अशोकाची सावली

Submitted by Jyoti Gosavi on 1 April, 2019 - 04:26

बीज अंकुरे अंकुरे या विषया ला अनुसरून माझी कथा कथेचं नाव आहे

अशोकाची सावली

अशोक वृक्षाचे झाड मोठे स्वार्थी असते ते कोणाला आपली सावली देत नाही अगदी स्वतःच्या पायापुरती सावली ते निर्माण करते ना त्याच्यावर पक्ष्यांना घरटी बांधता येतात ना कोणाला निवारा मिळतो ना त्याला सुमधुर फळे येतात ना ते कुणाची क्षुधा भागवते
अशोक नावाची माणसे देखील अशीच स्वार्थी असतात खरेतर अशोक या नावाचा अर्थ अशोक म्हणजे नाही शोक ज्या वृक्षाखाली शोक नाही तो अशोक पण ज्याने मला आयुष्यभर सतत शोकच दिला तो माझा नवरा अशोक, ज्याने मला आयुष्यभर दुःख दिले तो माझा नवरा अशोक, त्याच्या संसारात मी सतत उन्हाळ्यातच राहिले मला कधी सावली मिळालीच नाही तो माझा नवरा अशोक,
खरे तर आमचे अरेंज मॅरेज जगाच्या रीतीरिवाजाप्रमाणे कांदे पोहे इत्यादी सर्व सोपस्कार पार पाडून हुंडा व मानपान सारे सांभाळून आई वडिलांच्या पसंतीने केले लग्न. पण का कोणास ठाउक त्याचे माझे कधी जमलेच नाही आमच्या दोघांच्या स्वभावाची दोन टोकं होती. तो तापट तर मी शांत, मी रसीक तर तो रुक्ष बायको म्हणजे त्याच्या दृष्टिकोनातून एक उपभोग्य वस्तू ,कामापुरते गोड वागणार त्यानंतर तू कोण आणि मी कोण कधी बायकोच्या नटण्यामुरडण्यात कडे लक्ष नाही कधी कौतुकाचा शब्द नाही एवढ्या तीस वर्षांच्या संसारात कधी साधा एक गजरा देखील आणला नाही अगदी लग्नाच्या पहिल्या रात्री पासून माझा भ्रमनिरास झाला हिंदी सिनेमा बघून बघून माझ्या मनात सुहागरात विषयी खूप वेगळ्या कल्पना होत्या. ते घुंगट वगैरे घेऊन बसणे ,लाजत लाजत दुधाचा ग्लास घेऊन जाणे इत्यादी इत्यादी या गोष्टी तर दूरच पण माझ्या नवऱ्याने एखाद्या त्रयस्थ माणसासारखा जसं काही तुला ओरबाडणे हा माझा हक्कच आहे अशा पद्धतीने आपला कार्यभाग उरकला व चक्क माझ्याकडे पाठ करून हा माणूस घोरू लागला त्याक्षणी माझ्या इच्छा आकांक्षाचा चुराडा झाला होता .त्यानंतर प्रत्येक गोष्टीत त्याने मला फक्त गृहीतच धरले कधी कोणत्या निर्णयातून मला सहभागी करून घेतले नाही.खरे तर दोघांनी मिळून खरेदी करण्याचा आनंद काही औरच असतो घर म्हणजे काही फक्त चार भिंती नव्हे तर दोघांनाही काडी काडी जमवून उभा केलेला संसार असतो. त्यासाठी करावे लागणारे कष्ट याचा आनंद असतो. तो मला कधी मिळालाच नाही
त्याने घरात टी व्ही आणला फ्रिज आणला पण एकट्यानेच दुकानात जाऊन लगेच खरेदी करून लगेच घरात वस्तू हजर ,इथं नवरा बायको कसे दोघे मिळून मिसळून जातात कोणत्या कंपनीचा घ्यायचा कोणत्या कलरचा घ्यायचा इत्यादी गोष्टी मिळून ठरवतात त्या निमित्ताने हातात हात घालून फिरतात वस्तू पसंत करतात त्यानिमित्ताने हॉटेलिंग वगैरे असा वस्तू खरेदीचा पूर्ण आनंद घेतात हे असे छोटे छोटे आनंदाचे क्षण माझ्या वाट्याला कधीच आले नाहीत त्यांनी एकदा वाशिंग मशीन आणले व त्या ट्रायल म्हणून चप्पल जोड वाशिंग मशीन मध्ये टाकला मी फक्त म्हटले चप्पल नका टाकु मी फक्त एवढा वाक्य बोलण्याचा अवकाश त्यांनी घरातल्या सर्व चप्पल वाशिंग मशीन मध्ये टाकल्या .
