Submitted by Ashwini_९९९ on 29 March, 2019 - 06:56
माझ्या मावस सासूबाईंच्या पूर्ण अंगाला गेल्या 1।५ -२ वर्षांपासून खूप खाज सुटत आहे
बऱ्याच डॉक्टरांना दाखवून झालं पण काही फरक पडत नाहीये
खूप टेस्ट पण करून झाल्या पण काही डायग्नोसिस होत नाहीये
काही उपाय आहे का ?
घरगुती ,आयुर्वेदिक ?,किंवा कोणी पुण्यामुंबईतले चांगले डॉकटर?
त्या कर्जत ला राहतात
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सासुबाईंच्या रक्तात लोहाचे
सासुबाईंच्या रक्तात लोहाचे/कॅल्शियमचे प्रमाण जास्त आहे का हे एकदा चेक करा.. असेल तर लोह्/कॅल्शियम असणारा आहार कमीतकमी ठेवल्यास खाज बंद होईल. माझ्या काकीला सेम असेच झाले होते तेव्हा हे निदान झाले. आहारात बदल केल्यावर नंतर खाज बंद झाली. परंतु हे सर्व डॉक्टरी सल्ल्याने करा. शक्यतो घरचा/ओळखीतला/निमशहरी-ग्रामीण भागातला डॉक्टर शोधा.
धन्यवाद . सांगते त्यांना
धन्यवाद . सांगते त्यांना
आधी केलिये का ही टेस्ट विचारते
डॉ ना दाखवुन नवीन टेस्ट
डॉ ना दाखवुन नवीन टेस्ट करेपर्यंत त्यांच्या नेहेमीच्या जेवणात अळु, सुरण, सिमला मिर्ची, वांगे, गवार या भाज्या वर्ज्य करा.
पुण्यात आयुर्वेदीक डॉ हरीश पाटणकर आहेत. तसेच खडीवाले वैद्यांकडे दाखवा. स्वतः खडीवाले वैद्य तर आता नाहीयेत, पण मुले असतीलच.
आठवड्यातुन एकदा त्यांना रात्री कोमट दुधात १ चमचा भर एरंडेल तेल घालुन ते प्यायला सांगा. पोट साफ झाले तर बर्याच व्याधी कमी होतात.
धन्यवाद रश्मी
धन्यवाद रश्मी
त्यांनी आधीपासून ह्या भाज्या खाणं बंद केलं आहे .
डॉक्टर पाटणकरांचा पत्ता असेल तर द्याल का ?
अॅलर्जी टेस्टींग केले का?
अॅलर्जी टेस्टींग केले का?
कपडे धुवायचा साबण, आंघोळीचा साबण, वापरत असतील तर बॉडी क्रिम्स इ.
खाण्यामधे २ आठवडे एखादा ग्रुप वगळून बघा, उदा. - दूधाचे पदार्थ, ग्ल्युटेन असलेले, अॅसिडिक, प्रिजर्वेटिव्ह्स असलेले इ.
असे करून माझ्या मुलाची अॅलर्जी शोधली होती. त्याला खाज सुटायची आणि काही ठिकाणी बारीक पुरळ यायचे.
धन्यवाद chioo
धन्यवाद chioo
अॅलर्जी टेस्ट केली आहे . नाही कशाची अॅलर्जी.
डॉ. हरीश पाटणकर, भावे स्कुल
डॉ. हरीश पाटणकर, भावे स्कुल पुढे , पेरुगेटजवळ, पोलीसचौकी पुढे सदाशीवपेठ - पुणे. भावेस्कूलजवळ कॉर्नरची जी पोलीस चौकी आहे, तिथुन डाव्या हाताला डॉमीनोजकडे जायचे. त्याच्या समोरच आहे. थोड्या वेळाने फो नं टाकते.
thank you rashmi
thank you rashmi
डॉ हरीश पाटणकर :- फोन नं -
डॉ हरीश पाटणकर :- फोन नं - ०२०-२४४८१६९९
बऱ्याच डॉक्टरांना दाखवून झालं
बऱ्याच डॉक्टरांना दाखवून झालं पण काही फरक पडत नाहीये
<<
नक्की कुणाला अन काय दाखवलं? कोणत्या तपासण्या केल्या?
मध्यतंरी माझ्या मुलाला पण
मध्यतंरी माझ्या मुलाला पण अंगाला खाज सुटायचा त्रास झालेला. गवारची अॅलर्जी निघाली. मी घरच्या घरीच शोध घेतलेला
विनिता, गवारीची भाजी आवडत
विनिता, गवारीची भाजी आवडत होती की नव्हती, हा पण शोध घ्या.
पण हो, बऱ्याचदा बाहेर टेस्टस न करताही आपल्या आपण ऍलर्जी असल्या तर कळतात.
विनिता, थायराॅइड फंशन टेस्ट
अश्विनी, थायराॅइड फंशन टेस्ट झालिये का?
गवारीची भाजी आवडत होती की
गवारीची भाजी आवडत होती की नव्हती, हा पण शोध घ्या >> गवार आम्हां दोघांची आवडती भाजी....पण आता नाही करत
बऱ्याचदा बाहेर टेस्टस न करताही आपल्या आपण ऍलर्जी असल्या तर कळतात. >> हो. लक्ष ठेवावे लागते की काय केले किंवा खाल्ले की त्रास होतो ते
वर बरेचजणांनी लिहिले आहेच
वर बरेचजणांनी लिहिले आहेच.खदिरारिष्ट घेऊन पहा....वैद्यनाथचे असावे बहुदा.डॉक्टरी सल्ला घ्याच.
पुण्यात अहिरराव म्हणुन
पुण्यात अहिरराव म्हणुन आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. त्यांना काहीही सांगायचे नाही. नाडी परीक्षा करुन आजार ओळखतात. आपला आजार त्यांनी सांगितलेला असेल तर उपचार घ्यायचे.