नमस्कार,
मला जे म्हणायचं आहे ते तुम्हाला कळण्याआधी माझी परिस्थिती माझं बॅकग्राउंड सांगावं लागेल.
माझं दीड वर्षापूर्वी लग्न झालं म्हणजे pure love marriage नाही म्हणता येणार..पण स्थळ पाहताना तिच प्रोफाईल पाहण्यात आलं..
पहिल्यांदा साफ नकार मिळाला पण मुलगी प्रोफाईलवरून चांगली वाटली म्हणून आणि माझंही लग्न कुठे जमत नव्हतं..कारणे बरीच आहेत जसे की मुंबईत स्वतःच घर नाही, घर टिटवाळ्याला चाळीत आहे..
वडील नाहीत..आईचं माझं पटत नाही..पटत नाही म्हणजे ती मला तिचा मुलगा मानतचं नाही..मी सातवीला असताना ती घर सोडून गेलेली आठ वर्षानी परत आली तेव्हा डोक्यावर तिच्या परिणाम झालेला..कुठल्याही कारणाने भांडते..कधी कधी खुप हिंसक होते..एकदा मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी पैसे दिलेले...तर तिने ऐनवेळी हाॅस्पिटलमध्ये पैसे भरताना दिलेच नाही..परत कसेबसे गोळा करून मी पैसे दिले..सारखं माझं घर घर करते..कुणालाच टिटवाळ्याच्या घरी राहू देत नाही...महिन्याला तिला खर्चाला पैसे दिले नाहीतर ऑफिसमध्ये येऊन भांडते..
तर अशा एकंदरीत परिस्थितीत ज्याला स्वतःच घर नाही, नीट फॅमिली नाही अशाला कोण मुलगी देणार??
म्हणून कुणाला तरी पटवून विश्वासात घेऊन लग्न करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता..आता जी माझी बायको आहे..तिलाच विश्वासात घेऊन ..व्हाॅटसअप बोलत बोलत पटवलं..विश्वास दिला...काहीच लपवलं नाही खरं खरं सगळं सांगितलं.. तिचे घरचे ना ना ना करत होते पण मुलगी ऐकत नाही म्हटल्यावर लग्न लावून दिल आमचं.. मी बॅचलर राहत होतो..मग लग्न ठरल्यावर डोंबिवलीत भाड्याने फ्लॅट घेतला. जसं सासरकडच्या अपेक्षा होत्या ..सगळं तसचं करून दाखवलं.. घरात दोघेच असतो...पगार पण व्यवस्थित आहे...पण माझी बायको काहीच करायला मागत नाही...तिला सगळं सांगावं लागतं. छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा नीट जमत नाही तिला..मी आधीच सांगितलेलं..तु घरी बसणार असशील तर घराची जबाबदारी तुझी असेल मी थोडीफार मदत करेन. पण हिला घरचही काम नीट करायला नको. .समजुन घेत नाही..मोठ मोठ्याने भांडते...भांडणाचा आवाज सोसायटीभर जातो ...घरमालक खाली करायला लावतोय की काय अशी भीती वाटते...हिला शिकायचंच म्हणून क्लासपण लावला..तो ही तो नीट करत नाही ..डबा मिळाला तर नशिब...वरून खुप पसेसिव्ह आहे...छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडते...इतकी चिडते की,दिवसभर राग जात नाही तिचा....वरून मी कामावरून आलो की, घरी हिला मदत करावी ही अपेक्षा...
अपेक्षा असणं चुकीचं नाही तिनेही समजुन घ्यावं...दोनच माणसाचं करायचं आहे त्यातही काही कामे alternate दिवसाला करायची असतात. जसे कपडे धुणे,लादी पुसणे...उरत फक्त जेवण आणि भांडी..
