तुम्ही यंदा मतदान का केले? किंवा का केले नाही?

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 May, 2019 - 18:06

यंदा मी तरी मतदान केले नाही.

सुजाण नागरीक झाल्यापासून ही आयुष्यातील दुसरीच वेळ जेव्हा मी मतदान केले नाही.

पहिली वेळ जेव्हा ऑफिसमधून हाल्फ डे कन्सेशन घेऊन मी गर्लफ्रेंडसोबत फिरायला गेलो होतो. या वयात असे बरेच जण करत असावेत. त्याचे तेव्हा काही फार वाटलेही नव्हते.

यावेळी मात्र मी ठरवून कोणालाच मत दिले नाही.

तर का दिले नाही?

मी आजवर सेना-भाजप युती, मनसे, काँग्रेस, अखिल भारतीय सेना, आम आदमी पार्टी, आणि अपक्ष अश्या विविध पक्षांना मत दिले आहे. मी कोणत्याही पक्षाचा झेंडा घेऊन फिरत नाही जे काहीही विचार न करता, उमेदवार कोण काय न बघता, बस्स जावे आणि त्या पक्षाचे चिन्ह असलेले बटण दाबून यावे. मी नेहमी काहीतरी ठरवून आणि विचार करूनच बटण दाबतो. ज्याचा मला अभिमान आहे. पण ते बटण यावेळी दाबले नाही. कारण ....

१) यंदा मला विभागातील एकही उमेदवार मी मत द्यावा या योग्यतेचा वाटला नाही.

२) त्यांचे लीडर, राष्ट्रीय नेतेही या योग्यतेचे वाटले नाहीत.
याला काढा त्याला झाका सारे सारखेच वाटले. देशाची वाट लावण्यास सारेच एकसमान सक्षम वाटले.

३) मित्र म्हणाले की मग वाईटातून त्यातल्या त्यात कमी वाईटाला निवड.
हा मुद्दा योग्य वाटला. पण वाईटातून कमी वाईट निवडायला एका वाईट उमेदवाराच्या समोरचेच बटण दाबणे तत्वत: पटले नाही.

तसेच सध्याच्या परीस्थितीत ईतके सडके आणि जाहीरातबाज राजकारण पाहून मी ईतका गोंधळून गेलो आहे की कोण कमी वाईट आहे हेच समजेनासे झालेय. मग उगाच तो चुकीचा वा अंदाजपंचे निर्णय तरी का घ्यावा?

हे म्हणजे त्या कौन बनेगा करोडपतीमधील पब्लिक पोल सारखे झाले. प्रश्न अवघड असेल तर शंभरातल्या पाच दहा जणांनाच त्याचे उत्तर माहीत असते. पण तरी सारे पब्लिक उत्तर द्यायचा अधिकार आहे म्हणून तो वापरतात आणि A B C D आपल्याला वाटेल ते बटण दाबतात. परीणामी चारही पर्यायांना जवळपास सारखीच टक्केवारी लाभते आणि योग्य उत्तर त्यात दडून जाते. मला तसे होऊ द्यायचे नव्हते. तर ज्यांना अक्कल आहे त्यांनीच योग्य निर्णय घ्यावा म्हणून मी माझे मत बाद केले. मतदान केलेच नाही.

वि. नों. - मी मतदान करणार नाही हे आधीच ठरल्याने मी ऑफिसला सुट्टी नको असे कळवले होते. पण ऑफिसने मात्र तू मतदान कर वा नको करूस आम्हाला सरकारी आदेशानुसार सुट्टी द्यावीच लागणार म्हणत माझा अर्ज नामंजूर केला. त्यामुळे त्या दिवशी कामावर जायची ईच्छा असूनही मला घरी बसून सुट्टी उपभोगावी लागली.

असो,
तर ज्यांनी यंदा मतदान केले त्यांनी का केले? आणि ज्यांनी कोणी नसेल केले त्यांनी का नाही केले हे ईथे सांगावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लायक उमेदवार नाही म्हणून मतदान नाही हा ट्रेंड असाच पुढे कायम ठेवलात तर काही वर्षांनी मतदान करायची संधीच मिळणार नाही....

