क्रोकरी

Submitted by अर्लिना on 24 April, 2019 - 01:28

नविन क्रोकरी घ्यायची आहे.
मेलामाइन /प्लास्टिक नको. ओपलवेअर, glassware, सिरामिक, बोन चायना पर्यायांबद्दल महिति हवी.
याबद्दल उपलब्ध धागा असल्यास plz link द्या.
धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्लेट्स घ्याल त्या घ्या,
पण त्या वाळत घालायला तारेचा स्टँड मिळतो , ओट्यावर रेस्ट होणारा, ज्यात प्लेट्स उभ्या राहतात, तो नक्की घ्या,
7 8 प्लेट्स धुवून ओट्यावर पालथ्या घालायला जागा पुरत नाही Lol

बोल आणि ग्लासेस, जर पिसेस वर घेणार असाल तर 2 3 जास्तीचे घेऊन ठेवा, म्हणजे एखादा फुटला तरी सेट डिस्टरब होत नाही.

बोल आणि ग्लासेस, जर पिसेस वर घेणार असाल तर 2 3 जास्तीचे घेऊन ठेवा, म्हणजे एखादा फुटला तरी सेट डिस्टरब होत नाही. >>>> पूर्वी ही अगदीच व्यावहारिक सूचना होती कारण पाहुणे, मुलं आणि पार्टीतला गोंधळ यात एका जरी क्रोकरी पिसचा जीव गेला तरी सेट बिघडून जायचा. पण हल्ली ला ओपाला किंवा कोरल सारखे इकॉनॉमी ब्रँड्स पीस बेसिसवर विकत मिळतात. तुमच्याकडे असलेल्या डिझाइनच नाव मात्र माहीत हवं.

मेलमाईन आणि प्लास्टिक नको म्हणालात हे बेस्ट. स्टील वापरा पण हे दोन मटेरियल अजिबात नकोत. भारतात चिक्कार ब्रँडेड आणि नॉन ब्रँडेड क्रोकरीच्या व्हरायटीज मिळतील पण कोरल सारख्या चीप प्रूफ ब्रॅन्डमध्ये पैसे घालवणं फायदेशीर. रोजच्या वापरात ग्लासवेअर असेल तर चीप प्रूफ हवाच, कारण मेड्सना नाजूकपणे हाताळायला वेळ नसतो.

@अर्लिना - किचन स्टँडपेक्षा वॉल मौंटेड स्टँड (रॅक) कधीही फायदेशीर, ओल्ड फॅशन वाटली तरी.
किचनओट्याचा स्पेस हा आधीच बहुतेकदा कमी असतो, आणि त्यात स्टँड जास्त जागा अडवतो.
नो प्लास्टिक यासाठी थम्स अप!!!

धन्यवाद @मीरा...
धन्यवाद @अज्ञातवासी. आधीचे लाकडी रॅक आहेत तेथे, म्हणून सध्यातरी स्टँड हाच पर्याय आहे....

नवीन घर घेतलेत वगैरे म्हणून क्रोकरी घेत असाल तर गृहशांती आमंत्रणात " कृपया क्रोकरी भेट आणू नये" असे ठळक अक्षरात लिहा, नाहीतर पासिंग द पार्सल खेलुन आलेले 1 2 डिनर सेट आणि मिस मॅच डिझाईन च्या प्लेट्स सांभाळत बसावे लागेल.

जर मायक्रोवेव वापरत असाल अन्न गरम करायला तर बोन चायना घेऊ नका. त्यावर जर गोल्ड्न किंवा सिल्वर कलरची बॉर्डर असेल तर ते मावेत चालत नाही. ठिणग्या उडतात. तेव्हा कोरलच बेस्ट.

@ सायो ही माझ्यासाठी पूर्णपणे नवीन माहिती....धन्यवाद ....गोल्ड्न /सिल्वर कलरची बॉर्डर असलेल्या सर्व cookware ला ही समस्या नसते ना?फक्त बोन चायना?

गोल्ड् न सिल्व्हर कलरची बॉर्डर मेटल बेस्ड असेल, तर मायक्रोवेव्हला नाही चालणार.
मायक्रोवेव्ह साठी वेगळीच भांडी घेतलेली बरी. मी बोरोसिल वापरतो.

मायक्रोवेव्हचा डेमो देतान विजय सेल्सच्या माणसाने काचेचे जाड भांडे चालेल म्हटले होते,पण ते(भांडे) तडकले.तेव्हा मावेचीच काचेची भांडी वापरा. बोरोसिलची भांडी चांगली आहेत.

हो. माझापण एक छोटा बाउल फुटला मावेत. दोन मिनिटांत. >>>>. रेफ्रिजरेटरमधून काढलेला अति थंड होता का? मी कोरलच्या डिनर सेटमधली आणि बोरोसिल अशी दोनच ब्रँड्सची भांडी अव्हनमध्ये वापरते. हितकरी आणि ला ओपालाचे मग्ज आणि एक डीप प्लेट आहे ती पण अनेकदा वापरते.

नाही. छोटा सर्व्हिंग बाउल होता. बेदाणे दोनच मिनिटे थोड्या पाण्यात मावे करायचे होते. म्हणून तो वापरला.
तेव्हापासून कानाला खडा. मायक्रोवेव्ह प्रूफ असं लिहिलेली किंवा त्यासाठीच बनवलेलीच भांडी वापरतो.

माझ्या ला ओपेला च्या तीन प्लेट मावेमध्ये फुटल्या आहेत. प्लेटवर मावे सेफ लिहिलेलं होतं.
पहिली प्लेट मावे उद्घाटनालाच फुटली. मावे घरात आल्यावर रवा भाजायला ठेवला. मिनिटाच्याआतच प्लेट तडकली.

नंतर परत एक छोटी आणि एक मोठी प्लेट ठेवून बघितली अगदी अर्ध्या मिनिटाकरता. पण त्या दोन्ही प्लेटस पण फुटल्या.
त्यानंतले ला ओपेलाची कोणतीही वस्तू रिहीटिंगला सुद्धा मावेत वापरत नाही.
शिजवायला फक्त बोरोसील आणि रिहीटिंगला येरा, खूर्जा सिरॅमिक पॉटरी, कोरल डिनरसेट मधले बोल्स इ. वापरते.