आंघोळ - सकाळी की रात्री?

Submitted by टवणे सर on 13 May, 2019 - 00:13

भारतीय संस्कृतीत सकाळी उठल्याबरोबर पहिले आंघोळ आयुष्याचे अविभाज्य अंग आहे. आंघोळ केल्याशिवाय सहसा लोक बाहेर कामाला पडत नाहीत. अनेक जण चहासुद्धा घेत नाहीत. लहानपणापासून सकाळी उठल्याबरोबर आंघोळ हे इतके डोक्यात पक्के बसले होते की इतर संस्कृती/प्रदेशात दुसरी कुठली पद्धत असेल असे मनातदेखील कधी आले नाही.
मग इंग्रजी/इतर भाषातील साहित्य वाचताना असे दिसून येऊ लागले की बर्‍याच प्रदेशात - विशेष करून युरोपात व त्यामुळे पुढे अमेरिकेत - आंघोळ रात्री झोपायला जाण्यापुर्वी करतात. काही चरित्रे/कादंबर्‍यात वाचनात आले की थंडीच्या दिवसात आंघोळ साप्ताहिक कार्यक्रम असे, तोसुद्धा थोड्याफार लाकडं जाळून केलेल्या आगीत बाथमध्ये पाणी गरम करून ४/५ भाउ/बहिणी एकामागोमाग एक आंघोळी उरकत. आग/उब महाग असणे हे मुख्य कारण! आंतर्जालावर शोध घेतल्यावर दिसले की भारतीयांना सकाळी आंघोळ न करणे जितके विचित्र वाटते तितकेच अनेक पाश्चिमात्यांना रात्री झोपायला जाताना आंघोळ न करता, दिवसभरच्या अंगावर साचलेल्या मळ/घाणीला तसेच ठेवून झोपायला जाणे.

तर धागा काढण्याचा उद्देश हा की आंघोळ झोपायला जाण्यापुर्वी रात्री करावी की सकाळी उठल्यावर?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी दुपारी करतो. सुर्याच्या उन्हात तापलेल्या नळाला गरम पाणी असते, त्यामुळे वीज ईंधन वगैरे बचते, आणि अनायासे सौर उर्जा वापरली जाते.
आणि समजा नसेलच तापले जास्त, तर तसेही दुपारी कोणाला कुठे जास्त गरम पाण्याची हौस असते, गुळण्या करतो तसे कोमटही चालते.

अवांतर - सध्या वर्क फ्रॉम होम अलोन चालू असल्याने ही दुपारी आंघोळीची मौज करू शकतोय. पण वर्क फ्रॉम होम अवे मोडमध्ये गेल्यावर पुन्हा मध्यमवर्गीय भारतीयांसारखा आंघोळीचाही सकाळ मोड ऑन करावा लागेल Happy

सकाळीच अंघोळ करून झोपी जावे, अशाने दोन्ही संस्कृतींचा संगम साधता येईल. >>> Lol

हिरा, अगो मस्त पोस्ट.

ऋन्मेष दुपारी नळाला खरंच मस्त गरम पाणी असते.

भरत काय आयकत नाय आज. Lol
आरारांचे म्हणजे त्यांनी दिलेले गाणे पहाणे घरला गेल्यावर.

माझ्या माहितीप्रमाणे परदेशातील (जर्मनी मध्ये तरी) लोक सकाळी लौकर उठून,पटकन आवरून वेळ न घालवता कामाला जातात. शक्यतो बाहेरच नाश्ता आणि जेवण (लंच) करतात. जेणेकरून संध्याकाळी लौकर घरी येता येईल आणि स्वतः साठी वेळ देता येईल. आणि त्यांच्या मते सकाळी अंघोळ करणे हे वेळखाऊ काम आहे आणि वर्षातील जास्ती काळ इथे थंड हवा असते त्यामुळे सकाळी थंडीत अंघोळ करून लगेच बाहेर पडणे ह्यांना safe वाटत नाही.
प्रत्येक जागेच्या आपल्या आपल्या पद्धती असतात . भारतामध्ये जास्ती काळ उष्ण वातावरण असल्याने ताजेतवाने वाटण्यासाठी सकाळी अंघोळ करणे गरजेचे आहे, असे मला वाटते. संध्याकाळची अंघोळ ऐच्छिक आहे.

एक सहज विचार मनात आला,
हा धागा माझा असता तर एव्हाना यावर एक विडंबन लेख पडला असता. ज्से की, शौचालयाला केव्हा जावे? सकाळी कि रात्री?

ऑन ए सिरीयस नोटबूक,
व्हॉट ईझ द कर्रेक्ट ऑर आयडीअल टाईम टू गो टू टू नंबर ?

पिकू नावाचा एक चित्रपट यावरच आहे ना?

>>आंघोळ - सकाळी की रात्री?<<
सकाळी शॉवर घ्यावा, आणि रात्री बाथ, निवांतपणे. जकुझीत मनाजोगती कंपनी असेल तर उत्तम... Wink

व्हॉट ईझ द कर्रेक्ट ऑर आयडीअल टाईम टू गो टू टू नंबर ?
>>> जेंव्हा लागेल तेंव्हा... हा माझा फंडा आहे ... उगाच ठराविक वेळी जाऊन तासभर बसायचे नाही... जेंव्हा फुल्ल प्रेशर असेल तेंव्हाच जायचे... तीस सेकंड मध्ये काम होऊन जाते - फुल्ल स्पीड डिलिव्हरी... तो आनंदच वेगळा आहे... नवीन धागा काढ ...

नवीन धागा काढ ...
>>>
ओके च्रप्स
आधी जेवून घेतो. मग कदाचित जाणार नाही.

सकाळीच अंघोळ करून झोपी जावे, अशाने दोन्ही संस्कृतींचा संगम साधता येईल. >>> Happy
@भरत : एक नंबर उत्तर Happy खुप हसलो !!

Pages