कल आज और कल!

Submitted by ___akshata___ on 27 May, 2019 - 11:09

"ऐक ना अभि!"
"हो,बोल ना...लक्ष्य आहे रे माझा सिद्धार्थ !"
"प्रेम किती सुंदर भावना आहे.म्हणजे ज्या गोष्टी कधी करू असा स्वप्नात सुद्धा विचार केलेला नसतो त्या आपल्या आवडीच्या व्यक्तीसोबत असताना किती सहज शक्य होऊन जातात...म्हणजे स्वतःबद्दल विचार करताना किव्हा स्वतःसाठी स्वप्न पाहताना सुद्धा ती व्यक्ती हृदयात डोकावतेच...नव्याने कोणत्याही गोष्टीकडे पाहताना मन नकळत त्या व्यक्तीच्या आठवणींशी जोडले जाते.मी तर प्रेम या संकल्पनेच्याच प्रेमात पडत चाललोय हळू हळू आणि ती....ए तू ऐकतोयस ना? अभि काय पाह्तोएस एवढं निरखून मोबाईलमध्ये? बघू जरा मला पण...
"नाही काही नाही...तू बोल!"
"shit yarr! तो कोणा मुलीचा फोटो होता का? तू बंद का केलास? खरं सांग कोण होती ती?आणि तू मला कसं नाही सांगितलंस? दाखव मला लगेच...मला फोटो पण बघू देणार नाहीयेस का ! this is not fair abhi!"
"अरे थांब जरा...एका दमात किती प्रश्न विचारशील !आणि माझं काय घेऊन बसलास...तू तर तुझं सांगत होतास ना...ते पूर्ण तर कर...माझं काही विशेष नाहीये रे...मैत्रीण आहे इतकंच"
"मैत्रीण आहे आणि विशेष नाही? कि विशेष मैत्रीण आहे हा ? सांग रे.. सांगून टाक...मला तर समजूच शकतं.मी सुद्धा यातून जातोय ना सध्या! सांग...नाव काय आहे तिचं,कुठे भेटली आणि किती दिवस झाले तू माझ्यापासून लपवून ठेवलेस हे?" सिद्धार्थ तर almost उलटतपासणी घेत होता.
"अरे..असं काही नाहीये.....सांगितलं ना तुला..एकदा सांगून कळत नाहीये का तुला ?" कधी न रागावणारा अभि आज मात्र खूप चिडला होता.सिद्धार्थचे प्रश्न त्याला हैराण करत होते.
प्रेमात असलेल्याला सारे जगच प्रेम करतंय असं वाटणं साहजिकच होतं आणि सिद्धार्थचे तसेच काहीसे झाले होते पण अभिची अशी reaction त्याला समजत नव्हती.
"अरे,चिडतोस कशाला मी तुझी गम्मत करत होतो...इतकं ते काय झालंय?"
"Sorry! मी जरा overreact केलं पण तास काही नाहीये खरंच आता...आम्ही भेटलो सुद्धा नाही दीड-दोन वर्ष.."
"आता नाही म्हणजे आधी होतं का?"
"हो आमचं प्रेम होतं एकमेकांवर पण मी ते नाही टिकवू शकलो!"
"म्हणजे? जरा स्पष्ट बोलशील का?"
"आता काहीच राहिला नाही बोलण्यासारखं...तिचं खूप प्रेम होतं माझ्यावर...माझं सुद्धा पण काही गोष्टी घडत गेल्या आणि माझ्याही न कळत ते प्रेम हरवत गेलं..मला माझ्याच कॉलेज मधली दुसरी एक मुलगी आवडू लागली पण तिचं तरीही माझ्यावरचं प्रेम कमी झालं नाही...मला तिचं विश्वासघात केल्याचं दुःख होतंच..college नंतर ती मला परत भेटली नाही पण आज मागे वळून पाहताना वाटतंय कि मी तेव्हा तिचं प्रेम नाकारायला नको होतं...ती नेहमी म्हणायची कि प्रेम करायला किव्हा सोडून जायला,दोन्हीसाठी हिम्मत लागते पण त्याहीपेक्षा जास्त हिम्मत लागते वाट पाहायला...ती अजूनही वाट पाहत असेल का? नाही..."
