रागा भाजपचे गुप्तहेर आहेत का?

Submitted by बोकलत on 24 May, 2019 - 04:48

आपल्या सगळ्यांना माहित आहेच कि काँग्रेसचा दारुण पराभव झालेला आहे. सोशल मीडियावर रागाची टर खेचली जात आहे. आता सोशल मीडियाही भरपूर पॉवरफुल झाल्यामुळे रागांचे बालिश चाळे जसे कि पंतप्रधानांना डोळे मारणे, भाषणात हास्यापद बोलणे या सगळ्या गोष्टी जनतेसमोर आल्या आणि त्याचा दुष्परिणाम म्हणून काँग्रेसला मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. तर या सगळ्यांची जबाबदारी रागाने उचलली असून उद्या ते राजीनामा देणार आहेत, तर तुम्हाला काय वाटत राहुल गांधी यांनी राजीनामा द्यावा की नको? कारण जर का राजीनामा दिला नाही तर २०२४ ला पुन्हा मोदीजी निवडून येतील आणि काँग्रेस पक्ष इतिहास बनून राहण्याची चिन्हे आहेत.

आता रागा राजीनामा देणार होते परंतु तो फेटाळून लावण्यात आला आहे. तर वरील सगळा घटनाक्रम पाहता रागा हे मोदींनी काँग्रेसमध्ये पाठवलेले गुप्तहेर आहेत कि काय अशी शंका येऊ लागली आहे. राहुल गांधी यांचा राजीनामा फेटाळला गेला म्हणजे २०२४ साली मोदीजी पुन्हा निवडून येणार अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

धुळवड अजून सुरूच आहे वाटते... Proud
'भरत' यांनी स्विकारला तर राहुल गांधी यांनी जरूर राजीनामा द्यावा. त्या दोघांवर सोडून द्या. आपण फक्त अपडेट ची वाट पाहुयात.

बिलकुल नाही
कधीच टोकाचं विषारी मत n मांडणारे राहुल गांधी जिंची देशाला गरज आहे

राजिनामा देऊन तो न स्विकारण्याचा फार्स पार पडलेला आहे कालच.. आता एवढ्या उशिरा धाग्याचा काय उपयोग...

रागाचा राजिनामा कोण स्विकारणार हा मोठा प्रश्न आहे.

भाजपला रागा ची नितान्त गरज आहे. तेव्हा त्याचा राजिनामा कोणीही स्वीकारणार नाही अशी आशा करतो.

मी माझा
आता झाली निवडणूक आता राहुलजी ना अरेतुरे नका करू

>>राहुल गांधींच माहित नाही पण इतरांचे राजीनामा सत्र सुरू झाले आहे.
रोज एक या न्यायाने ५० दिवसात अपोआप पक्ष विरघळेल. मग शेवटी राहुल गांधी स्वतः स्वताचा राजिनामा मंजूर करतील.
मोदी है तो मुमकीन है! Happy

अरेतुरे नका करू

Submitted by Rajesh188 on 24 May, 2019 - 14:56 >>>

राजेशभाऊ, आपण विक्रमवीर सचिन तेन्डुलकरला "तो" सचिन म्हणतो कि नाही? तसाच राहुल हाही राजकारणी मनोरन्जनातला एक विक्रमवीर आहे.
आता तर तो भाजपचा छुपा कार्यकर्ताही झालाय. अशा वेळी प्रेमाने त्याला अरे तुरे करण आलच.

पण इतरांचे राजीनामा सत्र सुरू झाले आहे.>>>
ते पंजांब मधले एक खिलाडू मंत्री राहुलजी अमेठीत हारले तर राजीनामा देणार होते त्यांनी दिला का?

पंजांब मधले एक खिलाडू मंत्री राहुलजी अमेठीत हारले तर राजीनामा देणार होते त्यांनी दिला का?>> नुसता राजीनामा नाही. राजकारणच सोडणार होते.

सिध्दू सारख्या बोलघेवड्याला वाटलं राजकारण म्हणजे कॉमेडी सर्कस आहे आणि पठ्ठ्या काही वाट्टेल ती बेताल बडबड करत सुटला. पण आता त्याच्याच पक्षातल्या दिग्गज नेत्यांना कळून चुकले आहे की याच्यामुळे आपलेच नुकसान होत आहे. याची गत तर " धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का " अशी होणार आहे.

Tomorrow, Rahul Gandhi will give his resignation to Rahul Gandhi which will be rejected by Rahul Gandhi because Rahul Gandhi says resignation is not a solution to the problems created by Rahul Gandhi.
Rahul Gandhi will then request Rahul Gandhi to continue to guide the Congress which Rahul Gandhi will accept and thank Rahul Gandhi for reposing faith in Rahul Gandhi.

