न करण्याचा अभिमान ?

Submitted by केदार जाधव on 30 April, 2019 - 02:04

"आम्ही काय ते इटालिअन वगैरे खात नाही बाबा "
"आम्ही काय ते इंग्लिश पिक्चर बघत नाही बाबा"
"आम्ही काय आपला गाव कधी सोडणार नाही बाबा "
"ते फालतू चॅम्पिअन्स लीग काय असत , आम्ही क्रिकेट सोडून काही बघत नाही बाबा "

या टाईपची वाक्ंय आपण कायमच ऐकत असतो , तर या सगळ्यात कॉमन काय आहे , तर काहीतरी न करण्याचा अभिमान !!

गैरसमज करून घेऊ नका. याचा अर्थ अजिबात नाही की त्याचा तुम्ही न्यूनगंड बाळगा , तुम्हाला एखादी गोष्ट न आवडणे , ती तुम्ही न करणे हा तुमचा चॉईस आहे , आणि इतरानी त्याचा आदर केलाच पाहिजे , पण त्यात अभिमान वाटण्यासारख काय आहे हे मला कळत नाही.

आता अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या न करणे हे तुमच्या लेखी चांगल असू शकेल अन काहींच्या लेखी नाही.
उदा . मी दारू पीत नाही (खरच् Wink ) हा माझा चॉईस आहे , यात अभिमान वाटण्यासारख किंवा ती पिणार्याना कमी लेखण्यासारख काय आहे ?

तशीच आणखी काही गोष्टी ज्या न करण सगळेच चांगल मानतात , उदा . मी चोरी करत नाही, मी कुणाला त्रास देत नाही वगैरे ..
या चांगल्या गोष्टी आहेतच , पण यात अभिमान वाटावा अस काही नाही .

आता तुम्ही म्हणाल की असा अभिमान वाट्ण्यात वाईट काय आहे ,

तर पहिली गोष्ट या चुकीच्या अभिमानापायी तुम्ही काही चांगल्या गोष्टींचा आस्वाद घेण्यापासून मुकता . उदा, असतीलही इंग्लिश मारधाडपट , पण तुम्ही सरसकट नाही म्हणालात तर Schindlers list अन Sound of Music ला ही मुकाल.
किंवा आपल्या गावाचा अभिमान पाहिजेच पण कधी गाव सोडलाच नाही तर कितीतरी नवे लोक , त्यांच्या चालीरिती कधीच अनुभवू शकणार नाही .
जर चँपिअन्स लिग पाहिलीच नाही तर मेस्सी अन रोनाल्डो काय चीज आहेत हे कधीच कळणार नाही

पण त्याही पेक्षा, एकदा हा न करण्याचा अभिमान वाटायला लागला की अभिमान वाटावा अस काही करायची इच्छा कमी होईल का ?
तुम्हाला काय वाटत ?

००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००
तळटीप : या वाकयानी सुरूवात होती , पण मूळ मुद्दा हा नव्हता , चर्चा भरकटू नये म्हणून बदल केला Happy
"आम्ही काय ते GoT/BoT बघत नाही बाबा "
"ते Avengers का काय , आपण तर बघत नाही बुवा "

गेल्या २ दिवसात ही वाक्य ठसक्यात इतक्या जणांकडून ऐकली , त्यामुळे हे लिहावस वाटल .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला वाटते भक्तांमुळे हेटर्स निर्माण होतात. ती प्रतिक्रिया आहे...

>> नक्कीच अ‍ॅमी , अन हेटर असण ही ओकेच आहे

पण मी GoT / Endgame बद्द्ल नाहीच बोलत आहे , ते फक्त एक उदाहरणच आहे .

माझा मुद्दा एखादी गोष्ट न करण्याचा अभिमान वाटण्याचा आहे .

मला वाटते भक्तांमुळे हेटर्स निर्माण होतात. ही क्रिया आहे
आणि हेटर्स मुळे भक्त अधिकच भक्ती करायला लागतात ही प्रतिक्रिया आहे. किंवा उलट सुलट.....

