थांबा

Submitted by सुप्रिया जाधव. on 20 June, 2019 - 22:01

जीवनाच्या प्रवासात
अनेक व्यक्ति येतात
तशाच होतातही हद्दपार
आपसूक !

तरीही....
प्रत्येक जीवलगाजवळ
एक थांबा तयार होतो
'थांबणं' अपरिहार्यच असतं
प्रत्येक थांब्यावर !

कधी करकचून ब्रेक दाबून
पायउतार व्हाव लागत
अचानक !
स्वतःची गती मंदावून
गिअर बदलून
एक स्थान दयाव लागत
आपल्या मनात !

तर कधी चालत्या गाडीतून
नुसताच हात हलवण्यावर
भागवून न्याव लागत सगळ !

कधी कधीतर थांबण्याच्या नादात
गाडीही घसरते रूळावरुन
एकामागोमाग एक घसरलेले डबे
परत रूळावर आणण्यासाठी
जीवाचा आटापिटा करावा लागतो नुसता!

आणि तू म्हणायचास,
'एक ॲक्सिडंट समजून सोडून द्यायच असतं हे वेडे !'

हम्म !!!
पटतय आता पण वेळ निघून गेल्यावर...

फक्त तुझीच,
- प्रिया़

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच.

छान