आजच्या ठळक बातम्या

Submitted by किरणुद्दीन on 31 March, 2019 - 14:34

फेकूदिनाच्या सर्व भारतोयांना हार्दीक शुभेच्छा ! आता पाहूयात आजच्या ठळक बातम्या.

१. पंतप्रधान नरेद्र मोदी राजीनामा देऊन गोरखालॅंडला कायमचे रवाना
२. मुंबईतून उर्मिला मातोंडकर यांच्या विरोधात भाजप ने जॅकी श्रॉफ यांना तर वंचित आघाडीने आमीरखान यांना उमेदवारी दिली. संपूर्ण मुंबईत प्रचाराच्या ऐवजी रंगीलाच्या गाण्यांवर नृत्यांची आतषबाजी
३. मुंबईपासून प्रेरणा घेत कॉंग्रेसकडून पुण्यातून सुरेखा पुणेकर यांना उमेदवारी जाहीर. चौकाचौकातून लावण्यांचे कार्यक्रम होणार.
४. बारामतीचे नाव बदलून शांघाय़ - शरद पवारांची महत्वपूर्ण घोषणा , निवडणूक आयोगाची त्यामुळे ऐन वेळी धावपळ
५. रेशीमबागेत दहीहंडीचा सराव. उपग्रह पाडण्याचा नवीन खेळ शाखेत दाखल
६. जात सोडलेले एक लाख नागरीक जातीअंतासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात दाखल - जाती अंतासाठी एव्हढा योग्य पक्ष कुठलाही नसल्याचे प्रतिपादन
७. लवासा सिटी येथे गरीबांची कायमची मोफत राहण्याची सोय करणार - अजित दादा पवार
८. मा. छगनराव भुजबळ यांच्याकडून नाशिक येथील २०० एकर जमीन भूमिहीनांना दान
९. रोज एकच वेळ जेवणार - नितीन गडकरी यांची सनसनाटी घोषणा
१०. इथून पुढे फक्त सेन्सीबल बोलणार नाही तर बोलणार नाही असा संकल्प ज्येष्ठ कवी रामदास आठवले यांनी सोडला आहे. कै. कुसुमाग्रज यांना मरणोत्तर आठवले पुरस्कार देत असताना एका समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी हिंदकेसरी पै. योगेश बोरावके होते.
११. गल्लीत गोट्या खेळत असताना शिवसैनिकाच्या मुलाने केली चीटींग. किरीट सोमैय्या यांचे लक्ष नसताना गोटी रिंगणाच्या आत ढकलली. हे प्रकरण युनोत नेणार - सोमैय्यांचा इशारा
१२. फडणविसांच्या भाषणाला श्रोत्यांना मोफत कापसाचे बोळे पुरवण्याची मुख्यमंत्र्यांची योजना
१३. अर्णब गोस्वामी यांची रिपब्लिक टीव्हीवर घोषणा - फक्त खरे तेव्हढेच दाखवणार, भाजप नेत्यांकडून मन वळवण्याचे प्रयत्न चालू
१४. मै भी चौकीदार च्या यशानंतर आता मै भी तडीपार ही नवीन मोहीम तेव्हढ्याच जोमाने सुरू.
१५.भिलवारा सूटींग्ज अ‍ॅंड शर्टींगच्या राजेशाही सूटसाठी मॉडेल म्हणून रावसाहेब दानवेंची निवड
१६. कुणाचीही सत्ता आली तरी पंतप्रधान फक्त पवारसाहेबच. सर्वच पक्षांचा निर्धार
१७. विनोदी पोस्टला थम्स अप करणा-या यूझरला भरणार लकवा - मार्क झुकेरबर्ग यांचे महत्वपूर्ण संशोधन
१८. पोस्टमधे दिलेल्या लिंकवर गेल्यास मला काही दिसत नाही अशी पोस्टकर्त्याकडे तक्रार करणा-यांना बोकील पुरस्काराने सन्मानित केले जाणार
१९. सर्व पत्रकारांना आपापल्या पक्षांकडून ओळखपत्रे दिली जाणार. निवडणूक आयोगाचा आदेश.
२०. फेकू डे रोजच साजरा करू देण्यासाठी मीडीयाची मागणी अमित शहांकडून मान्य
२१. मोहन भागवतांकडून इतर सर्व धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी संघातून निवृत्ती घेण्याचे संकेत.
२२. ती मी नव्हेच असा दावा केलेल्या किरणुद्दीन या आयडीमागच्या महिलेला एक्स्पोज केल्याबद्दल संबंधित ख-या खु-या आयडीला मायबोली पत्रकार रत्न म्हणून पुरस्काराची घोषणा

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Proud

महाराष्ट्रातील तमाम मराठी जनतेला न्याय देण्यासाठी, २००७ साली मोठा गाजावाजा करुन स्थापन केलेला 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' नावाच्या पक्षाला येत्या गुडीपाडव्याच्या दिवशी स्वत: श्री राज ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस मधे विलय करणार आहेत. यावेळी स्टेजवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा श्री शरदचंद्रजी पवार साहेब उपस्थित असणार आहेत.

राहूल गांधी पंतप्रधान बनल्यावर जुन्या पाचशे व हजारच्या नोटा पुन्हा चलनात आणणार.