चिकन बनी चाओ (Chicken Bunny Chow)

Submitted by .......... on 23 June, 2019 - 14:32
chicken buny chow
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

४०० ग्रॅम चिकनचे तुकडे
धने पावडर एक चमचा
जीरे पावडर अर्धा चमचा
घरचा मसाला आवडीप्रमाणे
लाल तिखट आवडीप्रमाणे
हळद अर्धा चमचा
जीरे पाव चमचा
बडीशेप पाव चमचा (हवीच)
दालचीनीचा तुकडा: दिड इंच
चार लवंगा
चार पाच भरडलेले मिरे
दोन तमालपत्रे
दोन बटाटे (ऐच्छीक)
दोन लहान कांदे
दोन चांगले पिकलेले टोमॅटो
आलं लसुन पेस्ट दोन चमचे
कोथिंबिर, कढीपत्ता
दोन हिरव्या मिरच्या बी काढून, तळून
मिठ
तेल एक चमचा, तुप एक चमचा. (शक्यतो तुप वगळू नये)
स्लाईस न केलेला ब्रेड

क्रमवार पाककृती: 

प्रथम एका वाटीत धने-जीरे पावडर, लाल तिखट, चिकन मसाला, हळद हे एकत्र करुन त्याची पाण्यात पेस्ट करुन बाजूला ठेवावी.
पॅनमध्ये तुप व तेल टाकून जीऱ्याची व बडीशेपची फोडणी करावी. त्यात लवंग, दालचीनी व तमालपत्र टाकावे. जीरे चांगले फुलून आले की त्यात बारीक चिरलेला कांदा गुलाबी रंगावर परतुन घ्यावा. कांदा परतल्यावर त्यात आलं लसुन पेस्ट टाकून चांगले परतावे. बियांचा भाग काढून बारीक चिरलेले टोमॅटो परतावे व पाच मिनिट झाकण ठेवावे. टोमॅटो शिजुन कांद्याबरोबर मिळून आले की त्यात तळलेल्या मिरच्या टाकून चमच्याने चुरडून घ्याव्यात. तेल सुटू लागले की त्यात सर्व मसाल्यांची केलेली पेस्ट टाकावी. तेल सुटेपर्यंत परतावे. मसाला परतुन झाल्यावर त्यात चिकनचे व बटाट्याचे तुकडे टाकावेत व रंग बदलेपर्यंत परतुन घ्यावे. चिकन परतुन झाल्यावर त्यात प्रमाणात गरम पाणी घालावे. काही कढीपत्याची पाने हाताने चुरडुन घालावीत. मिरपुड आणि मिठ घालावे व एक चमचा तुप घालून मंद गॅसवर चिकन शिजू द्यावे. चिकन शिजून रस्सा हवा तेवढा घट्ट झाला की गॅस बंद करावा व वरुन गरम मसाला पावडर टाकून, व्यवस्थित हलवून दहा मिनिटांसाठी झाकण ठेवावे.

स्लाईस न केलेला अर्धा ब्रेड लोफ घेवून त्याच्या आतील मऊ भाग काढून जागा करावी. त्यात वरील चिकनचे पिस ठेवून वरुन घट्ट मसाला (रस्सा) टाकावा. आतील निघालेल्या मऊ तुकड्यावरही रस्सा टाकावा. गरम असतानाच खायला घ्यावे.

१.
1.jpg
२.
2.jpg

वाढणी/प्रमाण: 
२ जणांसाठी
अधिक टिपा: 

१. चिकनचा रस्सा पातळ न करता अगदी अंगाबरोबर करावा.
२. ब्रेडमधे रस्सा शोषला जातो तसतसे त्याची चव छान होत जाते.
३. फोटो काढायचा असल्याने रस्सा वरुन टाकला नाहीए.
४. मुळ पाककृतीत मी मला हवे तसे बदल केले आहेत. तुम्हाला हवा तसा बदल तुम्ही करु शकता. गार्निशिंगसाठी वरुन उकडलेले अंडे किसुन टाकले की छान दिसते.
५. ही पाकृ माझा नवरा उत्तम करतो. घरी एकटा असला की त्याची ही आवडती डिश आहे
______________________________
नवऱ्याच्या साऊथ अफ्रिकेत असलेल्या एका मित्राने ही रेसेपी शिकवली होती. त्यात मला हवे तसे थोडेसे फेरफार करुन मी आम्हाला आवडेल अशी बनी चाऊ ही पाककृती बनवली. मुळ पाककृतीमधे मटनच घ्यायला सांगितलेय पण मला ब्रेडसोबत चिकन जास्त आवडते. हा पदार्थ व्हेजही छान लागतो. मटार आणि बटाटा घेऊन, बाकी कृती सेम ठेवायची. ब्रेड जसजसा घट्ट रस्सा सोक करतो तसतसा बनी खायला मजा येते.