त्यातही मी मदत करावी ही अपेक्षा का?? मी ही जेवण करतो..सुट्टी असल्यावर आवडीने करतो .तरीही रोज रोज मी करावं हे मला पटतं नाही...हिला कशातचं इंटरेस्ट नाही...ना मुव्ही बघण्यात ना वाचण्यात ना आणखी कशात...हिच्याशी काही शेअर करायला गेलो तर हि अनभिज्ञ.. काही बोललो तर मोठमोठ्याने रडते...इमोशनवर कंट्रोल नाही...एकंदरीत मला ह्या लग्नाचा कंटाळा आला आहे... तिच्या घरी सांगितलर तर हात वरती करतात...तुमचं तुम्ही बघा बोलतात.. तिला वेळ द्या..बोलतात. किती वेळ अजुन हवा आहे??
एकंदरीत मला जगावसं वाटतं नाही...लहानपणी आई नसताना भोगलं ..
नंतर आई आल्यानंतर दुप्पट भोगलं...नंतर पप्पा गेले..तोही आधार नाही..
आणि आता जरा कुठे चांगले दिवस यावे म्हणतो तर हे असं..
मी सांगत नाही कुणाला कधी. रोज हे दूःख घेऊन हसत जगतो .पण आता मला सहन नाही होत... वाटतं जीव द्यावा...नाहीतर लांब निघून जावं...
Srv nit Astana .. tya as ka
Srv nit Astana .. tya as ka vagat ahet yavar ekda bolun bgha... Or tyana mansopchar Dr kde nya.. kahi nsel possible tr separate vha... Jiv vgre den yogya nst... Ani tyane kahi sadhya honar nahi.. tya parmeshwarala khup kasht ghyave lagle o TumhLa ghadvtana.. in fact 9 month kevha tumhi aaicha udrat hotay tevha... So jiv ky evdha vr nahi aalay..problem salve kra... Plz negative thinking sodun dya.
बापरे!!! वाचून वाईट वाटलं खुप
बापरे!!! वाचून वाईट वाटलं खुप पण जीव देणे किंवा लांब निघून जाणे हा पर्याय योग्य वाटतं नाही...इतकं वर्षे तुम्ही सहन केलं.. तिथेच तुम्ही अर्धी लढाई जिंकलात..हे ही दिवस जातील..सामोपचाराने आपआपसातील मतभेद संपवा.. तुमच्या बायकोला तुम्ही खुप प्रेम द्या..इतकं चांगलं वागा त्यांच्याशी की,त्यांनाच त्यांच कळलं..थोडे दिवस हसत हसत घरातली कामे करा कितीही थकून आला असेल तरीही करा...गोड गोड बोलून जबाबदारी नीट समजावा....बदल होईल नक्की होईल...बी पोसिटीव्ह....बाकी विपू केल आहे...तेवढं नक्की करा.. नक्कीच फरक जाणवेल.
हा प्रश्ण वाचुन तरी
हा प्रश्ण वाचुन तरी ज्येन्युन वाटतोय म्हणून लिहितेय,
इथे लिहुन तुम्हाला बरं वाटले असेल कारण मोकळंम होण्याची गरज सर्वांनाच असते. पण त्यापुढची गरज म्हणजे , मी काय करावे हा प्रश्ण?
जितक्या व्यक्ती तितकी उत्तरं वा तोडगे येणारच. पण निवड हि तुम्हालाच करावी लागणार. दोन व्यक्तींच्या नातेसंबधात कोणी बाहेरचा माणुस थोडक्या माहितीवर योग्य सल्ले देवु शकत नाही. त्यामुळे, सर्व्साधारण सल्ला हाच की, तुम्ही ‘विश्वासु ‘ कौण्सेलर बघा, त्याच्याकडे तुमचे विचार मांडा. तुम्ही तुमची काळजी घ्या आणि शुभेच्छा!
आपल्याडून काही नाही पण
आपल्याडून काही नाही पण जवळच्या लोकांकडून त्रास यास भोग म्हणतात.
