यक्ष गंधर्व इत्यादी - माहिती हवी आहे

Submitted by साजिरी_11 on 27 May, 2019 - 09:19

आपल्याकडे पुराणकाळापासून यक्ष, गंधर्व यांचे उल्लेख सापडतात. गंधर्वांबाबत तर महाभारतातही आहेत. तर निव्वळ उत्सुकता म्हणून असं विचारायचं आहे की हे सगळे आणि अप्सरा आणि एकूणच देवलोक यात काही फरक आहे का.? यक्ष किंवा यक्षिणी, गंधर्व यांचं नेमकं काम काय असावं? अप्सरांबद्दल माहीत आहे ( तपभंग करणं किंवा एकूणच मनोरंजन तत्सम प्रकार) पण यक्ष आणि गंधर्वांची योजना काय असावी? तसंच इंद्र हे एक पद आहे. जो त्या पदावर विराजमान होतो तो इंद्र असं साधारणतः लॉजिक आहे. तर याबाबतही कुणाला काही माहीत आहे का.? यक्ष गंधर्व वगैरे प्रकार हे "देवांमध्येच" include आहेत की वेगळे आहेत.?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिमानवी देवता म्हणजे मानव आणि देव या दोहांच्यामध्ये एका देवसदृश्य योनीची कल्पना केलेली आहे.या योनीत अनेक जातीसंघ आहेत. नाग,विद्याधर,अप्सरा,यक्ष,राक्षस,गंधर्व, किन्नर,पिशाच्च, गृह्यक, सिद्ध आणि भूत अशी त्या संघाची नावे आहेत..देवांपेक्षा सामर्थ्य कमी पण मानवांपेक्षा मोठे आणि अदभु म्हणून यांना अतिमानव म्हटले आहे..

ओके.. नेमकी काय कार्य सोपवलेली असायची त्यांच्याकडे.? मुळात गंधर्वांची योजना काय असावी?

<<मुळात गंधर्वांची योजना काय असावी?>>
सगळा कल्पनेचा खेळ असल्याने मुळात काय योजना होती यापेक्षा त्यांच्या गोष्टी वाचून कळते की त्यांनी प्रत्यक्षात काय केले.
जसे मुळात भारतीय संस्कृती, धर्म काय होते नि आता लोक कसे वागतात यात जसा जमीन अस्मानाइतका फरक आहे तसे.

धन्यवाद अजय चव्हाण..बरंच मोठं मटेरियल आहे हे. त्यात स्वप्नं, त्यांचे संकेत वगैरेही आहे. डाऊनलोड केलंय. वाचते..

गंधर्व वयाने कमी असतात.
उदा. बाल, कुमार, किशोर

मला गंधर्व होऊन अप्सरांसोबत गहन चर्चा करायच्या आहेत.

मला गंधर्व होऊन अप्सरांसोबत गहन चर्चा करायच्या आहेत.
अप्सरा मौशी तुमचे खाऊ देऊन कौतुक करतील ,खेळायला जा हं सांगतील. कारण गंधर्व वयाने कमी असतात.
उदा. बाल, कुमार, किशोर