आणि मग हेकट हेटर्स आणि चिवट भक्त जगाला नरक बनवून टाकतात ही शोकांतिका आहे आजची.

पुरक वाचन
अभिमान आणि ओळख
https://www.maayboli.com/node/56351

मी इंग्रजी भाषेवाचून काही अडत नाही, जास्त डीपमध्ये इंग्रजी शिकणार नाही असा न शिकण्याचा अभिमान कित्येक वर्षे बाळगून आहे. पण अनेक गुळगुळीत मासिके पाहिल्यावर, दर्जेदार इंग्लिश कादंबऱ्या, सिनेमांचं समीक्षणं वाचल्यावर आपण या गोष्टींचा आस्वाद घेऊ शकत नाही याची खंत वाटते.

तो कुठला तो आवेनजर की काय बघितला. 300 रु घालून.

मागचे 20 न बघून 6000 रु वाचल्याबद्दल स्वतःचेच आभार मानले.

20 पार्ट अन 50 पात्रे, 10 ग्रह .

डार्क लोर्ड अन हॉगव्हर्टची मजा कशालाच नाही

मी असं काही करत नाही ह्या अभिमानापेक्षा, समोरचा ती गोष्ट करतो त्याबद्दल त्याला जज करण्याचा / हिणवण्याचा प्रकार जास्त आढळतो. व्हेजिटेरियन लोकं मीट खाणार्या लोकांना, शास्त्रीय संगीत ऐकणारे, सुगम संगीत ऐकणार्यांना, क्रिकेट न बघणारे, क्रिकेट बघणार्यांना असंच हिणवतात.

मोरचा ती गोष्ट करतो त्याबद्दल त्याला जज करण्याचा / हिणवण्याचा प्रकार जास्त आढळतो. >>> हो कधी तसे असते, तर कधी आपल्याला आवडत नाही, आपण पाहिले नाही याचा एक न्यूनगंड असतो पण आपल्यासारखे इतरही आहेत हे कळल्यावर असा अभिमान ठामपणे बाहेर येतो. असे काहीतरी असावे.

माझीही बरीच मोठी लिस्ट आहे Happy

खुद्द पुलंनीच बहुधा हे म्ह्ण्टलेले आहे - की एखादी गोष्ट आपल्याला आवडते म्हणण्यापेक्षा आवडत नाही हे सांगण्यात काहीतरी असते - नक्की वर्णन लक्षात नाही.

केदार Lol
हे असं पुर्वीची पिढी जास्त करायची. (असं मला पुर्वी वाटायचं Proud ) मी कायम वेळेवरच जातो, मी नीटनेटकाच रहातो, मला घर/ किचन साफच लागतं, मला हे चालतच नाही इ. इ. एकदा तुम्हाला भरपूर आत्मविश्वास आला की लाथ मारेन तिथे पाणी काढेन अशी वृत्ती बळावते आणि मग असे कंपू करुन रहाणारे लोक नावडेसे होतात. ही समाजात मान्यता मिळवायला घेतलेली बंधने गळुन पडायला लागतात आणि आपण जसे आहोत तसे राहू लागतो.
लहानपणापासून हे करू नको ते करू नको असे विचार आपल्या डोक्यात आपल्या पालकांनी भरलेले असतात. बाहेरचं जग दिसलं आणि तुमच्यात निर्णय घ्यायची आणि निभावुन न्यायची धमक असली, तुमचे सुरुवातीचे निर्णय बरोबर आले की ही ताकद/ धमक ही वाढते आणि मग एक बेफिकिरी पॉझिटिव्ह अर्थाने येते. यात आपल्या माणूसपणाच्या संकल्पना ... मोराल कंपास ठीकठाक सेट झाला असेल की तुमच्या कृतीला तुमच्याच मनात एक अधिष्ठान प्राप्त होते. आता तुम्हाला सेट बॅक जरी बसले तरी तुम्ही हादरुन कदाचित जात नाही आणि पुन्हा उभारी घेण्याची ताकद तुमच्या सेविंग मध्ये असते.
आवडत नाही हे सांगणे इतपत राहिले तर ते ठीकच आहे. पण ते हिणकस आहे आणि माझी अभिरुची कशी उच्च आहे हे सांगण्याचा अट्टाहास आला की गणित चुकायला लागतं.