दिवस नक्की सुधारतील.बायकोला
दिवस नक्की सुधारतील.बायकोला विचारून काही दिवस पोळी भाजी केंद्राचा आधार घेणं शक्य आहे का?पैसे जातील, पण किमान हे काम आउटसोर्स झाप्यावर मूड आणि इतर गोष्टी सुधारतात का हे तपासता येईल(we can't work with bunch of questions all at the same time. काही गोष्टी माहीत असलेला कंट्रोल इनपुट म्हणून लागणार.)
सगळं व्यवस्थित होईल.वाईट कुटुंबाच्या जाळ्यातून तुम्ही बाहेर पडला आहात.डोंबिवली सारख्या सांस्कृतिक आणि इतर सोयींच्या दृष्टीने चांगल्या जागी आहात.
बापरे, इतकं सगळं होऊन अजून
बापरे, इतकं सगळं होऊन अजून तुम्हाला वेड कसं लागलं नाही याचंच आश्र्चर्य वाटतंय.
आत्तापर्यंत स्वत:ची चूक नसताना नमतं घेतलंत तेवढं पुरे. आत्ता स्वत:च्या आनंदाकडे लक्ष द्या.
तुमच्या बोलण्यावरुन वाटतंय तुमचं आणि तुमच्या आईचं नातं फक्त नावापुरतं उरलय. अशा पोकळ नात्यासाठी इतकं रक्त जाळायची काहीएक गरज नाही. आता आईचा मनस्ताप सहन करण्यापरीस सरळ तिला तपासून घेऊन वेड्यांच्या हास्पिटलात भरती करा.
तरीही त्रास संपला नाही तर हयगय न करता सरळ पोलीसात मानसिक छळाची तक्रार करा. खाऊ द्या जरा तिलापण तुरूंगाची हवा. उगाच आई आहे म्हणून तीला तुमच्या आयुष्याची राखरांगोळी करायचा काहीयेक अधिकार नाही.
बायकोच्या वागण्यावरून तिला
बायकोच्या वागण्यावरून तिला एकूणच संसारात रस नाही, असं जाणवतंय. विनाकारण चिडचिड करणं, कशातच रस नसणं यावरून कदाचित तिला डिप्रेशन सारखा गंभीर मानसिक आजार असण्याची दाट शक्यता आहे. तेव्हा दोघांनी मिळून थोडे महिने एका सायकॉलाजिस्ट कडे काउन्सलिंग करा, सामोपचाराचा शेवटचा पर्याय म्हणून.
याउप्पर तिच्यात बदल दिसला नाही तर बायकोसाठी घरची कामं करणं सोडून द्या. तिलाच धुवू द्या तिचे कपडे, आणि जेवणही स्वत:च करुन घे म्हणाव.
इतकं करुनही वठणीवर आली नाही तर सरळ तिच्या असहकाराचे पुरावे गोळा करून काडीमोड घेतलेला बरा. याने कदाचित तिला नाही तरी तिच्या घरच्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल. त्यांनाही आतून माहीत असेल की अशी नखरेल धोंड दुसरा कोणी गळ्यात बांधून घेणार नाही, तेव्हा त्यांच्याकडून सुद्धा सामोपचाराचे प्रयत्न होतील.
नाही झाले यातले काही तरी घटस्फोटानंतर किमान तुमची या जाचातून सुटका होईल. असा तिरपागडा पार्टनर असल्यापेक्षा एकटं राहिलेलं कधीही चांगलं.
दोन्ही पर्यायात वकीलाचा सल्लाही घ्या. मुख्य म्हणजे स्वत खंबीर रहा. एकटेपणाला घाबरु नका, मनातल्या गोष्टी शेअर करत चला. पुढे दुसरी कोणी मिळणार नाही असं काही नाही.
बाकी बोलणं सोपं असेल, करणं अवघड. पण पुढचं अख्ख आयुष्य करपण्याआधी कठोर उपाय करणं हेच सोयीचं राहील.
