झंझावात

Submitted by अमृताक्षर on 28 April, 2019 - 04:12

एका शांत, स्तब्ध नदीसारखं माझ आयुष्य.

शीतल तरीही सूर्याची किरणे तेवढ्याच अलगद सामावून घेणार...

येणाऱ्या प्रत्येक दिवसाला सारख्याच ऊर्जेने सामोर जाणार..

कुणाचा हेवा नाही की कशाचा मोह नाही..

क्षण अन क्षणं फक्त स्वतः मध्ये च गुरफटलेल...

आणि

तू..

तू म्हणजे कायम झंझावत असणार वादळ..

तुझा मुक्काम कधी या किनाऱ्यावर तर कधी त्या..

तुझा राग त्या वादळा सारखाच प्रशुब्द आणि तेवढच वेड्यासारखं तुझ प्रेम ही..

शांत, स्तब्ध आणि एकाकी असणं तुझ्या गोत्यातच नाही..

तरीही तुझ्या येण्याची चाहूल लागली की मनात एक ऊर्मी दाटून येते..

माहिती असत मला की,

आता क्षणात हे वादळ येईल आणि आपल्या सर्वांगावर उठून जाईल हजारो लाटा..

उधळून टाकील ही शांतता आणि रुतून जाईल आपल्यात खोल खोल..

इतकं खोल, इतकं एकजीव की मग कुणी विलगच करू शकणार नाही आपल्याला..

मी ही होईल मग बेभान..

तूझ्या प्रत्येक स्पर्शाने शहारून येईल हे अंग..

उंचच उंच उसळती ल या लाटा..

मग..

मग एका क्षणी तू येशील भानावर..

तुझा तो आवेश ओसरेल..तू निवळशिल..

तुझी सगळी ऊर्जा मला देऊन तू अगदीच

रीता रीता होशील..

आणि चालू ठेवशील तुझा तो निरंतर प्रवास..

या किनाऱ्यावरून परत त्या किनाऱ्यावर..

पण..

पण.. माझ काय..?

आता परिस्थितीत बदलेली असेल..

तू माझ्यात रिक्त केलेली ही ऊर्जा,हा आवेश थोपवण मला जमेल काय..?

माझ्या सर्वांगावर उठलेले शहारे घेऊन मी तितकीच शांत आणि स्तब्ध होऊ शकेल काय..?

तुझा स्पर्श आणि स्पर्श अजूनही ताजा आहे माझ्या प्रत्येक रोमारोमंत...

तू आलास झंझावात सारखं आणि शांत होऊन गेलास..

पण..

माझ्या डोहात खोल खोल गेलेली ती तुझ्या प्रेमाची अवशेष घेऊन मी कुठवर तुझी वाट पाहील..

मला जमेल का तुझा तो अलगद झालेला स्पर्श घेऊन शांत राहायला..?

खूप कठीण जातंय हल्ली मला हे तुझ अस अनामिकासारख येणं आणि मी तंद्रीत असताना तुझ असच अनामिकासरख निघून जाणं..

वादळा,

पुढच्या वेळेस येशील ना तर बरोबर नेशील मलाही..कायमच..

खरच कंटाळा आलाय एकदा वादळात गुरफटून पुन्हा नदी होण्याचा..

मी वाट पाहतेय..

येशील ना तू..?

एकदा कायमच घेऊन जायला..?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users