पुर्वी हॉटेलमधे काम करणारे लोक मालकाने दिलेले कोरडे ब्रेड खाऊन दिवस काढत. त्यातल्याच कुणीतरी जरा डोके चालवून ब्रेड आतुन पोखरला आणि त्यात लॅम्बचे पिस लपवून बाहेर न्यायला सुरवात केली आणि या पाककृतीचा जन्म झाला. अर्थात ही माहिती मित्राकडून कळालेली.
------------------------------------

माहितीचा स्रोत: 
.
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाव, दिवसा फक्त आणि फक्त मिसळसोबत खाल्ला, लहानपणी चहासोबत कधीतरी.. सध्या नाईलाजाने मध्यरात्री अंड्याच्या गाडीवर खावा लागतो. पण हे प्रकरण एकदा खायला आवडेल पावासोबत.. नाहीच जमलं तर आहेच बाजरीची भाकर.. जबराट आहे पाककृती.. वाचूनच चवीचा अंदाज येतोय☺️

मस्त पाकृ आहे. मटार बटाटा वापरून करून बघणार नक्की. पण खायला सुरुवात केल्यावर आतली भाजी बाहेर येत नाही का? की घट्ट रस्सा आहे त्यामुळे नाही येत बाहेर?

पावभाजीच्या धाग्यावर असा पावात भाजी भरलेला एक फोटो होता.

मलाही हे भयानक चविष्ट तोंपासू प्रकरण नक्की कसे खावे असा प्रश्न पडलाय,दिसतोय इतका छान तर खायलाही त्याच नजाकतीने हवा उगा काला करून खाल्ल्यासारखे नको

मलाही हे भयानक चविष्ट तोंपासू प्रकरण नक्की कसे खावे असा प्रश्न पडलाय,दिसतोय इतका छान तर खायलाही त्याच नजाकतीने हवा उगा काला करून खाल्ल्यासारखे नको >>>> +११११

एकवेळ व्हेज चे ठिक आहे पण चिकन कसे खाणार Uhoh की बोनलेस अन छोटे छोटे तुकडे केलेले चिकन घ्यायचे

जबरी दिसते आहे पाकृ. फोटो तर अतिशय आवडले आहेत. म्हणजे पाकृ ट्राय करायला प्रवृत्त करताहेत एवढे टेम्पटिंग आहेत.

दूर तिकडे टोंगा आयलंडमध्ये ( फिजी वगैरेच्या पुढे extreme eastला) असेच पण कडक ब्रेडचे लोफ मध्ये पोखरून त्यात सॉफ्ट ड्रिंक्स ओतून थोडे सोक झाले की खातात. रस्त्यावर पोरंटोरं आणि यंगस्टर्स असे कडक लोफ खात चालत असतात. पण ब्रेड लोफ मध्ये गोल्डस्पॉट / मिरींडा ओतून पिण्याची/ खाण्याची माझी मात्र हिंमत झाली नाही.

Thank you जागूताई. फोटोचेच कौतूक का बरं? Happy

आदू चिकनचा रस्सा घट्ट असतो. ब्रेड लोफ मधे चिकन भरले की बरीचशी ग्रेव्ही ब्रेड शोषून घेतो. मग सावकाश ब्रेडचा एक एक तुकडा तोडून खायचा. चिकनचा पिस नेहमी खातो तसाच खायचा. ब्रेडच्या आतिल मऊ भाग निघालेला असतो तोही ग्रेव्हीत बुडवून खायचा. थोडी बोटे चाटावी लागतात पण छान लागते.

VB बोनलेस चिकन घेतले तरी चालेल पण चव येत नाही फारशी असा अनुभव आहे. चिकन वेगळे शिजवून नंतर बोनपासुन वेगळे करुन श्रेड केले तर अडचण येणार नाही.

वावे भाजी येत नाही बाहेर. हॉटेलमधे मिळते ती कन्सिन्टन्सी ठेवायची. आलू मटार छान लागते.

धन्यवाद मीरा. ही माहिती नविनच आले मला.

स्वस्ति चिकन करुन घेतल्यानंतर वाढताना हे असेंबल करायचे आहे. त्यामुळे ब्रेड नको असेल तर कांदा भात किंवा पोळी-भाकरीबरोबरही छान लागेल.
माझी भाताची पध्दत: तुप तापवून भरपुर जीऱ्याची फोडणी करायची, जीरे फुलले की स्लाईस केलेला लहान कांदा गुलाबी परतुन घ्यायचा. त्यात भिजवलेला तांदूळ टाकून गरम पाणी टाकायचे. मिठ, एखादे तमाल पत्र आणि दोन तिने मिरे टाकून भात शिजवायचा. अगदी गुलाबी रंगाचा मऊ भात होतो.

काय हे च्रप्स! Lol Lol
रेस्पी फसली की हे नाव द्यायला हरकत नाही. Proud

चऱप्स, खूप प्रयत्न करूनही तुमचे नाव काही type करता येईना
खूपच मस्त जोक हा,
माझ्याकडून आता खरंच याचे नाव त्याच टोन मध्ये वाचले जातेय

आदु तुम्ही मला काहीही म्हटले तरी चालेल- मला स्वतःलाही चरप्स टायपता येत नाही Happy ते आयडी घेताना टाकले होते, परत जमले नाहीच.. हाहा

शाली - रेसीपी फसणार नाही हो, मस्त डिटेल मध्ये स्टेप्स दिल्यामुळे.. धन्यवाद ☺️

थॅंक्यू हेमाताई.
मनीमोहोर हे नाव माझ्या चटकन लक्षातच नाही आले. Happy

Pages