पदोपदी पावलोपावली माझा पाण उतारा कसा करता येईल हेच ते बघत असत. मी असेल त्या गोष्टीत आनंद मानत होते त्यात मला दिवस गेले डोहाळे लागले पोटात पाणी देखील ठरेना ओकुन ओकुन अगदी दमून जायचे पण यांनी कधी प्रेमाने विचारपूस केली नाही कधी डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला नाही उलट त्यांना वेळच्यावेळी स्वयंपाक तयार लागायचा मला फोडणीचा जरादेखील वास सहन होत नव्हता पण म्हणून या माणसांने कधी असं म्हटलं नाही की आज नको स्वयंपाक करू आपण बाहेर जाऊ उलट म्हणायचा की काय न्याचरल प्रोसेस आहे त्याचा एवढा बाऊ करण्याची गरज नाही चार कामे जास्त कर म्हणजे सुखरूप बाळंत होशील नाहीतर सिजर चा खर्च आहेच माझ्या डोक्यावर, आणि दुर्दैवाने बाळंतपणाच्या वेळी सिझेरियन करावं लागलं एक तर पहिली मुलगी त्यात सिझेरियनची त्यामुळे यांचे तोंड वाकडे. माझ्या माहेरी गरिबी असल्याने सर्व खर्च यांना करावा लागला अर्थात मी स्वतः कमावती होते
यांच्याइतकाच पगार मी घेत होते तरीपण त्यांचा जीव खर्चासाठी वर खाली होत होता
सुमेधा तीन महिन्याची झाली अन मी कामावर जाऊ लागले आता तर माझी जास्त धावपळ होत होती मुलीचे सगळे आवरून तिला पाळणाघरात सोडणे दोघांचा डबे तयार करणे
त्यादिवशी मला बर वाटत नव्हत
दुधाच्या गाठी झाल्याने मला ताप चढला होता मला कामावर जायची मुळीच इच्छा नव्हती सगळ अंग कस अगदी भरून आलं होतं मी कसं बसं मुलीच आवरलं व तिला पाळणाघरात सोडले उशीर झाल्याने मी कपभर चहादेखील पोटात घातला नव्हता माझी नेहमीची 9: 35 ची लोकल चुकली होती त्यामुळे जी उभी होती ती पकडण्यासाठी मी धावले मी आत पाऊल टाकलं आणि ट्रेन हलल़ी पकडलेला हात केव्हाच निसटला होता आता मी डोळे गच्च मिटून घेतले आता आपण ट्रेन खाली जाणारच
माझ्या आयुष्याची इतिश्री इथेच होणार ते कळून चुकलं त्याक्षणी माझ्या डोळ्यापुढे फक्त माझी छोटी सुमेधा आली पण एवढ्यात एका मजबूत हाताने मला आत ओढून घेतलं मी मरणाच्या भीतीने अक्षरशः थंड पडले होते माझे हातपाय थरथरत होते घशाला कोरड पडली होती मी भीतीने त्या माणसाला मिठीच मारली होती
काय? बरं वाटत नाही का? पाणी हव का? असं म्हणत त्याने आपल्या सँक मधून बॉटल काढून माझ्या हातात दिली मी कसाबसा दोन घोट पाणी प्यायले त्याने मला अस विचारलं आणि माझा बांध फुटला कोण कुठल्या माणसाच्या गळ्यात पडून मी हमसून हमसून हमसून रडू लागले त्याने मला डोक्यावर थोपटलं आणि शांत केलं शेवटी डब्यातली माणसे आमच्याकडे पहात आहेत हे पाहून तो मला घेऊन पुढच्या स्टेशन वर उतरला मॅडम आपण कॉफी घेऊ तुम्हाला त्याची गरज आहे एका छोट्याशा टपरीवर स्टेशन बाहेर आम्ही दोघांनी कॉफी घेतली आता मला थोडी हुशारी वाटू लागली शेवटी तो मला माझ्या ऑफिस पर्यंत सोडायला आला
अशा रीतीने सुधीर माझ्या आयुष्यात आला काही ना काही कारणाने आमच्या गाठीभेटी वाढत गेल्या नाही तरी त्या दिवशी मी मरणारच होते तिथून पुढच्या माझ्या आयुष्यावर पूर्णपणे सुधीरचा अधिकार होता जे प्रेम मला अशोक कडून अपेक्षित होते ते प्रेम मला सुधीर कडून मिळत होते तो छोट्या छोट्या गोष्टीत माझ्या मनाचा विचार करे, माझी काळजी घेई मला नेहमी नेहमी वाटते की सुधीर मला लग्नाआधी भेटला असता तर? पण या जर-तरला काही अर्थ नसतो जसा जसा अशोक घरात माझ्याशी वाईट वागे, तसा तसा माझा सुधीर करता ओढा वाढत गेला आमच्या नकळत आम्ही एकमेकात गुंतत गेलो जे घडतंय ते वाईट आहे यातून काही निष्पन्न होणार नाही हे माहीत असून देखील आम्ही एकमेकात अडकलो होतो मनाला एक अपराधीपणाची टोचणी लागत असे पण सुधीरच्या बाहुपाशात विसावल्यानंतर मी माझं दुःख कधी कधी रात्री अशोक च्या हातून खाल्लेला मार, त्याने केलेली अवहेलना, अपमान ,इतकेच काय पण माझ्या