Submitted by निशिकांत on 22 May, 2019 - 00:20
गर्तेत संकटांच्या
मी बंडखोर हसतो गर्तेत संकटांच्या
भिरकावल्यात कुबड्या जगण्यास वास्तवांच्या
अंदाज बांधता का पाहून सुरकुत्यांना ?
मी भोवर्यात जगलो कित्येक वादळांच्या
ना आमदार आई ना खासदार बाबा
जन्मेल काय नेता गल्लीत कस्पटांच्या?
सुटतात प्रश्न थोडे, उरतात शेकड्याने
जगण्यास अर्थ मिळतो, शोधात उत्तरांच्या
लाखो पतंग असुनी जळतेय शांत ज्योती
देते नकार विझण्या वस्तीत लंपटांच्या
सिंहासनास फुटती ज्या ज्या क्षणी धुमारे
का हाव फक्त दिसते नजरेत वारसांच्या?
गावास वेस होती, हनुमान रक्षिण्याला
गेला कुठे? न येतो मदतीस वंचितांच्या
वडिलासमान मुलगा लुटण्यास सज्ज झाला
खो खो अखंड चालू धंद्यात डॉक्टरांच्या
विश्वास ठेवल्याने विश्वासघात होतो
खेळ्या अगम्य असती "निशिकांत" आपुल्यांच्या
निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भिरकावल्यात कुबड्या जगण्यास
भिरकावल्यात कुबड्या जगण्यास वास्तवांच्या>>> हे नाही समजले.
बाकी गझल मस्तच.