काही पडलेले प्रश्न

Submitted by समाधी on 1 May, 2019 - 11:00

कालपासून मनात विचारांचे काहूर माजलेय. कुठेतरी बोलायला हवंय आहे , त्यासाठी मला सध्या तरी मायबोली बेस्ट माध्यम वाटले म्हणून लिहितेय.
मी आजवर खूप वाईट प्रसंगातून गेलीये, त्यातून सावरून खम्बिरपणे उभी राहिली, कारण हरणे मला मान्य नाही. पण तरी इमोशनल फुल असल्याने खूप त्रास होतो. एका जीवघेण्या प्रसंगातून बाहेर पडायला आयुष्यातील खूप वर्षे खर्ची पडली, त्यातून सावरते न सावरते तो दुसऱ्यात अडकली, माझंच मूर्खपणा अजून काय. पहिल्या वेळी जो खमबीरपणा होता तेव्हढा आता राहिला नाही. त्यात आंधळेपणाने प्रचंड विश्वास ठेवला त्यामुळे यावेळी त्रास जास्त झाला. हा धक्का सहनशक्ती पलीकडे होता, त्यामुळे दोन तीन वेळा जीव द्यायचाही प्रयत्न केला, पण मरण इतके सोपे नसते. काही वेळा वाचली तर काही वेळा ऐनवेळी कच खाल्ली. मग त्यानंतर मात्र खूप खूप प्रयत्नाने निर्णय घेतला की आता यापुढे त्रास करून घ्यायचा नाही. हळूहळू त्यात यशस्वी पण झाली मी, पण हे सगळे खूप टफ गेले, एकटीच होती न , आधीच माझ्यामुळे माझ्या माणसांना खूप त्रास झाला होता, यावेळी काही न सांगायचे ठरवले. तसेही आता मागे वळून बघायचे नाही , बस्स
काही काळ छान गेला, पण परवा अचानक सगळे आठविले , परत खूप त्रास झाला, परत एकदा मरणयातना भोगल्या. अगदी वेड लागायची पाळी आली, मला काय हवंय काय नको याबाबत ठाम होते पण तरीही त्रास झाला. कालची रात्र तळमळत गेली. त्यात घरी एकटी होते, फक्त या वेळी जीव देणार नाही ही मनाशी खूणगाठ होती म्हणून वाचले. हे सगळे वाचून मला सायकायट्रिस्ट किंवा कोनसेललेर कडे जायला सांगू नका, कारण ते शक्य नाही. मला फक्त प्रश्न पडलाय की असे का होतेय, मला जे नको आहे त्यातून बाहेर पडली म्हणता म्हणता मधेच कधीतरी असे का होते तेच कळत नाही.
आज फक्त एक गोष्ट चांगली झाली, परत एकदा खूप प्रयत्ननी बऱ्यापैकी नॉर्मल झाले. आता काही केले तरी परत फसायची नाही, हे मनाशी पक्के आहे. फक्त नको असणारे विचार अचानक का परत येतात हाच प्रश्न आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आर्थिक का नातेसंबंधाने फसगत हे नंतर कळले.
गोडगोड बोलणाऱ्यांपासून सावध राहाणे हे पक्के ध्यानात ठेवणे. व्यवहारी राहाणे.

इमोशनल फूल असल्यावर त्रास होतो हे खरेच आहे. मला पण होतो काही वेळा. मग मी let it go असं समजवते स्वत:ला. सगळं च काही आपल्या control मध्ये नसतं हे accept केलं की त्रास कमी होतो( माझा अनुभव). तुम्हाला काय हवंय न काय नकोय life मधे या बाबतीत तरी तुम्ही clear आहात आणि हा मोठा प्लस पॉइंट आहे. तुम्ही यातून नक्कीच बाहेर पडाल. शुभेच्छा. And keeping urself busy is the KEY. त्यामुळे च नको ते विचार येणार नाहीत.

सगळ्यात उत्तम औषध वेळ आहे, वेळ जाऊ द्या आपोआप सगळे ठीक होते.
किती वेळ ते माणसा माणसावर डिपेंड आहे.
काही इमोशनल लोक महिन्यात बाहेर पडतात, काहींना वर्ष पण लागू शकते.

माझ्या बाबतीत एक बरे आहे की मी कितीही इमोशनल फुल असले तरी निर्णय घेऊ शकते
मग त्याचे परिणाम काहीही होवोत ते सहन करण्याची तयारी असते, पण मुळात अतिसंवेदनशील असल्याने गोची होते.