बाकी निर्णय तुमचा.

मी कायम मतदान करते. माझे मत कायम देशाच्या विकासासाठी असते.

{याला शब्दात पकडावे मोड ऑन:
सुजाण नागरिक झाल्या पासून.....पहिली वेळ जेव्हा ऑफिसमधून हाल्फ डे कन्सेशन घेऊन मी गर्लफ्रेंडसोबत फिरायला गेलो होतो.... मतदान केले नाही. हे सुजाण नागरीकाचे लक्षण आहे का?

:याला शब्दात पकडावे मोड ऑफ}

मला सुद्धा यंदा कोणाला मत द्यावे हा यक्ष प्रश्न पडला. हैद्राबादला विधानसभेला स्थानिक पक्ष आहेत चांगले ते बऱ्यापैकी कामे करणारी, तिथे विशेष प्रश्न पडत नाही.

लोकसभेला स्थनिक पक्षाच्या उमेदवाराला द्यावे का? तो निवडून आला तरी त्याचा उपयोग केंद्रात भाजप किंवा काँग्रेस गटबंधन यालाच होणार, असे विचार डोक्यात येत होते. नोटा पर्याय असल्याने मतदानाला दांडी मारण्याचा मात्र विचार नाही केला.
केले मतदान.

सोशल मीडीयावरचा एक भोसरीचा मित्र आहे. सन्माननीय भोसरी निवासी आहे. हा मनुष्य गेली कित्येक वर्षे निवडणुका झाल्या की मतदान करावे का ? का करावे ? काय मिळते अशा अर्थाच्या चर्चा सोशल मीडीयात सुरू करत असतो. या वेळी मात्र त्याच्या बोटावरची शाई मी माझ्या डोळ्यांनी पाहिली आणि मतदानाच्या संध्याकाळी त्याची मतदान का करावे या अर्थाची पोस्टही. पठ्ठ्या दर वर्षी मतदान तर करतोच पण बूथ एजंट म्हणून कामही करतो अशी माहिती त्याच्या भोसरीच्या मित्रांनी दिली.

काय बोलायचं आता याला ?

माझे मत कायम देशाच्या विकासासाठी असते.
Submitted by साधना on 19 May, 2019 - 06:02
>>>>>

एक्झॅक्टली साधनाजी, मलाही माझे मत देशाच्या विकासासाठीच द्यायचे होते. पण तो करण्यास एकही योग्य उमेदवार वा पक्ष सध्या दिसत नव्हता. मग जो देशाला कमीत कमी अधोगतीकडे नेईल त्याला मत देऊया म्हटले तर तो देखील कोण हे समजत नव्हते.

एक उदाहरण देतो,
टिक टिक टिक टिक करत एक टाईमबाँम्ब चालू आहे. तो निकामी करायला पिवळी किंवा लाल यापैकी एखादी वायर कापायची आहे. पण नक्की कोणती वायर कापावी याचे मला जराही ग्यान नाही. तर अश्यावेळी मी काय करावे? जो ग्यानी ईसम आहे त्याच्यावर निर्णय सोपवावा? की मला लाल रंग आवडतो म्हणून पिवळी वायर कापावी?

पहिली वेळ जेव्हा ऑफिसमधून हाल्फ डे कन्सेशन घेऊन मी गर्लफ्रेंडसोबत फिरायला गेलो होतो.... मतदान केले नाही. हे सुजाण नागरीकाचे लक्षण आहे का?
>>>>>

अहो हे सुजाण नागरीकाचे लक्षण नाही म्हणून तर खास अपवादात्मक वर्तन म्हणून नमूद केले आहे Happy

पण तो करण्यास एकही योग्य उमेदवार वा पक्ष सध्या दिसत नव्हता>>>>>

दगडांमध्ये वीट शोधायची. तुम्हाला सगळे सुस्थितीत हवे तर आधी हे लोक जिथे उगम पावतात ती समाज नावाची मैली गंगा साफ व्हायला हवी. ते काम आपल्या हातात आहे. खुद को बदलो, देश भी बदलेगा.

