जसा एक धागा असंबद्ध गप्पांसाठी आहे, तसा हा सुसंबद्ध गप्पांसाठी. नियम फक्त तीनच पाळायचे:
१. प्रतिसाद आधीच्या प्रतिसादाशी सुसंगत असायला हवा
२. विषयाचे बंधन नाही पण व्यक्तिला/प्रतिसादकर्त्याला उद्देश्यून/व्यक्तिगत प्रतिसाद नकोत
३. दीर्घ प्रतिसाद नकोत. एकदोन ओळीच ठीक.
उदाहरण:
प्रतिसाद १: यावर्षी उन्हाळा खूप आहे
प्रतिसाद २: हो ना यावर्षी थंडी पण खूप होती
प्रतिसाद ३: थंडी इथे काहीच नाही. कॅनडाला याहून जास्त असते.
प्रतिसाद ४: कॅनडाचे ऋतुमान वेगळे. तेथील संस्कृती सुद्धा वेगळी आहे.
प्रतिसाद ५: तिथली सर्वात जुनी संस्कृती तर तिथल्या मूळच्या लोकांची आहे.
प्रतिसाद ६: कोण मूळचे लोक? रेड इंडियन्स का?
प्रतिसाद ७: नाही कॅनडाचे मूळचे लोक वेगळे आहेत. बरेच विविध प्रकारचे आहेत.
प्रतिसाद ८: मुळचे म्हणजे काय? सगळे कुठून ना कुठून कधी न कधी तिथे बाहेरूनच आलेले असतील ना?
प्रतिसाद ९: खरे आहे. फक्त आफ्रिकेत कोणी बाहेरून आलेले नसावे. कारण मानवजातीचा पाळणा आफ्रिकेतच हलला म्हणतात.
बघा म्हणजे भारतातल्या उन्हाळ्याचा विषय कॅनडा मार्गे आफ्रिकेत पोहोचला हीच तर गम्मत आहे ह्या धाग्याची.
(बाकी बरेच गप्पांचे धागे आहेत जिथे हाय हेल्लो वगैरे एकमेकांशी गप्पा सुरु असतात. आणि इतर सर्व धाग्यांवर विषयानुसार दीर्घ/व्यक्तिगत प्रतिसाद असतात)
मुंगलेट म्हणजे काय
मुंगलेट म्हणजे काय
लेट आलेल्या मुंग्या….
लेट आलेल्या मुंग्या….
Siafu Ant किंवा सैनिकी
Siafu Ant किंवा सैनिकी मुंग्या सुध्दा म्हणतात त्यांना. आफ्रिकेत आढळणारी महाप्रचंड झुंड मुंग्यांची. वाटेल जे जे काय जिवंत येईल ते ते खाऊन टाकत पुढे जातात.
पुणे मुंबई पुणे स्वतः
पुणे मुंबई पुणे स्वतः ड्राईव्ह करून गेलो. मुंबईतले रस्ते अजिबात माहीती नसताना वर्सोवा यारी रोड पर्यंत गेलो. मधे दोन वेळा रस्ता चुकलो पण गुगलने बाजूच्या लेनमधून पुन्हा जागेवर आणले. दुपारी एक वाजता निघालो ते रात्री नऊ वाजता पोहोचलो. मुंबईत चार तास गेले. येताना कमी वेळ लागला.
पण दिवसभर दमट हवेने घाम काढला.
रात्री उशिरा झोपून सकाळी वेळेत काम सुरू पण केले. पण बॉडी पार्टस खिळखिळे होऊन प्रत्येक पार्ट स्वतंत्र व्हायला आवाज करतोय असं वाटतंय.
गुगल मॅप हातात असताना रस्ते
गुगल मॅप हातात असताना रस्ते माहित नाहीत असे कसे काय म्हणता येइल?
फरक पडतो खूप.
Finally, Straw men's are here.
रस्ता माहिती असेल तरी गुगल मॅप कोण करेल?
(तुम्हाला माझे म्हणणे समजले आहे असे समजून उत्तर दिले होते. पण काही लोक मागचे पुढचे न पाहता आडवे लावणार ही शंका खरी ठरल्याने बदलले.)
कसला फरक पडतो ?
कसला फरक पडतो ?
पहिले लग्न झालेला , 55 चा विधुर विचारतोय दुसऱ्यासाठी नाव कुठे नोंदवू ?
मला तर हसूच आले
मग पहिले कसे झाले होते ?
