दुष्काळ ते सुगीचे दिवस

Submitted by वैशाली अ वर्तक on 24 May, 2019 - 05:59

दुष्काळ ते सुगीचे दिन
चित्र अधारित कात्य कविता

झळा ऊन्हाच्या सहूनी
धरा पहा भेगाळली
वाट पहाते मृगाची
पाण्यासाठी आसुसली

वाट पाही बळीराजा
काळ्या ढगांना पाहूनी
दृष्टी तयाची आकाशी
वरुणास विनवूनी

कष्ट करुनी उन्हात
काळ्या मातीला कसून
नांगरली काळी माय
घाम तयात गाळून

पाणी पडले मृगाचे
बीजे पहा अंकुरली
आनंदला अन्नदाता
स्वप्ने मनी रंगवली

शेते दिसती हिरवी
किती सुरेख रेखीव
जणू रेखाटल्या कोणी
ओळी हिरव्या आखीव

शोभिवंत भासे शेत
मोती जणू कणसात
वरुणाच्या कृपेनेच
सुख आले शिवारात

पीक आले भरघोस
मोल मिळाले कष्टाचे
दिसे दारी धान्य रास
दिन दाविले सुगीचे

देवाजीने केली कृपा
स्वप्न सत्यात उतरले
राजा राणी पोरं बाळे
घर सारेआनंदले.

आनंदाने गृहलक्ष्मी
पाही तिच्या धन्याला
धनी माझा राहो सुखी
करी विनंती देवाला

Group content visibility: 
Use group defaults

सुंदर ! आवडलेली काव्यपंक्ती

पाणी पडले मृगाचे
बीजे पहा अंकुरली
आनंदला अन्नदाता
स्वन्पे(कि स्वप्ने)मनी रंगवली

Please edit कराल. Happy
पु.ले.शु ! Happy

प्रचंड सुंदर! मी अजूनही कसं का होईना शेतीची नातं जोडून असल्याने प्रचंड भावली!
या वर्षी असाच भरपूर पाऊस पडून शेतीला पुन्हा बहर येवो हीच इच्छा!!

पु.ले .शु खूप धन्यवाद
व edit पण केली .पुन्हा सुचनने साठी धन्यवाद .मी आज प्रथच edit करायला शिकले तुमच्या मुळे .तसेच चूकून दोनदा पोस्ट झालेले साहित्य कसे cancel होते

Cancel नाही करता येत बहुतेक. तुम्हाला admin ना विपु करून धागा delete करायला सांगव लागेल..,पण नेमकं माहित नाही. Happy

शाली ...
फेसबूक वर एका साहित्य समुहावर 9 कापून चित्रे दुष्काळ ते सुगीचेदिन अशी दिली होती
म्हणून कात्यचित्र आधारित कविता स्पर्धा होती .त्यात माझ्या कवितेला पहिला क्रमांक मिळाला.

अज्ञातवासी
प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद खरच यावेळी मेघराजाची कृपा होवो.व सुगीचे दिन येवोत

अज्ञातवासी
प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद खरच यावेळी मेघराजाची कृपा होवो.व सुगीचे दिन येवोत