नोटा पर्याय असल्याने मतदानाला दांडी मारण्याचा मात्र विचार नाही केला.
>>>>

अहो पण सरकारने नोटाबंदी केली होती ना?? Happy

जोक्स द अपार्ट, तुम्ही नोटा पर्याय निवडला असेल तर जे मी घरी बसून केलेय तेच तुम्ही तिथे जाऊन बटण दाबून केलेय. काहीही फरक नाही Happy

आणि हो, मला नोटा पर्याय निवडावा असे का वाटले अशी चर्चा तुम्ही याच धाग्यात करू शकता.

खुद को बदलो, देश भी बदलेगा.
Submitted by साधना on 19 May, 2019 - 18:11

>>>>

छान वाक्य आहे. नोट करून ठेवतो.
कोणी देशाच्या स्थितीवर भाष्य केले, भ्रष्टाचार वा महागाईबद्दल उखडले, पावसाळ्यात रस्त्यावर पडणारया खड्ड्यांबद्दल बोलले, अस्वच्छता, रोगराई, खून, बलात्कार कश्याबद्दलही निषेध व्यक्त केला, गेला बाजार कोणी मायबोलीच्या दर्जा वर्जाबद्दल बोलले तर त्या प्रत्येकाला सुनावता येईल Happy

काय बोलायचं आता याला ?
Submitted by किरणुद्दीन on 19 May, 2019 - 12:14

>>>>

मास्टरमाईंड बादशाह जेम्स बाँड झिरो झिरो सेव्हन.
आपण मतदान करतो ईतकेच नाही तर त्या दिवशी पोलिंग एजंट म्हणून काम करतो याचा थांगपत्ता ईतकी वर्षे त्याने एकालाही लागू दिला नाही Happy

जोक्स द अपार्ट, आपला मुद्दा स्पष्ट होत नाहीये त्या पोस्टमधून.

याचा थांगपत्ता ईतकी वर्षे त्याने एकालाही लागू दिला नाही >>> सोशल मीडियावर रिअल लाईफचा थांगपत्ता लागू न देणे हे नवल आहे का ? किमान तू तरी असे बोलू नये Wink

सोशल मीडियावर रिअल लाईफचा थांगपत्ता लागू न देणे हे नवल आहे का ?
>>>

ती व्यक्ती टोपणनावाने लिहीत होती का?
मग तुम्ही पाहिली ती व्यक्ती तीच कश्यावरून?
अश्यावेळी अफवांचा पूर आणि संभ्रमाचे पीक येते.

मी केलंय माझं पहीलं मतदान. Happy
साधनाताईना अनुमोदन
आपण आपला हक्क सांगतो,पण कर्तव्य करायला सोयीस्कररित्या काचकुच करतो.हे अजिबात योग्य नाही.

सुजाण नागरीका, नोटाचे प्रमाण वाढले की त्याला केवळ निषेध नोंदणी म्हणून बाजूला ठेवणे सोडून त्याची योग्य दखल घेतली जाईल, नविन कायदा येण्याची दाट शक्यता निर्माण होईल.
तेव्हा कुणालाच मत द्यायचे नाही हे निश्चीत झाले की जाऊन नोटाला मतदान कर.

मानवमामा, तसा कायदा बदललाच तरी फक्त उमेदवार रद्द होतील. राजकीय पक्षे आणि त्यांची नेतृत्वे तीच राहणार.

आपण आपला हक्क सांगतो,पण कर्तव्य करायला सोयीस्कररित्या काचकुच करतो
>>>

मत देणे हे आपले कर्तव्य आहे की हक्क??

माझ्यादृष्टीने मतदान हे कर्तव्य आहे. जे आपण आपल्या देशाच्या प्रगतीसाठी,येणार्या पिढीसाठी करतो/करायलाच पाहिजे.

