मत्स्यपालन व्यवसायाबद्दल माहिती हवी आहे.

Submitted by सप्रस on 15 June, 2019 - 06:18

नमस्कार मायबोलीकर, वडील पुढच्या वर्षी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांना आमच्या गावी कोकणात मत्स्यपालन व्यवसाय सुरु करायचा आहे जेणेकरून दोन पैसे मिळतील आणि वेळही मजेत जाईल. तर कोणाला हा व्यवसाय कसा सुरु करायचा याबद्दल काही माहिती आहे का? काही शॉर्ट टर्म कोर्सेस वैगरे आहेत का मुबंईत?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

शेती कार्यक्रम पाहा त्यात पत्ते ,फोन नं, माहिती देतात.
अलिबाग परिसरात लोक शेततळे करून प्रॉन्स वाढवतात. तिथे मार्केटही आहे. यात समुद्री मासे वाढवत नाहीत.

रत्नागिरी - गणपुतीपुळे रस्त्यावर शिरगाव इथे फिशटँकसाठीचे पाळीव मासे वाढवायचे सरकारी केंद्र आहे. त्यांचा कोर्सही आहे. अधुनमधून हा कार्यक्रम असतो आमची माती आमची माणसे ,सह्याद्रीवर.

मुंबईमध्ये CIFE वर्सोवा तसेच तारापोरवाला मत्स्यालय येथे तुम्हाला हवीय ती माहिती मिळू शकेल. मायबोलीवर बागुलबुवा आयडीने बरेच लिखाण खुप पूर्वी करून ठेवलेले आहे. अधिक माहितीसाठी ह्या आयडीशी संपर्क साधू शकता.

सरकारी मत्स्यबीज संवर्धन केंद्र, गोरेगाव पूर्व ,न्युझिलँड डेअरी इथे आहे.

केंद्रीय संस्था - CIFT , Pusa, दिल्ली.
http://cift.res.in/cift-rac

कोची - १)

२) फेसबुक https://m.facebook.com/icarcift.cochin