आमचा बिरादरीचा हॉस्पिटल स्टाफ

Submitted by लोकेश तमगीरे on 16 June, 2019 - 01:51

प्रिय मायबोलीकर,
मी आणि सोनू आम्ही ३ वर्ष लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा येथील दवाखान्यात आणि आस-पास च्या २६ आदिवासी खेड्यांमध्ये आरोग्य विषयक काम केलं. नुकताच आमचा प्रोजेक्ट संपला. हॉस्पिटल स्टाफशी आमचं खूप घट्ट नातं झालय. त्यांचाच आठवणीत म्हणून मी हे त्यांना लिहिलं होतं. तेच मी मायबोली वर शेअर करतोय. धन्यवाद ..!!

प्रिय मित्र मैत्रिणींनो,

निघायच्या आधी एकत्र बसून निवांत गप्पा मारायच्या होत्या. तुम्हा सर्वांना एक छोटीशी पार्टी द्यायची होती. पण वेळ फारच कमी होता म्हणून निघतांना आम्हाला कुणाशीही भेटता आले नाही. असो....
बिरादरीत सोनुचे तीन आणि माझे दोन वर्ष खूपच छान गेले. खर तर २-३ वर्ष असं मोजून या बंधनाची किंमत करताच येणार नाही. लोक बिरादरी प्रकल्पात काम करतांना ‘ही संस्था आमची संस्था आहे’ अशी भावना आम्हाला नेहमीच यायची. आणि ही भावना एका कार्यकर्त्याच्या मनात येणं हे खूप महत्वाचे आहे. याचे पूर्ण श्रेय आम्ही प्रकाश काका, मंदा काकू, दादा आणि वहिनी यांना देतो. त्यामुळे तुम्ही सर्व आम्हाला आमच्या खूप जवळचे वाटायचे. तुमच्या सर्वांसोबत साजरे केलेले वाढ-दिवस, एकत्र बसून खाल्लेले समोसे, केक, पॅटीस (तुम्हाला न आवडणारे) आम्हाला नेहमीच आठवणीत राहील. आणि हो....रंगबिरंगी केसांची विग आणि रंगित फंकी गॉगल बघितल्यावर तुमच्या सर्वांची आठवण नक्कीच येईल. Health-Talk मध्ये पेशेंट्सला विविध आरोग्य विषयांवर माहिती देतांना तुमचा वाढलेला आत्मविश्वास बघून आमचा पण आत्मविश्वास वाढायचा [https://www.youtube.com/watch?v=LjGSDR7yTs8]. तुमच्यातील काही लोकांना मीटिंग मधे नियमित डाटा प्रेझेंटेशन करतांना बघून सुद्धा आम्हाला खुप छान वाटायचं. दांडिया आणि खासकरून जगदीश-शारदाच्या लग्नासाठी डांस प्रैक्टिस करतांना सोबत घालवलेले दिवस नेहमीच आठवणीत राहतील. मी तो व्हिडियो सुद्धा यू-टुब वर टाकला आहे. [https://www.youtube.com/watch?v=hgnLJMzyLm0]
‘जन स्वास्थ सहयोग’ आणि ‘श्रद्धा’ या लोक बिरादरी सारख्याच मोठ्या संस्थांना भेट देऊन आमच्या प्रमाणेच तुम्ही सुद्धा निश्चितच नविन गोष्टी शिकल्या असतील. आणि या पुढेही शिकालच. रुहीच्या जन्माच्या वेळेस सुद्धा तुम्ही सर्व आमच्या सोबत होते. लेबर रुम मध्ये सोनू पोटातील कळाने त्रासात होती आणि आपण सगळे मुलगा होणार की मुलगी यावर चर्चा करत होतो...हा..हा..!!!

