बायकोचा जेवणातला इंटरेस्ट वाढवण्यासाठी काय करावे?

Submitted by सप्रस on 11 June, 2019 - 01:35

नमस्कार माझी सध्या उपासमार होत आहे. बायकोचा जेवणातला इंटरेस्ट पार उडालाय. काहीतरी करायचं म्हणून करत असते. चहा देते तर असं वाटतं की गरम पाणी पितोय. तीच कथा डाळ आमटीबाबत. मी तिला सांगितलं की यूट्यूब विडिओ बघत जा जरा तुझा इंटरेस्ट वाढेल परंतु काही फरक नाही. तर मला सगळ्यांना विचारायचं आहे की अशी कोणती युक्ती लढवावी की मला मस्त चमचमीत खायला मिळेल.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Postpartum depression च्या शक्यतेबाबत त्यांच्या (स्त्रीरोगतज्ज्ञ) डॉक्टरांशी बोलून बघता येईल.

हाफिसातून निघालात की रस्त्यात चमचमीत खात जा, मग घरी जाऊन डाळ भात थोडासा खायचा.
बायको आधीच पोस्ट प्रेगग्नन्सी चेंजेस मूळे डिप्रेस असेल, अजून जेवण बनवण्याच्या मुद्द्या वरून त्रास कशाला.
अशा वेळी वाद अवोईड करा.
घरी नॉन व्हेज न मिळणारे लोक बाहेर खातातच की नाही?

युटुब व्हिडिओ पाहुन जेवण बनविण्यातला इन्टरेस्ट वाढत नाही. तुमच्या पत्नीला बाळन्तपणानन्तरचे नैराश्य आले असावे हा कारवी यान्नी मान्डलेला मुद्दा बरोबर आहे.

त्याशिवाय बाळाच्या आगमनाने वाढलेली कामे व दगदग ही कारणेही आहेत. पुढील दिड वर्ष तरी यातुन तुमची सुटका नाही असे खात्रीशीर म्हणेन. हे तुम्हाला नाउमेद करण्यासाठी नाही तर, तुमची मानसिक तयारी व्हावी म्हणुन सान्गत आहे.

पुढील दिड वर्ष तरी यातुन तुमची सुटका नाही असे खात्रीशीर म्हणेन. --- +१११
जेवणाच्या चवीपेक्षा बाळ बाळंतीणीकड़े लक्ष्य द्यावे हे श्रेयस्कर !

मी माझा , योग्य पोस्ट ..

सप्रस , तुम्ही सुद्धा घरकाम वगैरे मध्ये पुढाकार घ्या . तेवढीच तुमच्या पत्नीला मदत होईल आणि उत्साह येईल

संप्रस तु सरळ पळुन जा घरातुन. बायको तरी सुटेल तुझ्या फालतुपणा तुन. मोदीचा आदर्श घे की रे ! का नुसतेच लाबुन आदर्श ! जा पळुन बाबा. घरचे सुटतील !

जा बाबा सप्रस हिमालयात जा तप करायला. घरचे हि सुटतील आणी माबो वाले सुटतील पकाउ आणी बायकांचा अपमान करणार्या धाग्यातुन

जेवण बनवणे ही काही मोठी अवघड कला नाही .
तुम्ही मनापासून try Kara .
खूप tasty जेवण बनवलं जाईल तुमच्या कडून .
कोणावर अवलंबून राहू नका .
किचन chya प्लॅटफॉर्म वर मस्त व्हिस्की चा पेग बनवून ठेवायचा .मस्त आवडीच संगीत लावायच किंवा gf la video call लावून मस्त एन्जॉय करत जेवण बनवायचं आहे काय आणि नाही काय त्यात

राजेश भाऊ पहिल्यांदा त्यांना काही....नी ट्रोल केले आहे. वर gf ला फोन वगैरे. अहो त्यांचं लग्न झालं आहे. धागा परत वाचा.

<<< मस्त चमचमीत खायला मिळेल. >>>
जेवणाला लोक इतकं महत्व का देतात हा मला नेहमी पडणारा प्रश्न आहे. कदाचित मी अशी ऑड व्यक्ती आहे जी जगण्यासाठी पोट भरते, पोट भरण्यासाठी जगत नाही.
आमच्या घरी उलट परिस्थिती आहे. दगदग होते म्हणून मी बायकोला सांगितले की इतका रोज रोज कशाला स्वयंपाक करतेस आणि ही ढीगभर भांडी घासायला टाकतेस. त्या ऐवजी फारतर आठवड्यात ३-४ दिवस स्वयंपाक कर, एरवी बाहेर जेऊ की लगेच तिचा पारा चढतो. नाही मुलांसाठी करते, तुझ्यासाठी काही करणार नाही, नको तर खाऊ नकोस असे ऐकावे लागते. मी तर हल्ली काही बोलतच नाही. पानात पडेल ते जेवायचे की विषय संपला. (हॉस्टेलवर राहिल्याचा फायदा म्हणतात तो असा.)

