जनावरांच मतदान

Submitted by मंगेश सराफ on 25 April, 2019 - 04:25

जनावरांच मतदान

विचार करा जनावरांच
जर असत मतदान
त्यांच्या समोर पुढाऱ्यांनी
झुकवली असती मान

Election चा festival
असतो जोरदार
तिकिटासाठी हपापलेले
इथे सारेच 'उमेदवार'

तिकिटासाठीच कधीही विकतील
आपल हे इमान
विचार करा जनावरांच
जर असत मतदान...

घराणेशाही इथे नॉर्मल आहे
तीन पिढ्या सरता - सरता
सतरंज्या अजूनही उचलतो
आपला सच्चा कार्यकर्ता

चारित्र्संपन्न उमेदवारांची
पक्षाला नसते जाण
विचार करा जनावरांच
जर असत मतदान....

प्रत्येक मतदार यांच्यासाठी
असतो खरतर प्यादा
गल्ली बोळात दिसतील
इथ 'भाऊ' अन 'दादा'

तुम्हाला तर माहितीच आहे
या ' भाऊ ' दादांची शान
विचार करा जनावरांच
जर असत मतदान....

निवडणूक जवळ आल्यावर
यांचा ठरतो गेमप्लॅन
धर्मा- जातीत भांडणे लावून
करतील तेढ निर्माण

तुम्ही मात्र नित्य असूद्या
माणुसकीची तव जाण
विचार करा जनावरांच
जर असत मतदान....

सत्तर वर्षापूर्वी
इंग्रज सोडून गेली
चिमुकल्या पावलांनी
लोकशाही आली

व्यक्ती बदलल्या असतील
परी वृत्ती मात्र समान
विचार करा जनवरांच
जर असत मतदान....

सत्तेसाठीच सुरू असते
सगळी खेचातान
आम्हाला मात्र लोकशाहीचा
किती अभिमान
आमच्या साठी नेहमीच
असतो आमचा देश महान

पण विचार करा जनावरांच
जर असत मतदान...

कवी- मंगेश सराफ

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users