दर पाच वर्षानी एकदाच आपण आपल्याच कामांसाठी एक उमेदवार निवडून देऊ शकतो आणि एक सामान्य नागरिक सक्रिय लोकशाहीत सहभागी होऊ शकतो. म्हणून कदाचित बाकीचे मतदानाला हक्क म्हणत असावेत.जो आपण न चुकता बजावलाच पाहिजे.

मतदान करणे हा आपला हक्क आहे.
ईच्छा नसल्यास मतदान न करणे, आपल्यापुरते त्यावर बहिष्कार टाकणे हा देखील आपला हक्क आहे.
एखाद्याला जबरदस्ती मतदान करायला लावणे वा मतदान करण्यापासून रोखणे हे दोन्ही या हक्कांवर गदा आहे.
कर्तव्य वगैरे ऐकायला शब्द छान वाटतात.
जर तुम्हाला खरेच योग्य निर्णय घेता येत नसेल तर लोकं काय बोलतील या भितीने किंवा फेसबूकवर सेल्फी टाकायच्या हौसेने मतदानाचा हक्क बजावणे चूक आहे.
पण तसे नसल्यास नक्की मत देऊन देशाला योग्य सरकार देण्यास हातभार लावावा.

तुम्ही नोटा पर्याय निवडला असेल तर जे मी घरी बसून केलेय तेच तुम्ही तिथे जाऊन बटण दाबून केलेय. काहीही फरक नाही >>>> हा समज चुकीचा आहे. जर एखद्या मतदार संघातील एका विशिष्ट प्रमाणापेक्षा जास्त लोकांनी (याचे % ठरलेय, मला आठवत नाहीये) नोटा ला मत दिले, तर उमेदवार बदलण्याची तरतूद आहे.

जर तुम्ही दरवर्षी कर भरता तर तो का भरता..,तुम्हाला चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणुनच ना.
मग पाच वर्षातून एकदाच मतदानाची संधी मिळते आपल्याला आपलं मत मांडायची. स्वतःच्या आणि देशाच्या चांगल्या भवितव्यासाठी तरी संधीचा वापर करुन घ्यावा.फक्त अर्धा ते एक तास एवढाच वेळ तेही 5 वर्षातून एकदा.
तेवढा वेळ तुम्ही पुढच्या मतदानाला नक्कीच देऊ शकता.
बाकी तुम्हाला जे योग्य वाटते तेच करावे. Happy

ती व्यक्ती टोपणनावाने लिहीत होती का? >>>>> काय संबंध या प्रश्नाचा ? टोपणनाव असेल किंवा खरे नाव असेल. सोशल मीडीयातल्या अनेकांना आपण शेवटपर्यंत भेटत नाही. त्याने लिहीलेले खरे कशावरून ?

मग तुम्ही पाहिली ती व्यक्ती तीच कश्यावरून? >>> हा माझा अनुभव मी लिहीलेला आहे. तू मतदान केलेस की नाही हे नाही लिहीलेले.

अश्यावेळी अफवांचा पूर आणि संभ्रमाचे पीक येते.>>> गरजच नाही. जी गोष्ट तुला माहीत नाही, त्यावर तू इतक्या प्रतिक्रिया देणे हास्यास्पद आहे. स्वतःवर ओढवून घेऊन अशा असंबद्ध (बचावात्मक ) प्रतिक्रिया दिल्या असतील तर माझा नाईलाज आहे. कारण त्या व्यक्तीचे गाव मी इथे दिलेले आहे. ते ठाणे, नवी मुंबई नक्कीच नाही. याउप्पर आपली मर्जी !

नोटा ला मत दिले, तर उमेदवार बदलण्याची तरतूद आहे
>> बदललेला उमेदवार तरी कोणाला हवा आहे.

चांगले केले रूनमेश मत न देऊन, मी पण देत नाही- काही उपयोग नाही, एकाच माळेचे मणी असतात हे.

सिस्टम को बदलना है तो सिस्टममे रहना होगा
& the only way you can be a system or choose a system is by voting

पारावर गप्पा हाणत आणि याच्या त्याच्या टोप्या उडवत बसण्याने काही होणार नाही!
जरा बुड हलवा आणि मतदान करा.

Pages