बायकोचा स्वभाव आधीपासुनच असा
बायकोचा स्वभाव आधीपासुनच असा होता का? जेव्हा तुम्ही लग्नासाठी बायकोला पटवत होता तेव्हा तुम्हाला अंदाज आला असेल स्वभावाचा. लग्नानंतर अचानक बदलायला लागली का तीची वागणुक? असे असेल तर तिला खरच कोणत्या तरी गोष्टी खटकत असतील ज्या ती तुम्हाला सांगु शकत नाही किंवा सांगतले तरी तुम्ही समजुन घ्याल असे तीला वाटत नसेल. तेव्हा खरंच शांत पणे तिच्याशी बोलुन बघा. दोन माणसांचे काम जास्त नसले तरी पुर्ण घराची जबाबदारी एकटीने कधी लग्नाआधी अंगावर पडलेली नसते. त्यानेही चिडचिड होत असेल. जर तिला तुमच्या गोष्टींमधे इंटरेस्ट नसेल तर तुम्गोष्टींमधेआवडीच्या कोणत्यातरी गोष्टींमधे इंटरेस्ट दाखवा. हळुहळु होतील गोष्टी नीट. तुम्ही तिच्या घरच्यांना तिच्याबद्दल कंप्लेन्ट करत्तात हेही तिला आवडत नसेल. बोलुन बघा पण नक्की.
विलभच्या दोन्ही प्रतिसादांशी
विलभच्या दोन्ही प्रतिसादांशी सहमत!
मित्रानो, या व्यक्तीचा
मित्रानो, या व्यक्तीचा प्रॉब्लेम खूपच सिरीयस आहे आणि आपण अर्धवट माहितीवरून आणि एकच बाजू ऐकून सल्ला देणे बरोबर नसेल हे माझे मत.
बायको अशी का वागते? तिचे बाहेर काही प्रकरण? किंवा तुमचे एखादे प्रकरण जे तिला बाहेरून कळलेले आहे ? एखादा संशय? बायकोला housewife बनायला आवडत नसून जॉब करायची इच्छा आहे का? सेक्स लाईफ मध्ये काही प्रॉब्लेम की ज्यामुळे बायको चिडचिड करतेय?
असे हजारो प्रश्न असतील जे तुम्हाला स्वतःलाच विचारावे लागतील, खूपच वैयक्तिक असल्यामुळे सोशल मीडिया वर तुम्हला माहिती टाकणे आणि उत्तर मिळवणे कठीण आहे.
प्रश्न फक्त जेवण घरकामाचा असेल तर खरच बाहेरून जेवण मागवा काही दिवस, पीस ऑफ माईंड पेक्षा काहीही महत्वाचे नाही.
बायकोच्या घरच्यांचे कौतुक की जे नवरा बायकोचया भांडणात पडत नाही आहेत.
तुम्ही धीर सोडू नका, एक गोष्ट लक्षात ठेवा, हेही दिवस बदलतील. शुभेच्छा !!
विलभच्या दोन्ही प्रतिसादांशी
विलभच्या दोन्ही प्रतिसादांशी सहमत!>>>+१.
च्रप्स यांच्याशी सहमत.
च्रप्स यांच्याशी सहमत.
भांडी, कपडे, लादीसाठी बाई लावा.वाॉशिंग मशिन घ्या. दोन माणसांचं जरी असलं तरी खूप असतं काम. त्यातल्यात्यात यू केअर फॉर हर हे फिलींग त्यांना द्या. घरातील कामे वाटून घेवून करू शकता. कामेही पटकन होतात. त्यांना करीयर किंवा एखाद्या छंदासाठी प्रोत्साहित करा.
अविवाहित/लग्नाळू लोकांच्या
अविवाहित/लग्नाळू लोकांच्या प्रश्नांवर चांगली चर्चा असलेला एखादा जुना धागा आहे का इथे? असल्यास कृपया लिंक द्या
पेरूचा प्रतिसाद योग्य वाटतं..
पेरूचा प्रतिसाद योग्य वाटतं...
