मुखवटा

Submitted by प्रांजलीप्रानम on 29 April, 2019 - 03:24

मुखवटा
चढविताना प्रौढत्वाचा सात्विक मुखवटा
करावी लागते अनेकदा
भाव-भावनांची होळी
निखाऱ्यावर कर्तव्याच्या होत असते
मनीच्या तव्याची
पाठ लाल-काळी
न फोडता टाहो वेदनांचा
भाजावी लगाते
स्वकियांसाठी पोळी
बांधलेले पाश असती भार अंतरीचे
सोडता सुटेना
मोहात गुंतलेली एकही मोळी
पुसाव्या लागतात पर्यायाअभावी
आपल्याच कवनाच्या
आवडत्या ओळी
भविष्याची चिंता पोखरते जीवाला
लाड पुरविण्याच्या
आयत्या वेळी
रूसवे-फुगवे खीजगणतीतले आपल्याच
तडजोडीच्या नावाखाली
हरली जाते प्रत्येक खेळी
सात्विक मुखवटा तो जपण्यापायी
द्यावा लागतो स्वत:लाच
आपल्या 'स्व'त्वाचा बळी
......प्रांजली

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults