कलाटणी (एक सत्य)

Submitted by प्रांजलीप्रानम on 21 May, 2019 - 07:56

कलाटणी (एक सत्य)
आयुष्यात प्रत्येकाला
सर्वच काही मिळत नसतं,
"नशिबात नव्हतं"
म्हणताना
मिळालेलं दृष्टिआड होत असतं.

आयुष्यात प्रत्येक वळणावर
आपण काही घेत असतो,
"नशिब आजमावलं"
म्हणताना
निसटलेलं दुर्लक्षित होत असतं.

आयुष्यात प्रत्येक सुखाला
दु:खाचाही एक पदर असतो,
"सुखावलं"
म्हणतानाही
डोळ्यातून एखादा
अश्रूच
ओघळत असतो,

आयुष्यात प्रत्येक गोष्टीची
ठराविक अशी
एक वेळ असते,
"संपलं सारं"
म्हणतानाच अगदी
बरेचदा
नशिब कलाटणी देऊन बसते.
.....प्रांजली.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

"नशिब आजमावलं"
म्हणताना ,
मिळालेल्या गोष्टीचीच नशा इतकी असते,
कि,नेमकं त्यावेळी जे गमावलेलं किंवा निसटलेलं असतं त्याची किंमत थोडीफार
(कदचित जास्तही,)आपल्याकडूनच कमी होऊन जाते- त्या आनंदापुढे.

मला वाटले की हवे ते मिळाले तरी मानसाचा स्वभाव नेहमी जे आहे त्याचा आनंद न घेता जे निसटलय त्यासाठी झुरत राहतो.

हो बरोबर आहे,
प्रवृती पण असतेच ना! मनुष्य स्वभावात.