“पेशंट काय म्हणत आहे ..?... इकडे ये ना” असं म्हटल्यावर लगेच येणाऱ्या आमच्या माडिया ट्रान्सलेटर “शारदा, शारदा ताई व लक्ष्मी”,
वेळेत औषधी देणारी आमची “फार्मसी वाली प्रियंका”,
ANC क्लिनिकची न सांगता उत्तमपणे तयारी करणारी “आमची वॉर्ड वाली प्रियंका”,
वर्षातून जवळपास ३०० पर्यंत डीलेव्हरिजला मदत करणाऱ्या “ब्युटी क्विन शारदा व शारदा ताई”,
बाळ जोराने रडल्यावर खुश होणारी व लहान मुलांची योग्य काळजी घेणारी “जुरी”,
ड्रेसिंग रूम मधे शांततेत रुग्णांच्या जखमा पुसणारा “सुरेंद्र भाऊ”,
फ्रैक्चर पेशंटचा ताबडतोब एक्स-रे काढून प्रकाश भाऊंकडे घेऊन जाणारा “सेल्फी-किंग अरविंद”,
“तुम मुझे खून दो मै तुम्हे लैब रीपोर्ट दूंगी/दूंगा” म्हणणारे “पारो-विनोद”,
आपले मुलं-बाळं सांभाळून उत्तमपणे हॉस्पिटल सांभाळणाऱ्या “सविता ताई, दीपमाला ताई आणि माधुरी ताई”,
कधीपण सांगितलं तरी निमूटपणे डेटा एन्ट्री करून देणाऱ्या “रमीला ताई”,
हॉस्पिटल आणि संस्थेचं इतर कुठलही काम आपलं समजून करणाऱ्या आणि माडिया लोकांची लाडकी "नर्स बाई" असणाऱ्या “संध्या काकू”,
डेटा एन्ट्रीचा भार पूर्णपणे सांभाळणारे “बबन काका”,
लोकांना दृष्टी देणारा लोक बिरादरीचा ऑपथलमॉलजिस्ट "जगदीश",
रोजचे जमा झालेले पैसे ऑफिस मध्ये योग्य वेळेत पोहोचवून देणारा आणि कार्ड रूम मध्ये इकडून - तिकडे फिरणारा “शंकर”,
कुठल्याही डॉक्युमेण्टची उत्तमपणे डीझायनिंग करणारा “दीपक”,
कधी पण भेटली तरी लाजून स्माईल देणारी “प्रेमीला व जुनी वाली वनिता”,
पेशेंट्सला रोज सकाळ-संध्याकाळ जेवन तयार करून देणारे “राकेश-सोमजी”,
संपूर्ण हॉस्पिटल परिसर स्वच्छ ठेवणारे “प्रकाश काका, अंजली, पप्पू भैय्या आणि त्यांची पत्नी, रमेश आणि हेमवंती ताई”,
शाळेतल्या मुलींसाठी सॅनिटरी पॅड तयार करणाऱ्या “सईताई आणि निर्मला ताई”,
लोक बिरादरी दंत विभागाचे काम फक्त हॉस्पिटल पूर्ती मर्यादित न ठेवता गावागावात-शाळेत जिद्दीने पोहोचवणारे आणि "आता आम्हाले कॅन्सर निघते" असं म्हणून ज्यांच्या भीतीने गावातील लोकं पळून जायचे असे आमचे दातांचे डॉक्टर “अमिरा - आदित्य”,
रूरल बॉण्ड संपवून सुद्धा आपली सेवा चालू ठेवणारी आमची कॅम्युनिटी गायनॅकोलॉजिस्ट “निलोफर”,
दिवसाचे २४ तास OPD मध्ये बसुन अभ्यास करणारा “यश”,
आणि नवीन रुजू झालेले पूजा, शांता, वनिता व इतर सर्व ....

आपल्या सर्वांचीच खूप–खूप-खूप आठवण येईल.

तुमच्या सर्वांचेच पेशंटचे आरोग्य आणि दवाखान्याचे काम उत्तमपणे चालू ठेवण्यात खूप मोठे योगदान आहे आणि नेहमीच राहणार.
हॉस्पिटलला येणारे सर्व पेशेंट्स हे आपलेच आहे असं समजुन त्यांची काळजी घ्या. आम्हाला माहित आहे ते तुम्ही करतातच. तरी पण फावल्या वेळात त्यांच्याशी नेहमी बोला त्यांची परिस्थिती समजून घ्या. मग बघा पेशेंट्सला निश्चितच लवकर बरं वाटेल. हॉस्पिटल सोबतच स्वतःच्या फॅमिली कडे पण तेव्हडेच लक्ष द्या.

आम्ही कदाचित तुमच्या मधील बऱ्याच लोकांवर कधीतरी चिडलो असेल, रागावलो असेल, पण ‘तुम्ही शिकावं’ हाच फक्त त्या मागचा उद्देश होता..!! जर कुणालाही वाईट वाटलं असेल तर माफ करा.

जग फार छोटं आहे .... कुठे ना कुठे तर नक्कीच भेट होईल ..... नागपूरला आले की नक्की कळवा.

तुम्हा सर्वांना तुमच्या पुढील आयुष्यासाठी खूप - खूप शुभेच्छा..!!

आपले,
लोकेश, रुही व सोनू

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!
पण या मागची थोडी पार्श्वभुमी सांगितली तर बरे होईल.

@ महाश्वेता:
खूप खूप धन्यवाद ...!!
तुमचा प्रतिसाद माझासाठी अतिशय प्रेरणादायी आहे.
मी लेखन करण्यात नवा आहे .... मला फारसा काही अनुभाव नाही हो.
पण मी प्रयत्न करत राहील. धन्यवाद...!!

@ शाली :
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ..!!!
मी आणि सोनू आम्ही ३ वर्ष लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा येथील दवाखान्यात आणि आस-पास च्या २६ आदिवासी खेड्यांमध्ये आरोग्य विषयक काम केलं. नुकताच आमचा प्रोजेक्ट संपला. हॉस्पिटल स्टाफशी आमचं खूप घट्ट नातं झालय. त्यांचाच आठवणीत म्हणून मी हे त्यांना लिहिलं होतं. तेच मी मायबोली वर शेअर केलंय.
आणि मायबोली ने सुद्धा माझ्या भावना शब्द रूपात जपून ठेवण्यासाठी मला जागा दिली त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो.

@ हर्पेन:
थँक्स दादा. नक्कीच प्रयत्न करील.

Submitted by लोकेश तमगीरे on 17 June, 2019 - 10:36
ओह! हे मला माहित नव्हते. हे या अगोदर सांगितले आहे का कुठे? नसेल तर लेख संपादित करुन त्यात हे टाकले तर पटकन समजेल वाचकाला.
लेख नेहमीप्रमाणे उत्तमच. फोटोंचेही जमवा जरा. तुमच्या लेखांची मजा वाढेल फोटोंमुळे.

@शाली :
वाह ..!! ही छान सूचना दिली तुम्ही. मला माहिती नव्हतं. थँक्स ..!!

फोटो अपलोड करण्यासाठी मी खूप प्रयत्न केला. साईझ पण कमी केली पण फेल्ड म्हणूनच येत आहे.