छोट्या सुमेधाला देखील मी विसरून जात असे सुधीर पेक्षा मी पाच वर्षांनी मोठी होते ,एका मुलीची आई होते, अजून त्याचं लग्न झालं नव्हतं मला पण कळत होतं पण वळत नव्हतं आता मी देखील माझ्या नवऱ्याची खोटे बोलू लागले ओव्हर टाईम च्या नावाखाली सिनेमाला जाऊ लागले हळूहळू स्त्री-पुरुषाच्या नात्यातील सर्व मर्यादा ओलांडल्या, आम्ही कधी कधी लॉजिंग वर पण जाऊन राहू लागलो. आम्हाला एकमेकांवाचून चैन पडत नव्हते अगदी रात्रीदेखील मला घरी जाण्याची इच्छा होत नव्हती आताशा मला घरी देखील जावंसं वाटत नव्हतं
सुधीर
हूं
किती दिवस असचालायचं त्याच्या केसातून हात फिरवत त्याला विचारलं
अरे नुसता हुं हुं काय करतोस आपल्या नात्याला काही नाव आहे का ?
मैत्री
मैत्री च्या पुढे गेलोत आपण
असे किती दिवस चालायचं
मग काय करू म्हणतेस?
आपण लग्न करूया करूया
,अरे मी आपण लग्न करूया का म्हणून विचारलं
मी करूया म्हटले ना अरे पण माझ्या सुमेधा चं काय?
राहील तिच्या बापाचा कड
पण ती लहान आहे ना?
होईल तिला हळू हळू सवय
एकदा सगळी नाती तोडायचं म्हटलं की मग त्यात हे पण आलं
समजा त्या दिवशी तू जर ट्रेन खाली गेलेली असतीस तर काय केलं असतं, राहिली असती ना?
शेवटी एक दिवस आम्ही दोघे पळून जाण्याच्या निर्णयाप्रत आलो मी माझे दोन-चार कपडे व स्त्रीधन म्हणून असलेने सर्व दागिने पर्समध्ये भरले व लागणारे दोन-चार कपडे बॅगेत भरले मोठ्या जड अंतकरणाने मुलीचा पापा घेऊन तिला तिच्या पाळणाघरात सोडले जसं काही तो लहान जीव त्याला सारं काही समजल्या प्रमाणे त्या दिवशी तिने माझे केस धरून ठेवले होते तिला कळलं होतं की आता आपली आई आपल्याला पुन्हा भेटणार नाही त्यामुळे तिने मला धरून ठेवले होते की आई नको ना जाऊ ते केस मी कसेबसे सोडवले खरंच मला खूप रडू येत होते पण पाळणाघराचीमावशी विचारतील म्हणून मी स्वतःला कसेबसे सावरले स्टेशनवर सुधीर माझी वाटच पाहत होता
आम्ही राजधानीने दिल्ली ला पोहोचलो तिथून सिमला मनाली सर्व फिरलो मनाला एक प्रकारचे स्वतंत्र्य झाल्यासारखे वाटले पण रात्री झोपताना मात्र मला माझ्या मुलीची आठवण येऊ लागली आता मी सुधीर बरोबर एन्जॉय करू शकत नव्हते माझे अर्धे लक्ष घरी लागले होते घरी काय काय घडले असेल, त्यांचा माझी आई वडिलांवर काय परिणाम होईल, सुमेधा कशी राहत असेल ,अशोक काय म्हणत असेल या साऱ्या गोष्टींचा विचार मी खरच विचार केला नव्हता त्यामुळे मी हवी तशी सुधीरला देखील साथ देऊ शकत नव्हते त्याला मागचं सगळं विसरून फक्त मजा करायची होती. त्यामुळे तो पण आता चिडचिड करू लागला माझी अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली होती सुरुवातीला आम्हाला ,
आम्ही फार मोठे जग जिंकले आमचे प्रेम किती महान आहे त्यासाठी आम्ही रूढी-परंपरा नियम जगाची सारी बंधने तोडली असं वाटत होतं आता मात्र मला पश्चाताप वाटत होता इकडे आड तिकडे विहीर अशी माझी परिस्थिती झाली होती मी आता पुन्हा परत गेले तर मला घरात कोण घेणारःमी कुठे जाऊ आणि सुधीर च्या मागे तरी किती दिवस असेच फिरू? आमच्याकडचा पैसा संपत आला होता सुधीर म्हणाला आपण आत्महत्या करू या दोघांनी आम्ही सिमल्याला एका कड्यावरून झोकून देण्याचा विचार केला तो म्हणाला तू आधी उडी मार तेव्हा माझ्या डोळ्यासमोर माझी मुलगी आली आणि मी शेवटी माघार घेतली आम्ही मुंबईला परतण्याचा निर्णय घेतला मुंबईला परत आलो मला बघितल्याबरोबर अशोकने मला दरवाजातच मारायला सुरुवात केली माझ्या तोंडावर दरवाजा बंद केला माझी मुलगी माझ्या माहेरच्या माणसाने केव्हाच घरी नेली होती .