गेले दोन तीन दिवस फिरायला आलीये बाहेर, सो खूप छान वाटतेय, ह्या नविन वतारणाने खूप छान वाटतेय
Let's hope for the best

माझ्या बाबतीत एक बरे आहे की मी कितीही इमोशनल फुल असले तरी निर्णय घेऊ शकते
मग त्याचे परिणाम काहीही होवोत ते सहन करण्याची तयारी असते, पण मुळात अतिसंवेदनशील असल्याने गोची होते.

गेले दोन तीन दिवस फिरायला आलीये बाहेर, सो खूप छान वाटतेय, ह्या नविन वतारणाने खूप छान वाटतेय
Let's hope for the best

माझ्या बाबतीत एक बरे आहे की मी कितीही इमोशनल फुल असले तरी निर्णय घेऊ शकते
मग त्याचे परिणाम काहीही होवोत ते सहन करण्याची तयारी असते, पण मुळात अतिसंवेदनशील असल्याने गोची होते.

गेले दोन तीन दिवस फिरायला आलीये बाहेर, सो खूप छान वाटतेय, ह्या नविन वतारणाने खूप छान वाटतेय
Let's hope for the best

लॉ ऑफ अॅक्ट्रॅक्शन साठी सिक्रेट हा व्हिडीओ जरूर पहा. सारखी इतरांची काळजी वाहणे सोडा.

Submitted by शक्तीवान on 1 May, 2019 - 11:38
खरच याने खुप फायदा होतो तुम्ही awesome aj चे विडिओ बघा यु ट्युब वर मला खुप फरक वाटला....

मी पण अतिहळवा आहे आणि त्यामुळे खुप भोगायला लागले आहे /लागत आहे .पण दुर्दैवाने यावर काही उपाय नाही. हळवी माणसे म्हणजे पुराच्या पाण्यात पडलेली ओंडकी,पाणी नेईल तिकडे गटांगळ्या खात जावे लागते . मानसोपचाराच्या नादी लागू नका ,मी दहा वर्ष गोळ्या खाऊन षष्पाचा उपयोग झाला नाही. येईल तसे जगायचे,बाकी काय आहे आपल्या हातात?

तुम्ही लवकर या स्थितीतून बाहेर पडाल.आयुष्यात खूप चांगले दिवस येतील.यासाठी शुभेच्छा. >>> +१

गेले दोन तीन दिवस फिरायला आलीये बाहेर, सो खूप छान वाटतेय, ह्या नविन वतारणाने खूप छान वाटतेय >>> छान वाटलं हे वाचून.

मी तुमच्या कधी मागे लागले? आर यु सिरीयस? तुम्हाला कधी वाईट बोलले? तुमच्या कुठल्या लेखावर, प्रतिसादावर तिरकस कमेंट केल्या? उगीच काही पण बरळायचं का?
:> हा त्यांचा ड्यु आयडी असावा आणि तुम्ही त्यांच्या ओरिजिनल आयडी वाल्या धाग्यांवर कंमेंट्स केल्या असतील.

बाकी फ्रस्ट्रेशन घालवायला हा उत्तम उपाय आहे, कोतबो मध्ये प्रश्न विचारा, अनोळखी लोक उत्तरे देतील त्यातल्या एकाला पकडा, त्याच्यावर राग काढा.

बाकी फ्रस्ट्रेशन घालवायला हा उत्तम उपाय आहे, कोतबो मध्ये प्रश्न विचारा, अनोळखी लोक उत्तरे देतील त्यातल्या एकाला पकडा, त्याच्यावर राग काढा.+१२३

इतका गदारोळ करण्यापेक्षा एकतर पडलेले प्रश्न उचलायचे नी चालू पडायचे नैतर गिरी हुई चीज उठानेका नै असा काई उसूल असेल तर पडू द्यावे तसेच नी पुढे चालत रहायचे.

थोडक्यात काय तर एकतर भूतकाळ विसरा / झटकुन पुढे चला नाहीतर भूतकाळातील भूतांना पुन्हा पुन्हा आळवत राहून प्रत्यक्षात छळायला आली की इकडे दोन चार धागे काढ़ा .... चॉइस इज अवर्स !