अहो त्या प्रियांका गांधी आहे ना उगवता तारा? मग त्यांना का नाही करत काँग्रेसची अध्यक्ष?
तसेहि काँग्रेसमधे इंदिरा, सोनिया यांच्या सारख्या बायकांनीच काँग्रेसला चांगले दिवस दिले होते.
नेहेरूंनंतर कोण हा एक भला मोठा प्रश्न देशाला अनेक वर्षे सतावत होता. त्यानंतर शास्त्री लवकरच गेल्यावर, इंदिराने पक्ष सांभाळला नि सत्तेत ठेवला.
इंदिरा गेल्यावर नि राजीव गांधी गेल्यावर सोनियानेच पक्ष सांभाळून उभा केला नि २००४ मधे व २००९ मधे दोनदा पक्षाला बहुमत मिळवून दिले.

खरंच राहुल गांधी यांनी राजीनामा देऊन संपूर्ण भारताचा दौरा करावा, लोकांमध्ये जाऊन मिसळावे, ग्राउंड लेव्हल काम करून लोकांच्या हाल-अपेष्टा किंवा लोकांच्या अपेक्षा समजून घ्याव्यात आणि मग परत यावे. अजूनही त्यांच्याकडे तो करिश्मा आहे हे केरळच्या ८.५ लाख मतांनी झालेल्या विजयाने दिसून येतंय.
आणि आता सरळ सगळ्या रिस्क घ्याव्यात. हवं तर मी म्हणेन एखाद्या राज्याच्या निवडणुकीत काँग्रेसची सत्ता आली ना, तर सरळ आधी मुख्यमंत्री बनावं, काम करून दाखवावं. किती दिवस दिल्लीच्या आलिशान महालात राहणार आणि निवडणुकीच्या सहा महिने आधी भारत फिरणार?
नाहीतर सरळ ज्योतिरादित्य सिंधिया, सचिन पायलट यांना राष्ट्रीय अध्यक्ष किंवा विरोधी पक्षनेता करून मोकळं व्हावं.
खर्गे कितीही हुशार असले, तरीही त्यांच्यात तो करिश्मा नाही... तिथे जनतेच्या हृदयाला हात घालणाराच माणूस हवा...

उद्या जर रागाने राजीनामा दिला तर हे आयुष्य किती नीरस होईल. अनेकांच्या आत्महत्या रागाने आपल्या विनोदी भाषणाने थांबवल्या आहेत. जर रागाने राजीनामा दिला तर मी संसारातून सन्यास घेणार आणि माझं उर्वरित आयुष्य कोणत्यातरी घनदाट अरण्यात रागाचे व्हिडिओ पाहून व्यतीत करणार.

अहो त्यांनी देशाच्या प्रगती साठी खूप महान कार्य केले आहे, त्यांच्या मुळेच जवळपास ३ लाख ६० हजार कोटी दर वर्षाला वाचणार आहेत , कित्येक लोकांना त्यांनी आपल्या कॉमिक टाईमिंग ने मंत्रमुग्ध केले आहे , त्यांच्यामुळे नोबिता आणि भीम ला थोडे दिवस वाईट आलेत पण हरकत नाही. पण अजिबात त्यांनी राजीनामा देऊ नये . मोदीने मुळे त्यांना जो आता वेळ मिळाला आहे तो त्यांनी बँकॉक मध्ये वाया न घालवता गृहस्थाश्रमात घालावा , निदान समस्त चापलुसी मंडळींना परत सतरंजी उचलवायला वारस लाभल...

कांग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला ने कहा, 'ऐसे कठिन हालात में हमें राहुल गांधी के नेतृत्व की जरूरत है'---> Lol

मे २०२४ मधील ठळक बातमी: निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा विजय मिळवल्याबद्दल मोदी आणि भाजपचे अभिनंदन

मी कालच मोदीजींचा सिनेमा पाहिला त्यामध्ये जेव्हा ते संघात काठी खेळत असतात तेव्हा बाजूलाच रागासदृश्य मनुष्य दाखवलाय.

मी कालच मोदीजींचा सिनेमा पाहिला त्यामध्ये जेव्हा ते संघात काठी खेळत असतात तेव्हा बाजूलाच रागासदृश्य मनुष्य दाखवलाय.>>>>> काहीही हं !! बोकलत Proud मग रागा तर त्यावेळी कुक्कुल्या असेल की अंगठा चोखणारा. Cheerful Dancing Baby

>>जेव्हा ते संघात काठी खेळत असतात तेव्हा बाजूलाच रागासदृश्य मनुष्य दाखवलाय.<<

रागा आणि शाखेत?
DJ अहो काय ऐकतोय हे मी? Proud