त्याचा पण राग बरोबर होता म्हणा माहेरच्या दारात उभी राहिले तर माझ्या बाबांनी देखील मला मारझोड केली आत माझ्या मुलीच्या रडण्याचा आवाज येत होता माझी छाती भरून आली आता मला साऱ्या जगाचा विसर पडला माझ्या वडिलांना बाजूला ढकलून देवून आत गेले माझ्या मुलीला जवळ घेतले जवळ जवळ दीड महिन्यांनी ती मला भेटत होती लहान बाळाला बरोबर आईची ओळख पटते म्हणतात आणि ती माझ्या कुशीत शिरून लगेच शांत झाली
शेवटी अशोक त्याच्या घरची माणसे माझ्या माहेरची माणसे यांच्यात एक बैठक झाली त्यात माझ्या अब्रुची भरपूर चिरफाड करण्यात आली अशोक मला वेश्या, बदफैली वगैरे शब्द वापरत होता तर माझ्या बाबांनी आणि भावाने देखील तुझ्यामुळे आमच्या नावाला काळिमा लागला तुझ्यामुळे आमचे कुळ बुडाले, आमच्या तोंडाला काळे फासले, वगैरे वगैरे बोलून झाले अशोक ने सर्वांच्या समोर मला फरफटत बैठकीत आणले, आणि मार मार मारले कोणी देखील मध्ये पडले नाही. शेवटी मी स्टॅम्प पेपर वरती माफीपत्र लिहून दिले. अशोक च्या पायावर डोके ठेवून माफी मागितली पण काही झाले तरी या सगळ्या गोष्टी नंतर अशोकनी माझा स्वीकार केला त्याचे आई-वडील देखील त्याला म्हणत होते की ही असली बायको पुन्हा घरात घेऊ नको .तुला काही दुसरी बायको मिळणार नाही का ?ही पुन्हा पळून गेली तर आणि हिच्यामुळे आपल्या घराण्याला काळीमा लागलाय लोक तुझ्यात पुरुषत्व नाही असे म्हणतील. असे म्हणून देखील त्यांनी माझा स्वीकार केला त्यात माझ्यावरचे प्रेम किती? व जगाला दाखवण्यासाठी मोठेपणा किती? हे त्यांच्या जीवाला माहिती माझे वडील तर डीवोर्स द्या असेच म्हणत होते तुम्ही माझ्या मुलीला रोजच मारझोड करणार असाल किंवा मानसिक त्रास देणार असाल तर तुम्ही आताच घटस्फोट द्या आम्ही तिचे दुसरे लग्न करून देऊ .आता तुम्ही आमच्या समोर तिला एवढे मारत आहे तर तुम्ही नंतर तिचं काय कराल अस माझे वडील म्हणत होते पण मग मात्र मीच अशोक बरोबर राहण्याचा निर्णय घेतला तरी मला माहित होतं की मी हे अग्निदिव्य करतेय तरी मी हे अग्निदिव्य करण्याचं ठरवलं आणि पुन्हा मी माझ्या घरात नांदू लागले केवळ सुमेधा साठी .
अशोक बरोबर पुन्हा संसार करणं म्हणजे रोजच मरण हे मला माहीत होतं आणि मी ते बुद्ध्याच स्वीकारलं होतं. जो माणूस यापूर्वी मी काही न करता माझ्याशी राक्षसासारखा वागत होता. तो आता तरी मला कसा वागवणार माझी काय पत्रास ठेवणार, आणि काय प्रेमाने वागवणार हे मला माहित होते, त्यानंतर मी हि त्याच्या संसारात फक्त मोलकरिण आणि भोगदासीची भूमिका वठवली आयुष्यात कोणत्याच निर्णयात त्याने मला कधी सहभागी केलं नाही बायको म्हणून कधी मानाचं स्थान दिलं नाही मुलांबरोबर गोड गोड वागणारा माझा नवरा रात्रीची मुले झोपली की मला बेडरूमच्या बाहेर आणून मारहाण करत असे दर महिन्याच्या मी पळून गेलेल्या त्या तारखेला तो मला मारहाण करे पाठीवरचे वळ लपवण्यासाठी मी कॉलरचे आणि लांब हातांचे ब्लाउज त्या मुंबईच्या गर्मित देखील घालू लागले . भूक लागलेली असून देखील तो म्हणला तू जेवायचं नाहीस तर मला मुलांसमोर पोट बिघडले म्हणून खोटाखोटा उपवास करावा लागे. कारण काय शेवटी त्याने माझा स्वीकार केला होता ना