कटप्पा
उगाच नाही तो पिसाळलेला कुत्रा तुझ्या मागे लागले
अगदी योग्य आहे ते

तिरकस कमेंट अमी पण करतात, पण ते प्रामाणिक असते, पण जी कोट तू highlight केली ती व्यक्ती अशी नाहीये
आणि हो
मला माझे फ्रुसट्रेशन काढायला कोतबो ची गरज नाही, जे पटत नाही ते मी बिनधास्त सांगते, म्हणून ह्या अवस्थेत सुद्धा निर्णय घेऊ शकतो

विश्, भावना आणि मनाच्या गोष्टी तुला नाही कळायच्या,

दक्षिणा , आभारी आहे, मान्य आहे, की ते बॅगेज आहे, पण मी ते ओव्हरकम नक्की करणार, हळवी आहे मूर्ख नाही , चुका रिपीट करायला
पण खरेच मनापासून आभारी आहे, सध्या जागा बद्दलतेय , त्यात बिझी आहे, स्वतःला व्यस्त ठेवतेय, पोसिटीव्ह वाटतेय

ज्या कुणी ज्येन्यूइंली प्रतिसाद दिले, फक्त त्यांना सांगते, मनापासून आभारी आहे, मी हा धागा tp साठी नाही काढला, करत असतील असे काही लोकं, पण मी त्यावेळी खूपच हळवी झाले होते, आता तो फेज गेला, हे असे परत न होऊ यासाठी प्रयत्न करतेय, किंवा करत नाही म्हणा कारण मी सगळे विसरायचे ठरवले आहे आणि एक दिवस नक्की विसरणार

कारण मी सगळे विसरायचे ठरवले आहे आणि एक दिवस नक्की विसरणार>शक्य आहे हे यात अशक्य असं काही नाही. तुम्ही जास्त sensitive आहात म्हणून तुम्हाला त्रास होतोय. पण जमेल तुम्हाला ही. विचार करणे कमी करा. स्वतःला आनंद मिळेल अशा गोष्टी करा. All the best.

नवीन बदल जर आपण पोसिटीव्हली घेतले तर जगण्याला एक नवीन उमेद मिळते, हे नव्याने अनुभवतेय मी, ज्यांनी काळजी दाखवली त्या सगळ्यांची आभारी आहे मी

शक्तीवान, तुम्ही त्या धाग्यावर लिहिलेय की मी तुम्हाला रागावले इकडे, पण तुमचा गैरसमज झालेला दिसतोय, तसे काही नाही
राहिली गोष्ट ट्रोल व्हायची तर मला त्याने फरक पडत नाही, मला कोण काय बोलतेय की मी कोण हे गेस करतोय त्यानेही नाही, तसेही आभासी जगात सगळेच आभासी असते इमोशन सकट

तसेही आभासी जगात सगळेच आभासी असते इमोशन सकट>>> एक म्हण आहे मराठी मध्ये ' चोर ही तुच आणी संन्यासी ही तुच ' सहज आठवली.

हा धागा आत्ताच पाहिला.
तुमची वारंवार फसवणूक केली जात असेल तर तसे का होते हे तुम्हाला स्वतःलाच शोधावे लागेल.

तुम्हाला ज्या संख्येत वाईट अनुभव आलेत तेव्हढे मला आले नसतील परंतु तीव्रतेचा विचार केला तर कुठल्याही वाईट अनुभवामधून कसे सावरू शकतो हे सांगू शकेन.

आयुष्यातील वाईट गोष्टी पुन्हा पुन्हा आठवून त्रास होणे ही एक सामान्य (म्हणजे सगळ्यांबरोबर घडणारी) गोष्ट आहे. पण त्या गोष्टीचा त्रास 3-4 दिवस होणे हा तीव्र नकारात्मक स्वसंमोहनाचा प्रकार आहे, जे आपणाकडून नकळत होतेय असे माझे मत आहे. त्याला लहानपणापासून झालेली मनाची जडणघडण कारणीभूत असते.

यावर ठोस उपाय म्हणजे स्वसंमोहन करून मनाला मुक्त करणे (आवर घालणे शक्य नाही) , स्वसंमोहनामुळे स्वतःच्या मनाशी पुन्हा ओळख होऊन आत्मविश्वासात वाढ होते. हळूहळू स्वतःची स्मृती केवळ चांगल्या गोष्टींसाठीच राखीव ठेवणे, विविध छंदांत वेळ घालवणे या गोष्टी आपोआप जमू लागतात.