व्यक्ती तितक्या प्रकृति! तुम्हाला कामाची सवय आहे ती शेंडफळ असेल...तुम्ही/ दोघांनी लग्नाअगोदर जे स्वप्न दाखवले/ बघितले असेल ते आभासी झाले असेल...
व्यक्तीचा स्वभाव लगेच बदलत नसतो.. जर तुमचे एकमेकांवर प्रेम/ विश्वास असेल आणि संसार पुढे ढकलचा असेल तर तिच्यात जे चांगले आहे त्याला प्रोत्साहन द्या, नोकरी/ क्लासेस/ शिलाई/ इत्यादी.. नाहीतर व्यक्ती दुस्वास होण्याच्या अगोदर काडीमोड घ्यावा.. पण पोटगी द्यावी लागेल कदाचित एकतर्फे असेल तर...
वरच्या प्रतिसादांतून आपणास
वरच्या प्रतिसादांतून आपणास आधार/सल्ले दिले गेले आहेतच. कौन्सिलर ची मदत घ्या. अनामिका यांच्याशी सहमत. थोडे पैसे जातील पण घरी कामासाठी कोणी मिळते का पहा.
माझ्याकडून इतकेच सांगणे...
>> एकंदरीत मला जगावसं वाटतं नाही...
असे विचार कोणत्याही कारणाने मनात येऊ देऊ नका(च). आणि जर मनात आलेच तर फक्त एकच करायचे. आपल्याहून कितीतरी अधिक पटीने व आत्यंतिक वाईट परिस्थितीतून (जसे कि असाध्य आजार, जन्मतःच असलेले व्यंग, विकलांग करणारा आघात, अतोनात छळ, भीषण आर्थिक फसवणूक, कमालीची गरिबी, आप्तेष्टांचा विरह, बदनामी, प्रचंड नुकसान इत्यादी कितीतरी उदाहरणे आहेत) लोकांनी मार्ग काढत यशाची शिखरे गाठल्याची कितीतरी उदाहरणे आहेत. त्याबाबत नेहमी विचार करा/पहा/वाचा. सुदैवाने आजच्या इंटरनेटच्या काळात जगभरातले अनुभव सांगणारे विविध फोरम्स/ब्लॉग्स/व्हिडिओज अगदी हाताच्या बोटांपाशी उपलब्ध झाले आहेत. सकारात्मक राहण्यासाठी त्यांचा योग्य वापर करून घ्या.
अजून एक म्हणजे अशा काळात नेहमी सकारात्मामक व हसत खेळत राहणाऱ्या लोकांशीच संपर्कात राहा. मागे एकदा एकदोन धाग्यांवर लिहिले होतेच. इथे सुद्धा पुन्हा लिहितो. सतत कार्यमग्न रहा. त्याने सुद्धा खूप फरक पडतो. एखाद्या कामाचा ध्यास घ्या. डोक्यात फक्त कामच भरून राहायला हवे. त्यापुढे या साऱ्या गोष्टी छोट्या वाटतील असे काहीसे. जमते का पहा. अवघड आहे जरूर. पण प्रयत्न करून पहा.
सगळ्यात बेस्ट उपाय म्हणजे
सगळ्यात बेस्ट उपाय म्हणजे आईला चार दिवस घरी आणा, ती बायकोला चांगलीच सरळ करेल.चार दिवसानंतर आईला परत टिटवाळ्याला सोडून या आणि बायकोला सांगा, व्यवस्थित वागली नाहीस तर आईला कायमची इथे आणेल. बायको सुतासारखी सरळ झालीच म्हणून समजा.
अहो बोकलत लेखक स्वताच्या
अहो बोकलत लेखक स्वताच्या हातात फक्त विष असलेला ग्लास घेऊन बसलेत, तुम्ही तर सरळ त्यांच्या तोंडात ओतायला निघालात.
