ट्रोल

Submitted by शशिराम on 22 March, 2019 - 04:08

माझ्या प्रिय व अप्रिय मायबोली करांनो जसजसे २०१९ लोकसभा निवडणुक जवळ येत चालली आहे तसे आपल्या मधील काही लोक्स इथे वातावरण तापवून इतरांची खेचू पहात आहेत.
यामध्ये प्रस्थापित, वंचित व इतर अपक्ष असे काही जातीचा अभिमान असणारे आयडी धुमाकूळ घालत आहेत. मराठी मायबोली च्या सेवेसाठी साहित्यपुर्ण, आनंदी, माहिती पुर्ण, नाविन्यपूर्ण , मनोरंजन सर्वांना आवडणारे लिखाण इथे असावे हीच केवळ माझी अपेक्षा आहे.
आता यावर समाधान म्हणजे माबोवरील प्रत्येक आयडीचे आधार कार्ड लिंक करावे व ज्यातून सदस्याची जात स्पष्टपणे कळेल असा ठोस पुरावा इथे जोडणं बंधनकारक करण्यात यावे.
मी खात्रीने सांगतो उगाचच बाष्कळ व वाईट गोष्टी इथे घडणारच नाही.
ता. क. मला स्वत:ला कुणी उगाच विरोध केलेला आवडत नाही. धन्यवाद.

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

शशिराम भाऊ, मी खात्रीने सांगतो आधार कार्ड आणि जात यामुळे बाष्कळ व वाईट गोष्टी इथे आणखी गडद होतील.

शशांक भाई ९९ टक्के भारतीय जातीत अडकलेले असतात, जात व्यवहारातून गेली पण मनात पक्की आहे. देश हा केवळ छुप्या जातीय संघर्षात होरपळलेला आहे. सुडाच्या मानसिकतेचे लोक ह्या देशाचे कसे शकले होतील याचीच वाट बघत आहेत. जात जोडली तर प्रतिसाद कसे व्यवस्थित व साळसूद असतील बघा.