दुसरा (आणि सोपा) प्रकार म्हणजे सकारात्मक स्वसंमोहन. जसे आपण वाईट अनुभवांना उगाळत बसतो, तसेच चांगले अनुभव, आतापर्यंतच्या दुःखांवर केलेली मात, यशस्वीरीत्या राबवलेले प्रकल्प, गरजुंना केलेली मदत वगैरेबद्धल विचार करता येतात. परंतु त्यातही सर्वात प्रभावी गोष्ट म्हणजे एक सकारात्मक आज्ञाकारक वाक्य ठरवून ते मनातल्या मनात घोकत राहणे. उदाहरणार्थ "मागील सर्व वाईट अनुभव विसरून मी आता सकारात्मकतेच्या जगात प्रवेश करत आहे" हे वाक्य. फक्त या आज्ञाकारक वाक्यात "नाही" "नको" "नसेल" असे नकारात्मक शब्द नसावेत.

अशा प्रकारे केवळ अर्धा ते दीड दिवस (तीव्रतेनुसार) एकच वाक्य घोकून आश्चर्यचकित करणारे बदल घडतात. नवीन सकारात्मक विचार व परिस्थितीवर नवीन उपाय सुचू लागतात.

मी हे सर्व स्वानुभवातून लिहीत आहे. तुम्हीही ट्राय करून पाहा. आंतरजालावर स्वसंमोहनाबाबत बरीच माहिती उपलब्ध आहे.

१० वर्षाचे नातं कोणतीही अट आणी बंधने न ठेवता सुरू असताना अचानक त्याचा आयुष्यात दुसरी कोणी आली तर काय करावे ??

१० वर्षाचे नातं कोणतीही अट आणी बंधने न ठेवता सुरू असताना अचानक त्याचा आयुष्यात दुसरी कोणी आली तर काय करावे ??>>>>

कोणतीही अट बंधन नव्हते म्हणजेच वाटा कधीही वेगळ्या होऊ शकतात हे मान्य होते. मग आपणही move on करायचे. दुसरी कोणी आली म्हणजे आपली जागा त्याच्या मनातून गेली. मग भांडण, आदळआपट करून काय फायदा? दुहेरी मनस्ताप गळ्यात पडणार.

एकत्रित आर्थिक निर्णय घेतले गेले असतील तर वरील सल्ला फायद्याचा नाही Happy Happy

साधना +१

लग्नाचे बंधन असतानाही जोडीदार एकनिष्ठ राहिलच याची खात्री देता येत नाही. इथे तर नात्याला काही अटी, बंधनेही नाहीत, अशावेळी स्वतःचे शक्य तितके कमी नुकसान (आर्थिक, शारीरिक, मानसिक) होईल हे बघायचे आणि मुव ऑन करायचे. काय केले असते तर तो दुरावला नसता वगैरे विचार करुन स्वतःला त्रास देवू नका. त्याने त्याचा निर्णय घेतलाय तो मान्य करा, काही काळाने त्याने 'मी परत येवू इच्छितो' वगैरे म्हणणे, नव्याने नाते सुरु करायला गळ घालणे असेही होवू शकते अशा वेळी खंबीर रहा. त्याच्या आयुष्यात दुसरी व्यक्ती आली म्हणजे तुमचे नाते मोनोगॅमस नाही तेव्हा प्लीज आवश्यक त्या वैद्यकीय टेस्ट्स करुन घ्या. बाकी आर्थिक व्यवहार एकत्र असल्यास ते लवकरात लवकर वेगळे करणे / वकिलाचा सल्ला, पासवर्ड वगैरे शेअर केले असल्यास ते त्वरीत बदलणे, एकत्र रहात नाही पण एकमेकांच्या घराच्या किल्ल्या शेअर केल्या असल्यास त्या परत घेणे/ शक्यतो लॉक बदलणे वगैरे करा. थोडक्यात स्वतःला सुरक्षित करा. अजून एक म्हणजे आत्ताची तुमची नाजूक मनस्थिती लक्षात घ्या आणि स्वतःचे थोडे लाड करा. आपले काय चुकले वगैरे विचार करुन स्वतःला त्रास देवू नका, संपलेल्या नात्याबद्दल दु:ख होणार तर त्याचाही निचरा होवू दे. स्वतःला यातून बाहेर पडायला वेळ द्या. नव्या नात्यासाठी घाई देखील करु नका.
तुम्हाला शुभेच्छा!

Pages