"तुझ्याविना"

Submitted by mi manasi on 20 June, 2019 - 08:24

"तुझ्याविना"

उगाच हे नसूनही, दिसायचे असायचे
तुझ्याविना कसे कसे, जगायचे उरायचे !!

मनीच भाव आतले, जरा जरा जपायचे
हळूच पापणीतले, दुःखही पुसायचे !!

नवेच काही लाडके, तुझ्यापरी नसायचे
तरीहि दंगदंगुनी, फुलात फुल व्हायचे !!

रंग जीवनातले, जाहले फिकेफिकें
खुळेच श्वास चंदनी , स्मरायचे, भरायचे !!
..... मी मानसी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मधुरा... धन्यवाद!
मनीच भाव आतले, जरा जरा जपायचे
हळूच पापणीतले, दुःखही पुसायचे !!>>>>> छान .......आभारी आहे.