असलो Non residential तरी...

Submitted by s_kiran22 on 6 June, 2019 - 05:58

असलो Non residential तरी
आहोत आम्ही भारतीयच हो
खात असलो बर्गर पिझ्झा तरी
भावते आम्हाला पिठलं भाकरीच हो
नका दूर लोटू आम्हा, आहोत आम्ही भारतीयच हो!

New York times च्या अगोदर सुद्धा
वाचतो आम्ही पुढारी अन् सकाळच हो
Trump तात्यापेक्षा जास्त भावतात आम्हाला
बाळासाहेब आणि थोरले पवार साहेबच हो
नका दूर लोटू आम्हा, आहोत आम्ही भारतीयच हो!

शिवजयंती असो वा दिवाळी
झाडून साजरे करतो सगळे सण आम्ही हो
महाराष्ट्र मंडळात आमच्या
गणपती सुद्धा बसवतो आम्ही हो
नका दूर लोटू आम्हा, आहोत आम्ही भारतीयच हो!

कमावत असलो थोडं जास्त तरी
बदल्यात खूप भोगतोसुद्धा आम्ही हो
ग्रीन कार्ड अन् सिटीझनशिपच्या चक्रव्युहात आडकून
आप्तेष्टांची लग्न अन् मयतं सुद्धा मुकतो हो
नका दूर लोटू आम्हा, आहोत आम्ही भारतीयच हो!

आमच्या परीने आम्ही
पाठवतो परकीय गंगाजळी हो
विदेशी क्लायंटला सुद्धा भारतालाच
प्रोजेक्ट द्यायला भाग पाडतो आम्ही हो!
नका दूर लोटू आम्हा, आहोत आम्ही भारतीयच हो!

किरण शिंदे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिल्या घरी तू सुखी रहा. कुछ पाने के लिये कुछ खोना पड्ता हय किरणभाऊ. रच्याकने पवार साहेब लोकप्रियतेत फार खाली गेले आहेत सध्या सोमेवर. यु आर फर्स्ट भारतीय. एनाराय डझंट मेक एनी डिफ्रंस.

कवितेतला आर्त भाव अस्वस्थ करून गेला.
गेयतेने मुग्ध करून टाकले. काही ओळी चल संन्यासीच्या चालीवर तर काही नन्हा मुन्ना राही हूं च्या चालीवर तर काही चना जोर गरम च्या चालीवर म्हणता येतात. अनिवासी अलंकाराची रेलचैल आहेच आहे याशिवाय संस्कृतीदर्शन, हतबलता, समृद्धी असे सगळेच आले आहे या काव्यात.
सरस्वती आणि लक्ष्मी दोन्हींचा संगम झालेली एकमेवाद्वितीय अशी ही कविता आहे.
मायबोलीने अशा रत्नांची जपणूक करायला हवी.

नका दूर लोटू आम्हा, आहोत आम्ही भारतीयच हो!>>> हे वेगळं सांगायची गरजच नाही. आणि ज्या लोकांना तुम्ही हे सांगण्याची गरज पडते, त्यांना काहीच सांगण्याची गरज नाही...

बाकी कविता छान आहे...

कवितेत भावना पोहचवणे महत्वाचे असते ,अन ते 100 टक्के साध्य झाले आहे +१११
कविता चालीतच म्हटली पाहिजे असे थोडेच आहे.‌ उपरोधिक टोला लगावणारांना मुळव्याध, बरे न होणारे चर्मरोग असतात असं संशोधन अलिकडे वाचलं आहे.

नका दूर लोटू आम्हा, आहोत आम्ही भारतीयच हो! असं भीक मागितल्यासारखं काय विव्हळताय? आप्तेष्टांची इतकी आठवण येतेय आणि खूप भोगावे लागतेय तर मारा लाथ त्या ग्रीन कार्ड अन् सिटीझनशिपवर आणि सुखाने रहा भारतात.

या या नक्की या भारतात
२०२४ला उपयोग होईल आपल्या त्या ह्यांना !
एक एक वोट की किंमत तुम क्या जानो परदेसी बाबु