बरं. तुमचंच बरं.
नाव नोंदवूनच लग्न होतं?
गुगलतै कधीकधी चुकीची दिशाभूल
गुगलतै कधीकधी चुकीची दिशाभूल करतात.
आम्ही कोईम्बतूरला 300किमी छानपैकी गेलो.. सीटीत एन्ट्री केली आणि उरलेले 20 किमीने जेरीस आणले..दिडदोनतास त्यात गेले..मग येताना गुगलतै कडून बीनाट्रैफिकवाला शॉर्ट कट विचारला.. त्यांनी सांगितला आम्ही फॉलो करत गेलो...ब्रीजचं काम सुरू होतं आणि वनवे होता..तरी नवर्याला डाऊट होता पुढे रस्ता बंद तर नाही मी म्हणलं नसणार गुगल दाखवतोय ना रस्ता मग चला...अर्धा पाऊणतासानंतर स्थानिक लोकांनी अडवलं आणि पुढं रस्ता बंद माघारी फिरा सांगितले मग काय परत गुगललाच विचारून गल्लीबोळातून हायवे ला लागायला तासभर गेला..लंचला साडेतीन वाजले ना त्यामुळे
मला अंधेरी रस्त्यावर दोनदा
मला अंधेरी रस्त्यावर दोनदा जवळ जवळच्या सिग्नलवर अलिकडच्या सिग्नललाच राईट घ्यायला सांगितले. राईट घेतला तर मॅप लगेच बदलला. मग लगेच १०० मीटरवरच्या बाजूच्या अरुंद गल्लीत कच्च्या रस्त्यावर गाडी घालायला सांगितली. तिथून पुन्हा राईट करत पुन्हा मागच्या रस्त्यावर आणली. आता छान समजले कि राईट म्हणजे पुढच्या सिग्नलला राईट. नंतर कॉन्फिडन्सच गेला.
येताना ट्रॅफिकप्रमाणे मॅप बदलायचा आणि अचानक राईट घ्यायला सांगायचा. ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला बोळीतून सबवेतून साईडच्या सर्विस लेनमधून काढायला लावली. आता हायवेला मर्ज व्हा असे सांगितले. मग ३०० मीटर सरळ जाऊन डावीकडे वळा असे सांगितले. समोर फ्ल्यायओव्हर होता. पाचच लावलांपूर्वी गुगलने सांगितले म्हणून हायवेला टच झालेलो. वर चढून ३०० काय ६०० मीटर झाले तरी उजवे वळण येईना. ते खालीच होते. म्हणजे हायवेला मर्ज व्ह्यायचे होते. पण वर चढायचे नव्हते. पुन्हा खालूनच सर्व्हिस रोडने सरळ जायचे होते.
या गोष्टी थोडीतरी रस्त्यांची, परिसराची माहिती असेल तरच कळतात. इथे आपण अंधाधुन आयुष्यमान ! जावे त्याच्या वंशा तेव्हां कळे.
दिल्ली, बेंगळुरू, जोधपूर, चंदीगढ, शिमला, कोल्हापूर, गोवा इथे मी अजिबात चुकणार नाही कारण पायी फिरलो आहे. तिथे गुगल मॅपचा उपयोग विसरलो असेन तर सेफ असावं म्हणून होईल.
बरोबर आहे.
बरोबर आहे.

माहित नसलेल्या रस्त्यांवर गुगलतै गोंधळ घालून देतात आणि नवरा त्याचं खापर माझ्या डोक्यावर फोडतो कि तुच सांगितलं नाहिस टर्न्स, घ्या आता जावे त्याच्या वंशा तेव्हां कळे.
शांमाचा प्रतिसाद वाचून बरं वाटलं.. चुकतात रस्ता गुगल असेल तरी
गुगल संगितले तर अगदी डोअर टू
गुगल संगितले तर अगदी डोअर टू डोअर व्यवस्थित सांगते. पण जर ते चुकलेच तर मात्र भन्नाट चुकते, थोडेसे चुकत नाही. यू आर गॉन
सर्विस रस्त्याला वळायचे असेल, किंवा फ्लायओव्हरवर जायचे नसेल, किंवा आता जवळजवळ दिसणारे पण पुढे भिन्न दिशांना जाणारे रस्ते असतात अशा ठिकाणी मॅप वास्तविक आपसूकच झूम इन व्हायला हवा आणि नक्की कोणत्या रस्त्याला जायचे हे दाखवायला हवे. तिथे गुगल नेव्हिगेशन ने सुधारणा करणे आवश्यक आहे. भर रहदारीत आपण थोडेच झूम करून बघू शकणार?