दुःखात सुख एवढेच होते की मला सुमेधाच्या पाठीवर मुलगा झाला सुशांत त्याचे नाव ठेवले सुमेधा आणि सुशांत यांच्याशी मात्र ते चांगले वागत ,त्यांच्यापुढे आदर्श बाप बनण्याचा प्रयत्न करत. मात्र त्यांच्या विकृत स्वभावाने मुले मात्र या त्यापासून दूरच रहात असत कुठे होटेलींग करणे, कुठे नाटक सिनेमाला जाणे, यात आमच्याबरोबर तो कधीच नसे मांजर कशी आपली पिल्ले घेऊन सात घरे फिरते तशी मी माझी दोन मुले घेऊन सगळीकडे नातेवाईकांकडे कार्यक्रमाला नाटक-सिनेमाला जात असे हळूहळू मुले मोठी झाली सुमेधा लग्नाची झाली आणि एक दिवस यांनी दोन्ही मुलांना बेडरूममध्ये बोलवले मुले घाबरत घाबरतच बेडरूम मध्ये गेली मी हळूच दरवाज्याला कान लावून उभे राहिले आणि आयुष्यभर मी ज्या गोष्टीला घाबरत आले तीच गोष्ट यांनी केली दोन्ही मुलांना माझा पूर्वइतिहास सांगून मुलांच्या नजरेतून मला उतरवले त्यांनी त्यांची बाजू सांगितली की मी कसा सभ्य पुरुष असून, तुमची आई कशी बदफैली होती .मी तिला कसं मोठ्या मनाने माफ केलं मी तिचा स्वीकार केला व तिला सांभाळले परमेश्वरा आता मी मुलांच्या नजरेला नजर कशी देऊ? ,त्यांच्यापुढे कशी जाऊ ,?अशोकने नाहीतरी मला जीव देण्याशिवाय दुसरा पर्याय ठेवला नव्हता. परमेश्वरा आता मी काय करू ?मी तोंडात बोळा कोंबून मुले पुढे काय प्रतिक्रिया देतात त्या जीवाचे कान करून ऐकत होते तेवढ्यात मुलीचे शब्द कानावर पडले
बाबा
जरी ती लहानपणी मला टाकून गेली असली तरी आम्हाला तसा आठवतंय तसं तिनेच आम्हाला वाढवले ,आमचं बालपण सांभाळले ,आमची दुखणी तिनेच काढली आमच्या शाळेत पेरेंट्स मिटींगला कायमच तीच येत असे आमचे हट्ट आमचे लाडके तिनेच पुरवले. तुम्ही कधीच आमच्या परिघात नव्हतात आमच्या तिघांचेच एक विश्व असायचे .
तुम्ही कधी कुठे फिरायला नेलं, कधी आमच्याबरोबर खरेदीला आलात कधी तुम्ही मिटींगला पालक म्हणून आलात का आम्ही तुमचा फक्त मारच आम्ही पाहिलाय
होय बाबा !आता सुशांत बोलू लागला आईला देखील तुम्ही सतत मारझोड करीत आलात कायमच पाणउतारा केला तिला चार माणसात खाली मान घालायला लावत होतात तिच्या माहेरच्या माणसांना तुम्ही कधी घरी येऊ दिले नाही तिचे वडील वारले तेव्हा तुम्ही तिला माहेरी देखील पाठवले नाहीत सतत तिच्या मनाचा कोंडमारा केलात त्यामुळे तिने जरी काही वेडंवाकडं वागल असलं ,तरी त्याला तुम्हीच कारणीभूत असाल, तिचं गुपित आम्हाला सांगून तुम्ही तिच्याबद्दल आमच्या मनात घृणा निर्माण व्हावी असं केलं परंतु आईबद्दल आम्हाला कधीच तिरस्कार निर्माण होणार नाही बाबा आम्हाला हे आधीच माहीत होतं कोणी तरी नातेवाइकांनी मागेच सांगितलेलं. पण आम्ही तुमच्या वागण्याचं निरीक्षण करीत होतो. दोन्ही मुलं माझ्या मनातील गोष्ट बोलत होते माझ्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या मी धावत जाऊन त्यांना जवळ घेतलं कवटाळलं आम्ही तिघे एकमेकांना मिठ्या मारून उभे होतो आणि रडत होतो व ह स देखील होतो माझ्या मनावरचं मोठं दडपण उतरलं होतं मी आज पर्यंत भोगलेल्या यातना माझे कष्ट या साऱ्याचं आज चीज झालं होतं माझी मुलं माझ्या पासून दुरावणार नव्हती आमच्या त्या परिघात देखील अशोक ला प्रवेश नव्हता आमच्या पासून दूर अंतरावर पराभूत चेहऱ्याने उभा अशोक आयुष्यात पहिल्यांदा मी त्याला पराभूत झाल्याचं बघितलं त्याचा चेहरा पाहून माझ्या मनाला खूप खूप बरं वाटत होतं आणि आमच्या तिघातील प्रेमाचा अंकुर आहे तो कधीच तुटणार नव्हता, करपणार नव्हता,
बीज अंकुरे अंकुरे बांधले प्रेमाच्या धाग्याने माया विश्वासाचे पाणी बिज वाढले जोमाने