उबो वहिनी बरोबर आहेत. बाहेर जेवायचे म्हणजे दवाखाना भेट आलीच. हॉटेलमध्ये अजिनोमोटो सढळ हाताने वापरला जातो. कृत्रिम रंग टाकतात. मटण शिजवायला असा एक पदार्थ नाव सांगणार नाही टाकतात की मटण दोन शिट्ट्यांमध्ये शिजते.

बस का राव? बाहेर जेवायचे म्हणजे अगदी फॅन्सी हॉटेलच पाहिजे असे नाही. उदा: पुण्यामध्ये घरगुती डबा लावायचा किंवा बादशाही डायनिंग हॉलमध्ये जेवायचे असे उद्योग पूर्वी केले आहेत.

नोकरी करा, रोज प्रवास करा, मुलांचे अभ्यासाचे बघा ही कामं काय कमी असतात का? ( आम्ही कामे वाटून घेतली आहेत आणि मी घरातली वेगळी कामे करतो) त्यात भर म्हणून रोज सकाळ- संध्याकाळ रोज स्वयंपाक पण करा. बरं केला तर केला, त्यात फक्त पोळी-भाजी नको, कधी डोसे करा, पावभाजी करा आणि सतराशे साठ प्रकार. अरे पैसे टाका आणि डोसे आणि पावभाजी खाऊन या. पण कुणाला सुपरवुमन बनायचा अट्टाहास असेल तर काय करणार?

नशिबाने सुगरण बायको मिळाली आहे. माझ्या शेजारी एका कुटुंबात नवरोबाला पिठ मळून पोळ्या बनवाव्या लागायच्या. भाजी ७० टक्के तोच बनवायचा. बायको राजू असे कर तसे कर उपदेश देणार. वरून बिचारा कंपनीत माल चढ उताराची काम करीत होता.

नशिबाने सुगरण बायको मिळाली आहे. >>> माझी बायको पण सुगरण आहे, पण माझ्यासारखा अरसिक तिच्या नशिबी आला हे खरे दुर्दैव.

बिचारा कंपनीत माल चढ उताराची काम करीत होता. >>>
आयुष्य समाधानात जाण्यासाठी फक्त ४ जणांची साथ असणे जरुरीचे आहे. त्यापैकी २ म्हणजे आई-वडील, मग स्पाऊस (आयुष्यातील जोडीदार) आणि चांगला बॉस. यांना आपण निवडू शकत नाही, ते आपल्याला निवडतात. त्यामुळे हे ४ जण फार महत्वाचे आहेत. बाकी सगळे म्हणजे प्रवासातले साथीदार, आले काय नी गेले काय, फारसा फरक पडत नाही. अगदीच कुणी आवडले नाही, तर स्वतःहून दूर होता येते. म्हणून या ४ जणांशी जपून वागा, विशेषतः आपली बाजू कमकुवत असेल तर नक्कीच. (ही केवळ माझी फिलॉसॉफी आहे. इति बोकापुराण संपूर्णम.)

आशुचँप.... +1...

मला वाटतं वर कुणी तरी तसा उल्लेख केला आहे..

{
आयुष्य समाधानात जाण्यासाठी फक्त ४ जणांची साथ असणे जरुरीचे आहे. त्यापैकी २ म्हणजे आई-वडील, मग स्पाऊस (आयुष्यातील जोडीदार) आणि चांगला बॉस. यांना आपण निवडू शकत नाही, ते आपल्याला निवडतात. त्यामुळे हे ४ जण फार महत्वाचे आहेत. बाकी सगळे म्हणजे प्रवासातले साथीदार, आले काय नी गेले काय, फारसा फरक पडत नाही. अगदीच कुणी आवडले नाही, तर स्वतःहून दूर होता येते. म्हणून या ४ जणांशी जपून वागा, विशेषतः आपली बाजू कमकुवत असेल तर नक्कीच.
}
+११११११११११११२२११२२३३१११५

आयुष्य समाधानात जाण्यासाठी फक्त ४ जणांची साथ असणे जरुरीचे आहे. त्यापैकी २ म्हणजे आई-वडील, मग स्पाऊस (आयुष्यातील जोडीदार) आणि चांगला बॉस. यांना आपण निवडू शकत नाही, ते आपल्याला निवडतात. त्यामुळे हे ४ जण फार महत्वाचे आहेत. बाकी सगळे म्हणजे प्रवासातले साथीदार, आले काय नी गेले काय, फारसा फरक पडत नाही. अगदीच कुणी आवडले नाही, तर स्वतःहून दूर होता येते. म्हणून या ४ जणांशी जपून वागा, विशेषतः आपली बाजू कमकुवत असेल तर नक्कीच.>>>>> +111111

महाश्वेता
16 June, 2019 - 10:57
मला वाटत नाही कुठला डॉक्टर तुमच्यावर इलाज करू शकेल एक काम करा तुम्ही दोघांनीपण त्या राहुल गांधीचा चमचाभर मूत प्या थोडी अक्कल आली तर आली.

Submitted by सप्रस on 11 June, 2019 - 03:00

सगळ्यांनाच अभयदान दिल असेल, तर सांगा, मग आम्हीही अशी भाषा वापरतो.

Pages