कधी कधी तर म्याडम गप्पच बसतात. उदाहरणार्थ: पुण्यात सोलापूर कडून येणाऱ्या रस्त्यावर स्वारगेटच्या इथून डावीकडे वळले तर सातारा रोड लागतो. पण डावीकडे वळण्यासाठी गाडी बरेच आधी डाव्या लेन मध्ये घ्यावी लागते. तिथे जर आपण सरळ गेलो तर थेट अंडरपास करून पुढे सारसबागच मग. सातारा रोड विसरा पुढचा अर्धा तास
आणि तिथे मॅप काही झूम होत नाही, म्याडम पण शांत असतात. आणि आपण हमखास सरळ जातो 
भर रहदारीत आपण थोडेच झूम करून
भर रहदारीत आपण थोडेच झूम करून बघू शकणार?>>>>>> तेच तेच
मी प्रत्येक ठिकाणी झूम करत
मी प्रत्येक ठिकाणी झूम करत होतो आणि मॅप फिरवत होतो. रस्ता उभा ठेवला कि मला कळायचा. पण अचानक उभ्याचा आडवा किंवा उलटा करून गोंधळ उडवून द्यायला गुगलला आवडतं.
मग आपलं जजमेंट जातं. आपण या दिशेने जात होतो आता आपण कुठे आहोत हे पण कळत नाही. बरेचदा कापलेला रस्ता हा मॅपच्या स्क्रीनमधून मायनस होऊन आपली कार जिथे आहे तिथूनच पुढचा रस्ता दाखवायला हवा. पण तसे होत नाही. लक्ष नसेल तर मॅप तिथेच राहतो. अरेच्चा ! आपण गेलो कुठे अस्सं होतं !
मी प्रत्येक ठिकाणी झूम करत
मी प्रत्येक ठिकाणी झूम करत होतो आणि मॅप फिरवत होतो. रस्ता उभा ठेवला कि मला कळायचा. पण अचानक उभ्याचा आडवा किंवा उलटा करून गोंधळ उडवून द्यायला गुगलला आवडतं.
मग आपलं जजमेंट जातं. आपण या दिशेने जात होतो आता आपण कुठे आहोत हे पण कळत नाही. बरेचदा कापलेला रस्ता हा मॅपच्या स्क्रीनमधून मायनस होऊन आपली कार जिथे आहे तिथूनच पुढचा रस्ता दाखवायला हवा. पण तसे होत नाही. लक्ष नसेल तर मॅप तिथेच राहतो. अरेच्चा ! आपण गेलो कुठे अस्सं होतं !
रस्ता उभा ठेवला कि मला कळायचा
रस्ता उभा ठेवला कि मला कळायचा. पण अचानक उभ्याचा आडवा किंवा उलटा करून गोंधळ उडवून द्यायला गुगलला आवडतं. Proud>>>>> सेम पिंच
हा माणूस म्हणजे गुगल आणि ही
हा माणूस म्हणजे गुगल आणि ही बाई म्हणजे ड्रायव्हिंग सीट मधला मनुष्य
https://www.youtube.com/shorts/aS96OppZBmo
शांमा
रस्ता उभा ठेवला कि मला कळायचा
रस्ता उभा ठेवला कि मला कळायचा. पण अचानक उभ्याचा आडवा किंवा उलटा करून गोंधळ उडवून द्यायला गुगलला आवडतं. Proud>>>>> सेम पिंच
मला वाटलं हे मलाच होते...सगळ्यात बेकार म्हणजे उत्तरेकडे जा, दक्षिणेकडे जा, मी काय हनुमान आहे का 'झेपावे उत्तरेकडे' म्हणे, डावं,उजवं, सरळ सांगा की तै !!
>> मी काय हनुमान आहे का
>> मी काय हनुमान आहे का
पंच ऑफ द डे
हो ना, सुरवातच असते तशी: हेड इस्ट
कुठलं इस्ट कुठलं वेस्ट, आपण आपली गाडी सुरु करून आहे तो एकमेव रस्ता पकडायचा
बाय द वे, मला अगदी सुरवातीचा
बाय द वे, मला अगदी सुरवातीचा अनुभव आठवतो. अगदी पहिल्यांदा नेव्हिगेशन वापरले तेंव्हा.