सौ ज्योती दीपक गोसावी दु संगे कशिश पार्क स्नेहबंध को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी ठाणे
Pin 400604
7021403689
8692950077

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

ती कमावती होती तर अगदी नवऱ्याकडे राहायची सक्ती का होती....अश्या नवऱ्याला सोडून। देता च आलं असतं..... पळून बिळून पण जायची गरज नव्हती

शीर्षक असं का दिलंय? >>>>> पहिला पॅरा वाचला की कळेल शीर्षक चालून जाईल.
पण कथा मात्र बोअर आहे. आधी 350 वेळा अशा टाईपच्या कथा वाचल्या आहेत. कथा बीज जुने आणि शाली म्हणाले तसे पात्र कन्फ्युजड आहेत.

कथानायिकेला अजिबात सेल्फ़रिस्पेक्ट नाही . खूप चुकीचा संदेश दिला जातोय

कथेचे नाव, त्याचा प्लॉट कशाचा काहीही संबंध नाही. वाक्य एकसलग लिहिलेली, पूर्णविराम नाहीत. कथा बोरिंग वाटली. कमावत्या, स्वावलंबी स्त्रीला थोडाही आत्मसन्मान नसावा?

लेखन चांगले आहे !
काही ठिकाणी पुर्णविराम नसल्यानं वाक्य एकसलग वाटतात.

गोंधळलेली कथानायिका दाखविण्यात मला काही चुकीचं वाटत नाही.
सुमेधा आणि सुशांत गोंधळलेले नाहीयेत.

