निरोप समारंभ

Submitted by प्रांजलीप्रानम on 20 June, 2019 - 04:00

निरोप समारंभ

आज घ्यायचा निरोप,
सगळ्यांचाच
मित्रांचा अन् मैत्रिणींचाही
संपणार,
ना होणार
कधीच ती
दिलखुलास मस्करी
अन् चर्चाही
रडत राहीले
या विचाराने
अन् आजच्या
त्या मस्करीनेही
निष्फळ ठरत राहीला
तो प्रयत्न
केला जो सगळ्यांनीही
नव्हते अश्रू ते
फक्त आजच्यासाठीच
ओसंडले
गतकाळाच्या स्मरणानेही
आठवत होती ती
ओळख नवीन
कशी सहजच
ती झालेलीही
"आपण"
या शब्दात
गुंतलो कसे?
अवचितच
तु अन् मी ही
सुंदरच वाटतो
मजसी आता
तो राग
अन्
लटका भावही
समजेना
का?
बरोबर वाटतात
आज
नकळत
झालेल्या त्या चूकाही
सुखद होता
तो काळ
कॉलेजातला
ना होईल विस्मृत
कदपिही
ते कॉलेज
अन्
तो ग्रुपही
.....प्रांजली

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

शाळा-कॉलेजमधले आयुष्यभर लक्षात
राहणार्या अनेक क्षणांपैकी एक भावनिक क्षण असतो निरोप सभारंभाचा.ती फिलींगच वेगळी असते.आनंद-दुखः सगळ्या भावनांची सरमिसळ होत असते. Happy