मला वाटले सांगितलेला रस्ता सोडून आपण भलतीकडेच गाडी नेली तर गुगलची बाई ओरडेल कि काय.
म्हणजे "ओह माय गॉड! ओ शिट्ट! राईट राईट राईट... नॉट लेफ्ट मॅन, नॉट लेफ्ट... आय टोल्ड यू ना? व्हाड्डा हेल..." इत्यादी
माझ्या जुन्या गाडीच्या आरशात
माझ्या जुन्या गाडीच्या आरशात कंपास होता आणि अष्टदिशा त्यात दिसायच्या त्यामुळे हेड नॉर्थ वेस्ट म्हटलं तरी मी आनंदाने जायचो. हल्ली टर्न लेफ्ट/ राईट फार पटकन अॅक्युरसीमुळे सांगतात ना? अमेरिका/ कॅनडात ड्राईव्ह करताना माझा दिशांचा सेन्स टोटली जागृत असतो. त्यामुळे कंपास नसला तरी वेस्ट म्हटलं की समजतं कुठे जायचं आहे. आपल्याकडे रस्ते सरळ नसतात.. ही आपली एक सबब ...पण दिशांचा सेन्स माझ्या तरी अजिबातच मनात नसतो भारतात फिरताना. त्यात मुंबईत व्हीटीकडे तोंड केलं की उजवीकडे पश्चिम आणि डावीकडे पूर्व असले कन्सेप्ट!
बाकी ते 'झेपावे उत्तरेकडे' हे वेळ मारुन नेणे असते. जीपीएसला तुमची जागा तर समजेलेली आहे पण तुम्ही कुठल्या दिशेला प्रयाण करत आहात हे अजुन समजलेले नाही. टर्न राईट/ लेफ्ट हे जोवर तुमची मूव्हमेंट समजत नाही (रेफरंस)तोवर सांगणे शक्य नाही. पण गो साऊथ सांगायला रेफरंसची गरज नसते. त्यामुळे मॅप चालू केला की पहिली आज्ञा गो साऊथ असते, आणि जी चुकली तर तुम्ही सगळ्यात जास्त चरफडता. एकदा तुम्ही कुठल्या दिशेला जात आहात हे समजलं की दिशा न सांगता बाजू सांगू लागतात काकू.
बाकी आयफोनला शिव्या घातल्या तरी काकू टर्न लेफ्ट आफ्टर धिस ट्रॅफिक लाईट, का गो स्ट्रेट अॅट धिस लाईट आणि टर्न लेफ्ट अॅट नेक्स्ट असं संगतवार सांगते ते डाऊनटौन मध्ये जवळ जवळ लाईट असले की बरं पडतं.
हल्ली सायलेंटली करतात.
अतुल, पूर्वीचे गार्मिन, टॉमटॉम चुकलं की रीराऊटिंग अशी जोरदार अनाउंसमेंट करुन मग कामाला लागायचे.
तिकडे चांगल्या चाललेल्या
तिकडे चांगल्या चाललेल्या चर्चेत उगीचच वेगळा मुद्दा नको म्हणून इकडे लिहीतो.
(मत मांडण्याची ठसठस म्हणा)
करीअर बद्दलचे अनेक मुद्दे योग्य आहेत. पण काही काही सल्ले बरीच वर्षे ऐकतो आहे, त्याप्रमाणेच मतही होते, ते बदलावे अशा काही घटना पाहण्यात आहेत. त्या धाग्यावरच्याच एका अनुभवाप्रमाणे माझा मामेभाऊ न्युमोनिया होऊन लवकर गेला. मुलं लहान होती. मामा जाऊन वर्षही झाले नव्हते. माभा गेल्यावर त्याच्या बायकोचे हाल झाले. मामीने खूप त्रास दिला. तिने स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा निर्णय घेतला. त्या आधी कधीही ती घराबाहेर पडली नव्हती. घरात कुणाकडे मदत न मागता तिने मुलांचे शिक्षण केले.
पुढे बारावीनंतर मुलीला कमी मार्क्स असतानाही लांबच्या, आडबाजूच्या कॉलेजमधे मेडीकलला प्रवेश मिळतो म्हणून प्रवेश घेऊन दिला. त्या वेळी माझ्यासहीत बर्याच जणांशी चर्चा केली होती. तत्कालिक मान्यताप्राप्त मताप्रमाणे मी तिला बारावीला जे गुण आहेत त्यानुसार मेडीकल झेपेल का हे बघ हा सल्ला दिला. "तर मग तिला कोणत्या साईडला घालू, म्हणजे तिला माझ्यासारखं गरीबीत रहावं लागणार नाही ?" या तिच्या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नव्हतं.