"its okay abhi! तू चुकलास पण मग आता शोध तिला आणि sorry म्हण..कदाचित ती अजूनही थांबली असेल तुझ्यासाठी...you never know!"
"No,I know...आत्तापर्यंत तिला मिळाला हि असेल दुसरा कोणीतरी...किव्हा ४-५ जणांनी तर नक्कीच विचारलं असेल..."
"किती वेगळ्या आहेत न आपल्या गोष्टी...तुला प्रेम मिळालं तरी सुद्धा तू ते टिकवू शकला नाहीस आणि मी आयुष्यभर टिकवता येईल असं प्रेम शोधतोय..."
"आणि आता ते तुला मिळालाय ना ? प्रेमात पडलास ना कोणाच्यातरी तू सुद्धा ? नाहीतर प्रेमाबद्दल इतकं poetic उगाच नाही बोलत कोणी...लक्ष्य होतं माझं..by the way ओळी छान होत्या ह"
अभि हसला.
"ofcourse असणारच छान...पण माझ्या ओळी नाहीत या....मला जी मुलगी आवडते तिच्या आहेत..."
सिद्धार्थ सुद्धा खुश झाला.
"असं आहे तर...तुझ्यासारख्यासाठी परफेक्ट आहे मग हि लेखिका! पण मग विचारलं कि नाहीस अजून तिला ?"
"किती तरी वेळा अडून अडून विचारायचा प्रयत्न केला पण असा काही विषय निघाला कि ती बोलणंच टाळते...प्रेमाबद्दल लिहिते आणि प्रेमपासूनच दूर पळते..."
"विचारून टाक ह..आता पुन्हा कुठे पळून जायच्या आत विचारून टाक.."
अभि सिद्धार्थ ची टिंगल करू लागला.
"ती म्हणते,खरं प्रेम कितीही लांब असलं तरीसुद्धा वाट काढत तुम्हच्यापर्यंत पोहोचतच आणि..."
सिद्धार्थ ला बोलता बोलता अभि ने थांबवला आणि पुढे बोलू लागला.
"आणि जे पुन्हा तुमच्यासमोर येऊन उभं राहत नाही ते प्रेमच नसतं...बरोबर?"
सिद्धार्थ आवक होतो आणि मान डोलावतो.
"By the way siddharth,तू मला सांगितलं नाहीस तू मला का बोलावलास इथे ते.."अभि प्रश्नार्थक.
"Actually,कोणाला तरी भेटवायला...म्हणजे हीच ती जिच्या मी प्रेमात पडलोय.." सिद्धार्थ नि जवळ येणाऱ्या एका scarf घातलेल्या मुलीकडे इशारा केला.
"Meet my best friend,Ananya!"siddharth excite होऊन म्हणाला...
पण अनन्याचे बोलके डोळे आणि अभिची आश्चर्यदर्शक नजर एकमेकांच्या जुन्या ओळखीची साक्ष देत होते...अनन्याच्या हातावर अजूनही engagement ring नव्हती कारण तिच्या प्रेमाबद्दलच्या लिखाणामध्ये तिने जपून ठेवलेला तिचं प्रेम कधीतरी तिच्यासमोर येऊन उभं राहणार याची तिला मनोमन पूर्ण खात्री होती..पण आता मात्र निर्णय अनन्याला घ्यायचा होता...जुन्या नात्यांना विसरून तिला नवी ओळख देणारा सिद्धार्थच्या प्रेमाचा विश्वास मोठं कि अभिच्या नजरेत दिसलेलं,तिला पुन्हा जुन्या आठवणीत रमवणारं प्रेम मोठं ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लिखाण छान आहे...पण प्लाॅट जुनाच आहे..

प्रेमाचा त्रिकोण. सोडणं, योगायोग, पुन्हा भेटणं हे सगळं रटाळंवाणं वाटतं आता.. कितीतरी चित्रपटसुद्धा येऊन गेलेत हयावर..

सो, नवीन प्लाॅटवर लिहा.. छान जमेल तुम्हाला.

तुम्हाला डिमोटीवेट करण्याचा हेतू नाहीये.. positively घ्या..