"आवडत नाही हे सांगणे इतपत राहिले तर ते ठीकच आहे. पण ते हिणकस आहे आणि माझी अभिरुची कशी उच्च आहे हे सांगण्याचा अट्टाहास आला की गणित चुकायला लागतं." - बिंगो!

"कधी आपल्याला आवडत नाही, आपण पाहिले नाही याचा एक न्यूनगंड असतो पण आपल्यासारखे इतरही आहेत हे कळल्यावर असा अभिमान ठामपणे बाहेर येतो. असे काहीतरी असावे." - +१

मधुनच काही लोक माबोवरचे आपले लेखन गायब करतात. असे मी करू शकतो हे दर्शवण्यापाठीमागे न कंटीन्यू करण्याचा इगो असतो का किंवा कसे.

राजे,
अर्ध्या हळकुंडाने पिवळी होणारी लेखकांची जमात सध्या मायबोलीवर अचानक मोठ्या प्रमाणात उदयास आल्याने हे असे घडत असावे....
नाहीतर ह्यापूर्वीच्या दिग्गज लेखकास कितीही वेगवेगळया प्रतिसादांचा सामना करावा लागला तरी त्यांनी असे समाजविघातक कृतघ्नपणाचे पाऊल खचितच उचलले दिसले नाही.

न करण्याचा अभिमान बाळगणार्‍यांपेक्षा 'आम्ही हे करतो' ह्याचा फुकाचा अभिमान बाळगुन दुसर्‍यला हिणवणारे, कमी लेखणारे, दुसर्‍याला कशी उच्च अभिरुची नाही, ज्ञान नाही, अक्कल नाही असे समजणारेच जास्त दिसतात आजुबाजुला.
तुम्हाला आवड्तंय तुम्ही बघताय तुमची चॉइस. तुम्हाला आवड्तंय म्ह णुन उच्च अभिरुची आणि समोरच्याला आवडत नाहीये, तो बघत नाहीये, त्याला त्या गोष्टीबद्दल ओ की ठो माहित नाही म्हणून त्याला कशी चॉइसच नाही हे जास्त बघितलंय.

"आवडत नाही हे सांगणे इतपत राहिले तर ते ठीकच आहे. पण ते हिणकस आहे आणि माझी अभिरुची कशी उच्च आहे हे सांगण्याचा अट्टाहास आला की गणित चुकायला लागतं." -

>> अमितव , अगदी बरोबर

कधी आपल्याला आवडत नाही, आपण पाहिले नाही याचा एक न्यूनगंड असतो पण आपल्यासारखे इतरही आहेत हे कळल्यावर असा अभिमान ठामपणे बाहेर येतो. असे काहीतरी असावे.

>> फारएण्ड , हेही पटल

न करण्याचा अभिमान बाळगणार्‍यांपेक्षा 'आम्ही हे करतो' ह्याचा फुकाचा अभिमान बाळगुन दुसर्‍यला हिणवणारे, कमी लेखणारे, दुसर्‍याला कशी उच्च अभिरुची नाही, ज्ञान नाही, अक्कल नाही असे समजणारेच जास्त दिसतात आजुबाजुला.
तुम्हाला आवड्तंय तुम्ही बघताय तुमची चॉइस. तुम्हाला आवड्तंय म्ह णुन उच्च अभिरुची आणि समोरच्याला आवडत नाहीये, तो बघत नाहीये, त्याला त्या गोष्टीबद्दल ओ की ठो माहित नाही म्हणून त्याला कशी चॉइसच नाही हे जास्त बघितलंय.

>> सस्मित , तुमचा मुद्दा १०० % बरोबर आहे न असे लोक असतातच , आणि त्यानी दुसयाना हिणवणही १०० % चूकच .

