घरगुती कपड़्याचा व्यवसाय कसा वाढवावा

Submitted by Cuty on 19 April, 2019 - 06:30

घरगुती व्यवसाय आहे. लेडीज कपड़याची विक्री करते. नुकतीच सुरूवात केली आहे. विक्री वाढण्यासाठी काय करावे?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

पुण्यात असाल तर फेसबुक पुणे लेडीज आणि इतर सेल्स ग्रुप जॉईन करा.त्यावर विशिष्ठ जाहिरात दिवस असतात.काही नियम असतात(फेसबुक सेल ऑप्शन वापरायचा नाही, मोड ऑफ पेमेंट बद्दल स्पष्ट माहिती, फोटो वर स्पष्ट लिहिलेली किंमत, स्वतःच्या प्रोडक्ट चा खरा फोटो(इंटरनेटवर त्यासारखा सर्च करून डाउनलोड केलेला नव्हे).
व्यवस्थित प्रोडक्ट इमेजेस असल्यास ऑर्डर चांगल्या मिळतात.कुरियर, शिपिंग ची जबाबदारी आणि फॉलो अप नीट करावा लागतो.
अमेझॉन सेलर अकाउंट आहे.पण याला gst आणि टॅन नंबर मिळवलेला असावा लागतो.
पुण्यात असल्यास पुणे लेडीज चे सदस्यत्व घ्या.बाकी नियम समजतीलच.

जस्ट डायल वर फ्री लिस्टिंग असतात, त्याचा लाभ घ्यायचा. पेड लिस्टिंगच्या मोहात बिलकुल पडायचं नाही.
बचत गट आणि स्किल सेंटरशी संलग्न व्हा. हँडलूम टाईप प्रॉडक्ट असेल, तर एक्सबिशन मध्ये संधी मिळते.
ऍमेझॉन सेलर अकाउंट इज नाईस ऑप्शन. जरूर विचार करावा.

आंत्रप्रेनरशिप सोपं काम नाहीये. अभिनंदन आणि शुभेच्छा!

आसपासच्या परिसरातील लोकांना दरमहा शंभर दोनशे रुपये हप्त्यावर कपडे विकता येईल का याचा शोध घ्यावा. तसेच कामगार वसाहतीत माल घेऊन असेच हप्त्यांवर गिऱ्हाईक मिळतात का हे पहावे . शक्यतो पहिल्या दोन हप्त्यांत भांडवल वसूल झाले पाहिजे. नफा नंतर मिळाला व बुडाला तरी दु:ख होत नाही. कितीही विश्वास निर्माण झाला तरी चारपाचशे रूपयांवर उधार माल देऊ नका. शेजारी पाजारी दुकानात जाहिरात लावावी.

माझ्या माहितीच्या अनेक स्त्रियांनी घरगुती कपडे विक्री धंद्यात चांगला जम बसवला आहे. गोड बोलणं, तुम्हाला हा रंग छान दिसेल , एकदम क्वालिटी चीज आहे असे सांगून चांगले कस्टमर जोडले आहेत. पण खराब माल ठेवला तर कस्टमर घेत नाहीत. हा धंदाच माऊथ पब्लिसिटी वर चालतो.

दुकानातील सेल्सवुमन ग्राहकांशी कश्या वागतात, खरेदी करण्यास राजी कसे करतात हे नकळतपणे जाऊन अभ्यासा.

सुरवातीला नातेवाईक, मैत्रीणीच्या माध्यमातून विक्रीला सुरवात करा.. त्यांच्या ओळखीने आणखी ग्राहक भेटू शकतील. Quality असेल तर ग्राहक आपोआप जोडले जातील. त्यासाठी दुकानच हवे असं काही नाही किमान सुरवातीला तरी. Contacts वाढवा विक्री पण वाढेल.

:-)))