कन्ट्री म्युझिक

Submitted by Mandar Katre on 19 May, 2019 - 11:48

अमेरिकन कन्ट्री म्युझिक ऐकणारे इथे कोणी आहेत काय ?
त्या संगीतातील प्रमुख प्रकार / गायक कोणते ?
चांगली / लोकप्रिय गाणी ऐकण्यासाठी कोणत्या गाण्यांची शिफारस कराल ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कन्ट्री म्युसिक नक्की काय असतं माहिती नाही. पण मला ८०-९० च्या दशकातली गाणी तूनळीवर ऐकायला मिळतात. मला त्यांचं संगीत सुद्धा खूप आवडत. मी तुम्हाला सेरेन्डीपीटी मधील गाणी ऐकायला सुचवेल. त्यातली सगळी गाणी नितांत सुंदर आहेत. सिनेमाही माझा खूप आवडता आहे.

कंट्री म्युझिक हे टेनसी (किंवा केंटकि) बर्बन सारखी अ‍ॅक्वायर्ड टेस्ट आहे. सुरुवातीला ऐकताना सुमधुर वाटेल, पण गायकांच्या हेवी सदर्न अ‍ॅक्सेंट मुळे गाण्यांचे बोल कळणार नाहित. त्याकरता कान तयार व्हायला वेळ लागतो. गायकांची नावंच द्यायची झाली तर गार्थ ब्रुक्स, जॉनी कॅश, केनी रॉजर्स. अ‍ॅलन जॅक्सन, रिबा मॅकंटायर, केरी अंडरवुड (अमेरिकन आय्डल विनर) यांची गाणी बिलबोर्डवर असतात...

इथे असाल तर रेडिओवर कंट्री म्युझिक एफएम स्टेशन्सवर गाणी ऐकता येतील अथवा कुठल्याहि म्युझिक स्ट्रिमिंग (अ‍ॅपल, स्पॉटिफाय इ.) सर्विसवर या जॉनरंची गाणी ऐकता येतील...

युट्युब वर the highwaymen country group असा सर्च करा. हा सुपर ग्रुप होता कारण ग्रुप चा प्रत्येक मेम्बर इंडिव्हिजुयली ग्रेट आहे. Johnny Cash, Waylon Jennings, Willie Nelson, Kris Kristofferson हे ग्रुपचे मेम्बर. ग्रुप ची गाणी ऐकून झाली की प्रत्येक मेम्बर च्या नावाने सर्च करून गाणी ऐका. मेम्बरच नाव आणि त्यापुढे "greatest" असा शब्द जोडून सर्च केलात तर चांगल कलेक्शन मिळेल.
Dixie Chicks या ग्रुपची सुद्धा गाणी जरूर ऐका.

सध्याच्या पिढीत ब्लेक शेल्टन मोठे नाव आहे. 'व्हॉईस' मध्ये जज/कोच म्हणूनही येतो तो (one of the most sought after coaches).
नॅशविलमध्ये बर हॉपिंग करत लाईव कंट्री म्युझिकची मजा घेणे आजवर दोनदा केले.... दोन्ही अगदी मेमोरेबल संध्याकाळ होत्या, 'अमेरिकन मुशायरा' म्हणता येईल असा मोहोल.
डॉली पार्टन अजून एक बडे प्रस्थ ह्या क्षेत्रातले.