पण माझा मुद्दा थोडा वेगळा आहे , न गोंधळ घालता मांडायचा प्रयत्न करतो, नाही जमला तर नक्की सांगा

एखाद्याने समजा शेकडो इंग्रजी सिनेमे पाहिले, त्यात त्याने त्याचा वेळ , पैसा , अनेक गोष्टी गुंतवल्या आहेत ,

एखाद्याने जग फिरून पाहिले तर त्याने जास्तच वेळ , पैसा इतरही गुंतवल आहे .

त्याना त्याचा अभिमान असण्यात मला फारस गैर वाटत नाही (पुन्हा एकदा त्याना इतराना हिणवण्याचा हक्क नाहीच)

पण जेव्हा एखादा मी काय बाबा इंग्लिश पिक्चर बघत नाही , आपण काय तसली जग फिरायची थेर करत नाही , याचा अभिमान बाळगतो , तर ते चुकीच नाही का ?

पण जेव्हा एखादा मी काय बाबा इंग्लिश पिक्चर बघत नाही , आपण काय तसली जग फिरायची थेर करत नाही , याचा अभिमान बाळगतो , तर ते चुकीच नाही का ?>>>>> अर्थात आहेच चुकीचं.
असे अनुभव आलेत. आम्ही दरवर्षी दोनदा फिरायला जातो. आणि इतर वेळीही कुठे ना कुठे जातच असतो. तर माझीच रीलेटीव बाई 'आम्ही नाही बाई हे असं सतत फिरत. कामं किती असतात. काय ते फिराय्चं सतत' असं बोललेय. Happy
मला वाटतं की ह्या केसमधे जेलसी, स्वतःला ती गोष्ट जमत नाही ह्याचं वाईट वाटणं हे असावं.
असो. अवांतर खुप झालं.
आणि मी तुमच्या मुद्द्याला खोडण्यासाठी लिहिलेलं नव्हतं एक जनरल निरीक्षण लिहिलं.

सस्मित ,

आणि मी तुमच्या मुद्द्याला खोडण्यासाठी लिहिलेलं नव्हतं एक जनरल निरीक्षण लिहिलं. >> मला अस काहीही वाटल नव्हत , उलट तुमचा प्रतिसाद आवडलाच Happy

<<मला वाटते भक्तांमुळे हेटर्स निर्माण होतात. ती प्रतिक्रिया आहे...>>
खरे आहे.
माझ्या मते एकाएकी आपले मित्र आपण न बघितलेल्या सिनेमांचे, टीव्हीचे भक्त होऊन त्याशिवाय इतर काही बोलतच नाहीत, तेंव्हा आपल्याला दूर ढकलल्यासारखे वाटते, मग लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी सांगायचे की आम्ही ते बघत नाही, करत नाही. म्हणजे मग थोडा वेळ तरी भक्त मित्र म्हणतात आँ!
हा अनुभव मला बरेचदा येतो.

<<<पण त्याही पेक्षा, एकदा हा न करण्याचा अभिमान वाटायला लागला की अभिमान वाटावा अस काही करायची इच्छा कमी होईल का ?>>
मग जुन्या मित्रांशी बोलायला काही नसले तरी पार्टीत फुकट हादडायला मिळते, नि जमल्यास त्यांची टिंगल पण करता येते.
<<आणि मग हेकट हेटर्स आणि चिवट भक्त जगाला नरक बनवून टाकतात ही शोकांतिका आहे आजची.>>
अरे बापरे, नरक??!
हे जग किती सुरेख आहे, चांगले आहे, असे ज्यात लिहीले आहे त्या कविता वाचा. बरे वाटेल!
जगात वाईट गोष्टी कदाचित चांगल्या गोष्टींपेक्षा जास्त असतील, पण आपण आपले चांगले काय ते घ्यावे, त्यातच रहावे.

>>मला वाटते भक्तांमुळे हेटर्स निर्माण होतात. ही क्रिया आहे<<
कदाचित जहिररित्या असं होणं/करणं हि वस्तुस्थिती असावी, पण मला तरी हा रिवर्स सायकॉलजीचा प्रकार वाटतो... Proud