"तू"

Submitted by mi manasi on 6 June, 2019 - 00:19

"तू"

क्षणी पालटली कळा
तूझा हात हाती आला
माझा रुतु बदलला।।१।।

नवा उगवला दिस
तुला बांधुनिया पाशी
भिरभिरे अवकाशी।।२।।

काही उरले ना काज
तुझा ध्यास निशीदिनी
तुच स्वप्नी जागेपणी।।३।।

जीव भारलेला असा
तुझ्या नावाच्या पुढती
सारी संपतात नाती।।४।।

भान काळाचे नुरले
आता आयुष्य ते किती
तुझ्या श्वासांची गणती।।५।।
.......।।मी मानसी।।

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मित्रानो धन्यवाद!
असाच लोभ असावा.
मन्यास ..मोबाईल मधून पेस्ट केलं होतं .' ऋ' ना तेव्हा सापडला नव्हता.
'नुरले' लय साधण्यासाठी आवश्यक आहे.

सुंदर

सुंदर -

( शेवटी मी मानसी हे सुद्धा पद्यात सूट होते आहे Happy )