शिर्षकापाठीमागील कल्पना खूप आवडली. Happy

पुढील लेखनास शुभेच्छा ! Happy

एकदमच टीपीकल.. नाहीच आवडली.

>>>>>अशा पद्धतीने आपला कार्यभाग उरकला व चक्क माझ्याकडे पाठ करून हा माणूस घोरू लागला >>>> १७८३९४३८४७३९८४ व्य्यांदा वाचलेले वाक्य Uhoh

प्रत्येक वाचकाला आपणही काही तरी लिहावं ही इच्छा असते. तुमचा हा पहिलाच प्रयत्न असेल तर ठिक आहे. यापुढे विषय हटके निवडा. आपण लिहिलेले सर्व कुठे ना कुठे वाचनात आले आहे. चांगला लेखक होण्यासाठी अगोदर खूप वाचन करा. मनन चिंतन करण्याची सवय चांगले सृजन करते.

माणूस हा सर्वात स्वार्थी प्राणी आहे. मुलं बापापेक्षा आईला जवळ करतात कारण भावनिक आधार, प्रेम तिच्या कडून मिळालं आहे. इथं आईने मुलांसमोर पतीची माफी मागितली पाहिजे व नवऱ्याला सांगितले पाहिजे चूकीची वागली हे विसरा मुलांसाठी कृपा करून बाप म्हणून तुम्ही आम्हाला हवे आहात. बापाचे प्रेम मिळणे त्यांचा हक्क आहे भले मला काहीही शिक्षा करा.

कथा वाचली नाही. अशोकाचं वर्णन वाचलं.
आमच्या समोरच्या अशोकाच्या झाडात कावळ्यांचं जोडपं घरटं बांधताना दरवर्षी दिसतं.

Mr. Shashiram... Tine mafi ka magavi? Ti stree ahe mhnun ka? Bapala pn swatachi ashi akkal ahe na ... To kuthech chukicha nahi ka??? Tumche vichar nahi aavdle..

तिचा नवरा तिला सोडून दुसऱ्या बाई बरोबर लग्न करून पळाला असता नि तिच्याशी न पटल्याने पहिल्या बायकोकडे परत आला असता तर तीने त्याला लगेच माफ केले असते का? बायको पळून गेली तर समाज नवऱ्याला नामर्द समजतो. पण नवरा पळाला तर बाहेरख्याली.
अशी दुसऱ्या पुरुषाबरोबर राहिलेल्या बायकोबरोबर संसार करण्यात काय इंटरेस्ट राहिला असेल त्याला? इच्छेविरुद्ध रावणाबरोबर गेलेल्या सीतेला रामाने लोकभयाने सोडून दिले. पितामह भीष्मांनी पळवलेल्या अंबा की अंबालिकेला ज्याच्याशी लग्न ठरले होते त्या शाल्व का कुठल्या तरी राजाने लग्नास नकार दिला होता.

उर्मिला आपण असे करुन पहा. मुले देखील माफ करतात का. अज्ञात आपणही आपल्या बायकोला स्वातंत्र्य देऊन पहावं.

Eka stree la kamipana dila ki zal... Jicha udratun yeun he bhashan thoktay na ti aai pn ek streech ahe ... Nirmatyla visrun swtach mat pudhe kru nka

मग माझा प्रतिसाद खोडायचा नाही. तो अधिकार फक्त धागा लेखकाला आहे. तुम्ही त्यांच चूक बरोबर त्यांना सांगायचं. माझी टांग ओढणं एवढं सोपं नाही.

aahet jyanche pati ase ahet Ani tya fkt mulansathi srv sahan krtat... And for your kind information Jr ekdhadi stree sharirvikray krun Jr mulanche pot bhrt asel na tr tya mulana suddha adhikar nahi tila jab vicharaych..

Mg tyach khapar srv streejativr phodaychi garaj nahi ahe

डियर मि. शशिराम
पिसाळलेल्या कुत्र्याच्या तोंडी लागण्यात मला काडीचाही इंटेरेस्ट नाही.
माय वर्ल्ड इज मोर बिगर दॅन मायबोली.
बाय!

Tine mafi ka magavi? Ti stree ahe mhnun ka? Bapala pn swatachi ashi akkal ahe na ... To kuthech chukicha nahi ka??? Tumche vichar nahi aavdle..

Submitted by Urmila Mhatre on 4 April, 2019 - 13:39
Urmila Mhatre +111111

Pages