|| जय श्रीराम ||

Submitted by jayshree deshku... on 21 April, 2019 - 13:21

|| जय श्रीराम ||
मुखी सर्वांच्या वसे श्रीराम
श्वास आणि ध्यास राजाराम

कर्तव्याचे पालन राम
एकबाणी, वचनी राम

संत ऋषीच्या विसाव्याचे धाम
चराचरात ह्या वसे श्रीराम

कर्ता करविता तूची राम
भक्तीचा भुकेला तू श्रीराम

हृदयी सर्वांच्या आत्माराम
भक्तीची भिक मज देई राम

तृषार्त मी तुजसाठी राम
नामाची संगत दे रे राम

पतित पावन तूची राम
कृपाप्रसाद दे मज श्रीराम

भिक नामाची दे श्रीराम
तोषावे मन तव घेता नाम

नको प्रपंची आसक्ती राम
चरण धुलीकण मी रे राम

साक्षित्वाने तव करते काम
शेवट हो मुखी असता राम

Group content visibility: 
Use group defaults

Chan