सगळ्यात बेस्ट उपाय म्हणजे
सगळ्यात बेस्ट उपाय म्हणजे आईला चार दिवस घरी आणा, ती बायकोला चांगलीच सरळ करेल.चार दिवसानंतर आईला परत टिटवाळ्याला सोडून या आणि बायकोला सांगा, व्यवस्थित वागली नाहीस तर आईला कायमची इथे आणेल. बायको सुतासारखी सरळ झालीच म्हणून समजा.>>
हायला हे ब्येस्ट आहे. प्रॉब्लेम एकच की त्या दोघा ममता दीदींची युती झाली तर लेखक जाग्यावर 'हे राम' म्हणायचा..
कशातच interest नाही म्हणताय,
कशातच interest नाही म्हणताय, psychiatric कडे दाखवा
दोघेही मानसोपचारतज्ञाकडे जा.
दोघेही मानसोपचारतज्ञाकडे जा.
काही counseling session नंतर फरक पडेल.
ती बदलत नाही पण तुम्ही स्वत:ला सकारात्मक बदलू शकता.
काडीमोड शेवटचा उपाय. त्यातही पोटगी म्हणून ती तुमच्या 30 % पगारावर कायदेशीर हक्क सांगू शकते .
आणि महत्त्वाचे
जगी सर्वसुखी.... लक्षात घ्या.
जीव देणे वगैरे पळपुटेपणा. विनोबा भावे अविवाहित होते कारण त्यांना आई म्हणाली लग्न केलं तर एका पिढीचा उध्दार करशील पण अविवाहित राहीला तर पिढ्यानपिढ्यांचा उध्दार होईल.
एकदाच मिळणारा दुर्मिळ नरदेह फालतू कारणासाठी त्यागण्यासाठी नाही. खूप काही चांगलं करु शकता. So be bravo .
त्यातही पोटगी म्हणून ती
त्यातही पोटगी म्हणून ती तुमच्या 30 % पगारावर कायदेशीर हक्क सांगू शकते .>>
जिथवर मला माहिती आहे, बायको बाहेर कामाला नसेल आणि तिने घरकाम पोरंबाळं सांभाळली तरच पोटगी मिळते. नवऱ्याने तिच्या नाकर्तेपणाचा पुरावा दिला तर नवरा पोटगी देणे लागत नाही. इथं दोन्ही बाबतीत आनंदीआनंदच दिसतोय.
जर बायकोची नोकरी करण्याची पात्रता असेल, तरीही नवरा पोटगी देणं लागत नाही. अशा वेळी कोर्ट बायकोला नोकरी लागेपर्यंत एक ठराविक रक्कम देण्याचा आदेश देऊ शकतं, तेही काही ठराविक वेळेसाठी. नोकरी करायची कुवत असताना कायमस्वरूपी पोटगीचा अधिकार बायकोला नाही.
Hmm..hya paristhititun
Hmm..hya paristhititun taraNyakarata tumhala shubhechcha.
Man's search for meaning navache pustak vachatey. Te vachane shakya asel tar vachun paha. BaL (takad) Milu shakel kadachit.
Marathi bhashantar hi ahe.
सोसायटीत ऐकू जाईल एवढे
सोसायटीत ऐकू जाईल एवढे मोठमोठयाने भांडणे,
खूप जास्त पझेसिव्हनेस
क्षुल्लक कारणांवरून दिवसभर राग
मोठयाने रडणे, इमोशन्सवर कंट्रोल नाही
आणि तिच्या घरचे म्हणताहेत तुमचं तुम्ही बघून घ्या.
म्हणजे या गोष्टींची त्यांना कल्पना असावी असे वाटते.
तुम्ही आधीच खूप संयम बाळगून आहात, पण तुम्हाला अजून खूप संयम बाळगावा लागेल. तिला काही प्रॉब्लेम आहे आणि तो सोडवायचा आहे असे तूर्तास समजा. तुमच्या बाजूने तिला पॉईंट आउट करणे, उलट उत्तर देणे, किंवा आपली बाजू तिच्यापुढे मांडणे हे तूर्तास थांबवा. ज्या गोष्टींना नकार द्यायचा त्यास शांतपणे, खुबीने नकार द्या, वाद होईल अशी परिस्थिती टाळा. तुम्हाला तिची काळजी आहे, तीची गरज आहे असे दर्शवत रहा.