मुलीत जिद्द होती. एमबीबीएस चांगल्या मार्कांनी पास झाली. पुढे एमडी केलं. परदेशी जाणं वगैरे माहिती नव्हतं. मुलालाही असंच तिने कॉप्म्युटर सायन्सला घातलं. काही वर्षे नोकरी मिळाली नाही. कुणी मदत करायला नाही. पण मुलाने स्वतःच कुठे कॉण्ट्रॅक्ट वर कुठे स्वतःच कामे घेऊन काम सुरू केले. आता गुगल मधे आहे.
दहव्वी बारावीच्या गुणांवर मुलांना जोखता येत नाही. जेईई / नीटचे दोन दोन क्लास, ऑनलाईन क्लासेस एव्हढ्या इनपुटवर एखाद्याला ९२% मिळाले आणि कोणताही क्लास न लावता, घरात कुणीही अभ्यास घ्यायला नसताना मिळवलेले ८० ते ८५% गुण यात डावे उजवे कसे करायचे ?
कधी कधी परिस्थितीमुळे मुलं जिद्दीने पुढे येतात. पण हा थंब रुल नाही.
रिक्षावाल्याची मुलगी जज्ज झाली, वीटभट्टी कामगाराचा मुलगा आयएएस झाला अशा बातम्याही अधून मधून येत राहतात. हा ही नियम नाही. शेवटी संधी मर्यादीत आहेत. सगळेच आदर्श असते तरीही प्रत्येकाला संधी मिळणार नाही आणि आता जागा मोकळ्या राहताहेत तर चान्स घ्या असे म्हणून प्रवेश घेतला म्हणजे पुढे नोकरी मिळेलच, सगळे समजेलच असे नाही.
काल एकाने दीर्घ पोस्ट लिहून एडिट केली. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. कारण आधी म्हटल्याप्रमाणे शाळेपासून जर मुलांनी रोबोटिक्स स्पर्धेत भाग घेतला असेल तरच रोबोटिक्सला जावे असा अर्थ निघत होता. परंपरागत शेतकरी कुटुंबाची अजूनही पहिली पिढी आता व्यवसाय बदलू पाहतेय. त्यांना या पिढीत रिस्क घ्याव्या लागणारच आहे. या आधी दोन तीन पिढ्यात ज्यांनी वाट बदलली ते आता चांगले यशस्वी आहेत. एकदा ही वाट मळली कि मग बरेच मुद्दे इथेही लागू होतात. जसे कि जी आवड असेल तिकडे जाऊ द्यावे. त्यासाठी आधीच्या पिढ्या तेव्हढ्या सक्षम असाव्यात. वेगळ्या वाटेवर जाणार्या पाल्याला प्रोत्साहन देण्यासाठी करीअरच्या संधी माहिती असाव्यात. उगीच मुलांना गायनाची आवड आहे म्हणून गायक बनवा हे तर आता कुणीही करत नाही. सलील कुलकर्णी डॉक्टर आहे. आधी पोटापाण्याची व्यवस्था केली. त्यात जम बसल्यावर आवडीच्या क्षेत्राकडे वळला. आवडीच्या क्षेत्रात जाऊ द्यावे या सल्ल्यामागे या सर्व गोष्टी गृहीत धरलेल्या असतात ज्या अनेकांना माहिती नसतात.
खूप निसरडी वाट आहे. एकाच्या परिस्थितीचा अनुभव दुसर्याला लागू होणार नाही हेच खरे.
शांमा खूप छान पोस्ट अगदी हेच
शांमा खूप छान पोस्ट
अगदी हेच विचार माझ्या मनात येतात. भविष्याचे कुणालाही काही माहीत नसते. आता आपण ज्यामध्ये करियर करत आहोत, आपल्यापैकी किती जणांना/जणींना दहावी बारावीला असताना आपण हे करियर करू असे माहीत होते? तेंव्हा ज्या वाटा दिसायच्या त्यातलीच एखादी आपण निवडली. पण पुढे काळाच्या ओघात इतरही बऱ्याच वाटा तयार होतात.
धन्यवाद अतुल
धन्यवाद अतुल
(No subject)
(No subject)
(No subject)