' गोव्यातील गणेशोत्सव '

Submitted by s.mukund on 3 May, 2019 - 03:05

गोवा हे राज्य विवीध समृध्दतेने व हिरवाई ने नटलेले राज्य या राज्याची खासियत म्हणजे हिथले समुद्र किनारे.इथे विवीध जातीचे धर्माचे लोक एकत्र राहतात.त्याचबरोबर इथे सर्व सण संभारभ मोठ्या धुमधड्याक साजरे होत असतात.पण हिथे दिवाळी सारखाच मोठ्या धुमधड्याक सार्वजनिक तसेच घरोघरी वाड्यावाड्यावर साजरा केला जाणारा उत्सव म्हणजेच ' गणेशोत्सव '. इथे प्रत्येक घराघरात गणेशोत्सव जोरदार व थाटामाटात साजरा केला जातो.इथे गणेशोत्सवात सर्व जण शाकाहार पाळतात.पुर्ण गणेशोत्सवात मांसाहर वर्ज्य केला जातो.काही ठिकाणी तर गणपती बसायच्या आधी एक दोन दिवस काही जण होम पण करुन घेतात घर शुध्दीसाठी कारण घरात चुकून मांसाहार खाल्ला गेलेला असले तर कारण गणपती आपल्या घरी येणार असतात.इथे गणपती काहिंच्या घरी दिड दिवस पाच दिवस किंवा सात दिवस बसतात.आपल्या घरी गणपती येणार म्हणुन खुप जोरदार तयारी प्रत्येक घरी चालु असते.प्रत्येक घरी गणपती ज्या खोलीत बसवला जातो ती खोली विवीध आकाराच्या कागदी पताक्याने पुर्ण सजवली जाते.गणपती ज्या आसानावर किंवा मकारात बसवला जातो त्याच्यावर (गणपतीच्या डोक्यावर ) माटोळी बसवतात.माटोळी म्हणजे एका लाकडाच्या फळीवर विवीध झाडाची पाने फुले नारळ केळफुल यांची कलात्मक रचना करुन माटोळी ( मंडप पण म्हणतात ) सजवली जाते.गणेश चतुर्थीच्या दिवशी मोठ्या जलोष्षात गणपती मुर्ती आणुन प्राणप्रतिष्ठा केली जाते.गणपती बसायच्या दिवशी दारात रांगोळ्या काढल्या जातात त्याच बरोबर फटाके वाजवुन गणपतीचे स्वागत करतात.दिवाळी ला जसे फटाके उडवले जातात मोठ्या प्रमाणात तसेच फटाके गणपती बसवायच्या दिवशी व गणपती विसर्जन दिवशी वाजवले जातात.गणपती बसायच्या दिवासा पासुन विसर्जनापर्यंत संपुर्ण कुंटूंबात आंनदाचे वातावरण पाहिला मिळते.इथली एक पद्धत म्हणजे पुजा किंवा इतर धार्मिक कार्यक्रमात नारळाची पुजा जास्त करतात.म्हणजे आपण कसे सुपारीला गणपती मानुन सुपारीची पुजा करतो पण तिथे ते अख्खा नारळ हा गणपती म्हणुन पुजला जातो.तिथे सुपारी वापरत नाहीत गणपती पुजेला.चतुर्थीच्या दिवशी गणपतीबरोबरच शंकर-पार्वतीची स्थापना केली जाते. फूलझाडांच्या डहाळया असलेल्या जुडीभोवती गौरीचे चित्र असलेला कागद गुंडाळून तिच्या गळयात मंगळसूत्राचे काळे मणी असलेली दोरी बांधली जाते. गणपतीबरोबर शिव-पार्वतीचीही यथासांग पूजा केली जाते.या दिवसा पासुन संपुर्ण घराघरात आंनदी वातावरण असते.तिथली लोक हे कुकूंला पिंजर असे म्हणतात.तिथे भटाला ( गुरुजी ) खुप मान असतो.गोव्यातील लोक गुरुजीला भट असे म्हणतात.काही वेळेला भट इलोरे म्हणटल की आजुबाजुच्या घरात पण कळत की भट पुजा सांगयाला आहे तेव्हा काही वेळा ज्यांच्या घरी पुजा करायची असते तेव्हा शेजारी सुध्दा 'भटा आमच्या कडे पहिला येव्हा मग तिकरे जा ' असे म्हणुन त्या भटाची तेव्हा मनस्थिती पहिले यांच्याकडे जाऊ की यांच्याकडे अशी स्थिती पण काही वेळा होत असते.गणपती बसायच्या दिवशी गणपतीची पुजा झाली की मग माटोळी ची पुजा करतात.गणपती बसल्यापासुन विसर्जंनापर्यंत एकत्र आल्यानंतर मग काय विचारता! भजने, आरत्या यांना उधाण येते. गावागावातील वाडयावाडयावर घुमट (एक चर्मवाद्य) आरती पथके असतात. वाडयावरील प्रत्येक घरात जाऊन त्या त्या वाडयावरील पथके आरती म्हणतात. केवळ आपल्याच गणपतीसमोर आरती म्हणण्यापेक्षाही सर्वांच्या घरी जाऊन आरती म्हणण्याचा आनंद अवर्णनीय असतो. घुमटाच्या तालावर आरत्या सुरू झाल्या की सर्वजण त्या आरती सामिल होऊन आंनद घेतात.त्याच बरोबर तिथला एक अजुन प्रकार म्हणजे तिथे प्रत्येक पुजेनंतर गार्‍हाण (साकडे ) घालायची पध्दत आहे.सत्यनारायण पुजेत सुध्दा नारळाचा वापर होत असतो.तिथले अजुन एक पद्धत म्हणजे सत्यनारायण पुजेच्या वेळी एक एक नारळ वेगळा मांडला जातो तो म्हणजे एक कुलदेवतेचा एक ग्रामदेवतेचा व जर नवरा बायको बसले तर बायकोच्या माहेरच्या देवासाठी पण नारळ ठेवला जातो. व नंतर तो नारळ लोक त्या देवळात ठेवुन येतात.सत्यनारायण पुजा असली तर गार्‍हाण हे झाल पाहिजे असा नियम आहे.गार्‍हाण म्हणजे देवाला आपली मनातील इच्छा सांगायची .सत्यनारायण पुजा किंवा गणेश चतृर्थीची पुजा या दिवशी काही स्रिया वायन देतात ( वायण म्हणजे दान ) भटाला किंवा सवाष्ण बाई या दोघांपैकी कोणाला पण वायन देयची प्रथा आहे काही घरात.विवीध प्रकारचे खोबरे वापरुन गोडाचे पदार्थ बनवुन नैवेद्य दाखवले जातात.गणपती विसर्जनाच्या वेळी सुध्दा फटाके वाजवत भजन गात गाणी म्हणत गणपती बाप्पाला निरोप देतात.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users