आणि तुम्ही दोघेही सोबत लौकरात लौकर माहिती काढून चांगल्या कौन्सिलरना भेटा. पुढे ते मार्गदर्शन करतील.
डॉक्टरला दाखवण्यात पैसे खर्च
डॉक्टरला दाखवण्यात पैसे खर्च व्यर्थ वाटतय कारण माहेरचे लोक म्हणतात तुमचंतुम्ही बघून घ्या.
> • बायको बाहेर कामाला नसेल
> • बायको बाहेर कामाला नसेल आणि तिने घरकाम पोरंबाळं सांभाळली तरच पोटगी मिळते.
• नवऱ्याने तिच्या नाकर्तेपणाचा पुरावा दिला तर नवरा पोटगी देणे लागत नाही.
• जर बायकोची नोकरी करण्याची पात्रता असेल, तरीही नवरा पोटगी देणं लागत नाही.
• अशा वेळी कोर्ट बायकोला नोकरी लागेपर्यंत एक ठराविक रक्कम देण्याचा आदेश देऊ शकतं, तेही काही ठराविक वेळेसाठी.
• नोकरी करायची कुवत असताना कायमस्वरूपी पोटगीचा अधिकार बायकोला नाही. >
मला वाटतं हे सगळेच मुद्दे चुकीचे आहेत. वकील आहे का कोणी इथे?
मुलांचे प्लांनिंग अजिबात करू
मुलांचे प्लांनिंग अजिबात करू नका, उद्या तुमचा काडीमोड झालाच तर त्यांची फरफट होईल.
आताची परिस्थिती सुधारणार नाही असे वाटत असेल तर वेळ न घालवता काडीमोड घ्यावा.
परिस्थिती सुधारविण्याचे 1 -2 प्रयत्न करून पाहायला काही हरकत नाही. त्यासाठी काहीतरी कारण काढून (घराला रंग/ पेस्ट कंट्रोल वगैरे) आईकडे सपत्नीक एक आठवडा राहायला जा आणि त्या दोघी भांडत असतील तर नेहमी आईची बाजू घ्या. मग तुमच्या आताच्या घरातील परिस्थिती सुधरली नाही तर तुम्ही आईकडे कायमसाठी राहायला जाणार हे पत्नीला सांगा.
पण हे सर्व करण्याआधी, "तुमचं स्वतःच काही चुकतंय का" हे तपासून पहा, त्यासाठी तुम्हाला एखाद्या सायकीयात्रीस्ट / कॉउन्सिलर कडे जावं लागेल.
तो आई आणि बायकोला एकत्र
तो आई आणि बायकोला एकत्र आणायचा, रहायला लावायचा प्लॅन अजीबात करू नका प्लिज. दोन विषारी व्यक्ती एकत्र आल्या की त्या एकमेकांना कॅन्सल आउट करतीलच असं काही नाही. त्यांचा परिणाम चौपट होऊन त्रास वाढेल.
डॉक्टरला दाखवण्यात पैसे खर्च
डॉक्टरला दाखवण्यात पैसे खर्च व्यर्थ वाटतय कारण माहेरचे लोक म्हणतात तुमचंतुम्ही बघून घ्या.>>
पूर्ण माहीती नसताना असा निष्कर्ष काढता येणार नाही. लोकांची वेगवेगळी आणि टोकाचीही मतं असतात अशा बाबतीत. मानसोपचारतज्ञाकडे / कौन्सिलरकडे जाणे म्हणजे कमीपणा, लोक काय बोलतील किंवा मुळात ही कल्पनाच धुडकावून लावणे वगैरे. किंवा घेऊन गेले तरी एक दोन फॉलोअप नंतर ट्रीटमेंट सुरू न ठेवणे.