव.. वर्जिनल आयडी चा पासवर्ड विसरलात का?
वेलकम बाबूराव !!
वेलकम बाबूराव !!
वेलकम बाबुराव. बाबुराव
वेलकम बाबुराव. बाबुराव शिरवळकरांचे फॅन दिसतायत आमच्यासारखे.
'हडळीचा मुका' सारखं काही
'हडळीचा मुका' सारखं काही लिहिणार असाल तर(च) स्वागत आहे.
दारा बुलंद ☺️☺️
दारा बुलंद ☺️☺️
ते 5 लोकांनी हल्ला करून सगळ्यांची नाकं सुजून भोपळी मिरची सारखी होणं राहिलं बघा.
हर्पेन
हर्पेन
सगळ्यांनी तुम्हाला वेलकम करावं म्हणून हे लिहिलंय का?
सगळ्यांनी तुम्हाला वेलकम
सगळ्यांनी तुम्हाला वेलकम करावं म्हणून हे लिहिलंय का? >> तसं वाटत नाही.
मला वाटतं हे बाबुराव ते
मला वाटतं हे बाबुराव ते न्हवेत जे तुंम्ही सगळे समजत आहात.. हे नविन जन्म वाले बाबुराव आहेत असं वाटतय.. लिहिण्याच्या शैलीवरुन..
आभार सर्वांचे
आबासाहेब, रश्मी, मी अनु - आभार सर्वांचे
हर्पेनभाई - बरं. परत जमल का नाही हडळीलाच ठाऊक. जे काही सुचल ते आवडणार असंल तरच लिव्हनार हाये. हाय का कबूल ?
सस्मित - तसं वाटलं असंल तर माफी द्यावी.
भागो - तुम्ही म्हणाल तसं.
च्रप्स - जुना आयडी बंद केला होता.
काही नाही मंडळी. परत आलो हे गंमती गंमतीत लिहील. आगाऊ पणा झाला असंल तर एक डाव माफी द्यावी.
जुने लोक दिसत नाहीत पण परत येऊन. कुठं गेले सगळे ?
सान ए जाईसलमेर च आठवलं एकदम!!
सान ए जाईसलमेर च आठवलं एकदम!!
झ्याक लिहिलंय!!
हर्पेनभाई - बरं. परत जमल का
हर्पेनभाई - बरं. परत जमल का नाही हडळीलाच ठाऊक. जे काही सुचल ते आवडणार असंल तरच लिव्हनार हाये. हाय का कबूल ?
चालतंय की
(No subject)
वेलकम
वेलकम
वेलकम बाबुराव. बाबुराव
वेलकम बाबुराव. बाबुराव शिरवळकरांचे फॅन दिसतायत आमच्यासारखे.
Submitted by रश्मी.. on 29 June, 2019 - 00:51>>>>>>
Exactly
@बाबूराव रिटर्न्, तुमची आधी
@बाबूराव रिटर्न्, तुमची आधी एक कथा होती इथं, ती कुठं गायबली ? नवीन लिहा की काहीतरी जोरदार
हाहाहा आवडले.
हाहाहा आवडले.
(No subject)
सामोला चक्क हे सापडले. सामो,
रश्मी हो ना. मीही त्यांच्या
रश्मी हो ना. मीही त्यांच्या समग्र लेखनावर जायचा प्रयत्न केला. पण त्यांचा आय डी उडलेला असल्याने जाता आले नाही.