(आम्ही कोण ?)

Submitted by अनन्त्_यात्री on 17 April, 2019 - 09:01

आम्ही कोण म्हणोनि काय पुससी? आम्ही असू लाडके-
श्रेष्ठींचे, दिधले तये कुरण हे आम्हास पोसावया
पैशाने तुमच्याच आम्ही मिरवू चोहीकडे लीलया
दुष्काळातही अर्थप्राप्ती आमुची पार्टी कराया शके //

सारेही विधी, कायदे, नियम हे आम्हा तृणासारखे
हस्तक्षेपच आमुचा शकतसे राष्ट्राप्रती द्यावया
अस्थैर्यातिशया अशी वसतसे जादू करांमाजि या
प्रज्ञेचे प्रति-सूर्य पाळू पदरी - सत्तेपुढे जे फिके //

सत्तेमाजि वसाहती वसविल्या कोणी ठगांच्या बरे?
सत्तेला घरची मिरास करण्या सांगा झटे कोण ते?
ते आम्हीच, क्षुधा अदम्य अमुची - मरणोत्तरेही उरे
ते आम्हीच, दरिद्र-दैन्य तुमचे ज्यांपासुनी जन्मते//

आम्हाला निवडा-पुनश्च फ़ुगवू आम्ही स्वतःचे खिसे,
आम्हाला निवडा- पुनश्च उडवू डेमॉक्रसीचे हसे //

-(एखाद्या जुन्या कवितेशी साधर्म्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा)

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

तळमळ लक्षात आली. सगळीकडे फाटल्यावर ठिगळ तरी कुठे लावणार.‌ मोदींनी भरपूर पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या हेतूवर शंका घेऊन विरोध करणारे विचारजंतू वळवळत आहेत. परत चोरांच्या ✋ तिजोरीच्या चाव्या द्याव्या म्हणून आटापिटा केला जातो आहे.

It is not voter’s concern to know where the money comes from. Transparency cannot be looked as a mantra
राजकीय पक्षाला पैसा कुठून मिळाला, हे मतदाराला समजायची गरज नाही. पारदर्शकता म्हणजे सगळं काही नव्हे.
Attorney journal इलेक्टोरल बॉंड्सबद्दल केंद्राची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडताना .
बर्का.