Angiogram आणि angioplasty पुण्यातील चांगला डॉक्टर सुचवा.

Submitted by rakhee_siji on 18 March, 2019 - 09:16

नमस्कार मंडळी, माझ्या वडिलांसाठी पुण्यातील चांगला डॉक्टर
Angiogram आणि angioplasty साठी सुचवा. याआधी पण मायबोलीकरांनी खूप मदत केली आहे. धन्यवाद.

Group content visibility: 
Use group defaults

Dr हिरेमठ, रुबी हॉल क्लीनिक ,
2 भाऊ आहे दोघेही चांगले आहेत
पण अपॉइंटमेंट मिळायला वेळ लागू शकतो

Dr सुनील साठे कमला नेहरू पार्क समोर

Dr. हरदास.

प्राक्टो हे अ‍ॅप बघा. सर्व डॉक्ट र शोधता येतात. पण त्यांचे नेहमीचे फिजिशिअन असतील त्यांनी कोन सजेस्ट केले आहे? ओळखीचे विश्वासातले ( त्यांच्या) कोणी आहेत का डॉक्टर स्पेशालिस्ट? कोणी सुचवली आहेत ह्या दोन प्रोसीजर.

Dr.Rajesh Dhopeshwarkar आहेत. उत्तम डॉक्टर आहेत. क्लिनीकही आहे व दिनानाथला प्रॅक्टिसही करतात. माझ्या वडीलांची अँजिओप्लास्टी त्यांनीच केली आहे. तीन वर्षात काही त्रास नाही. मी रेकमेंड करेन.

अमा, वडिलांनी त्यांच्या नेहमीच्या डॉक्टरांना दाखविले. त्यांनी स्ट्रेस टेस्ट केल्यावर Angiogram करायला सांगितले आहे. ते म्हणाले तुमचा ओळखीतील डॉक्टर बघा. आम्हाला असे कुणी माहित नाही म्हणून हि पोस्ट. धन्यवाद

रणजीत जगताप. He has OPD in Pune. Also he is attached to DMH and Jahangir I think. He is the best >>>>>>. He truly is the best. माझ्या बाबाची बायपास यांनीच केली.

फक्त एक आहे की मला यांच्याच तब्येतीची काळजी वाटते. सकाळी 6 वाजता क्लिनिकमध्ये हजर असणाऱ्या माणसाचा दिवस कधी सुरू होत असेल? त्यानंतर हॉस्पिटलमध्ये जाऊन जेवढ्या number of surgeries करतात ते एक रेकॉर्ड म्हणावं लागेल. मग राउंडस आणी इतर रुटीन असणार. केवढी एनर्जी केवढा स्टॅमिना. आणि तरीही शांत आणि no attitude. Hats off to the man

जगताप डाॅ सर्जन अहेत ना? कार्डीओलाॅजिस्ट वेगळे असतात ना? म्हणजे ऑपरेशन करावे का नाही वगैरे सांगणारे? सर्जन फक्त सर्जरी करतात ना?

कार्डीओलाॅजिस्ट वेगळे असतात ना? म्हणजे ऑपरेशन करावे का नाही वगैरे सांगणारे? सर्जन फक्त सर्जरी करतात ना? >>>> बरोबर. डॉ. जगदीश हिरेमठ ह्यांच्या रुबी हॉल च्या नंबरवर कॉल करा. तुम्ही अर्जंसी आहे सांगितलं तर मिळेल लगेच अपॉईंटमेंट. पुढे सर्जरीची वेळ आली तर डॉ. जगताप ह्यांचा ओपिनियन घेता येईल.

Dr.Rajesh Dhopeshwarkar आहेत. उत्तम डॉक्टर आहेत. क्लिनीकही आहे व दिनानाथला प्रॅक्टिसही करतात >> +१
नुकतेच माझ्या साबांची प्लास्टी यांनी केली..अतिशय उत्तम अनुभव

डॉ राजेशचे नाव लिहावे की नाही या संभ्रमात होतो. पण एनडोर्समेन्ट मिळाल्याने लिहितोय.
दोन फॅमिली फ्रेंड्सच्या बाबतीत एकदम स्पृहणीय अनुभव.
त्या काकांना त्यांच्या नियमित तपासणीत त्यांच्या कार्डिऑलोजिस्टने बायपास सर्जरीच करावी लागेल असे सांगितले.
अजून दुसर्‍या काकूंना डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठीच्या पूर्वतपासणीदरम्यान हृदयाची स्थिती गंभीर असून तातडीने हृदयशस्त्रक्रिया करा असा सल्ला दिला गेला.
दोन्ही रुग्णासाठी डॉ राजेशचे सेकंड ओपिनिअन घेतले. त्याने योग्य सल्ला दिला. दोन्हीही रुग्ण आता व्यवस्थित आहेत.
वैयक्तिक माझ्या बाबतीतही रात्री बारा वाजता फोन केला तेव्हा लगेचच फोनला उत्तर दिल्रे. आणि लगेच दीनानाथला अ‍ॅडमीट हो म्हणून सांगितले. दुसर्‍या दिवशी सकाळी, त्या दिवशी धोपेश्वरकर मावशींची डोळ्यांची शस्त्राक्रिया नियोजित असूनही मला तपासून मगच तिकडे गेला.

मी डॉ राजेशना रेकमेंड करतो.

डॉ राजेश चा उल्लेख एकवचनात लिहिल्याबद्दल क्षमस्व. आधी आदरार्थी बहुवचनात लिहिले होते. पण वाचताना फारच अवघडल्यासारखं होऊ लागलं म्हणून पुन्हा एकवचनात गेलो.

त्याच्याबरोबर विट्टीदांडू, कॅरम , पत्ते गोट्या खेळल्याचा परिणाम. दुसरं काय. Wink Wink

@केशव तुलसी @स्मिता श्रीपाद

तुमची हरकत नसल्यास तुमचे प्रतिसाद राजेशला फॉरवर्ड करीन म्हणतो.

डॉ अनिल काटदरे, प्रभात रस्ता.

यांच्याकडून कुठल्याही प्रकारचे ऑपरेशन करवून घेण्याचा अनुभव नाही. Happy

आम्ही यांच्याकडे दुसरे मत / सल्ला घेण्यासाठी गेलो होतो.
त्यांनी माझ्या वडिलांना, तपासणी आणि उलट तपासणी पश्चात, ( दिनानाथ मधे केलेल्या अँजिओग्राफीत ब्लॉकेज दिसत असतानाही ) ऑपरेशन / अँजिओप्लॅस्टीची गरज नाही असा सल्ला दिला होता. आम्ही जरा धाकधुक असतानाही तो अंमलात आणला आणि नो रिग्रेट्स अ‍ॅट ऑल.

सल्ला दिला ते वर्ष होते २००४. माझे बाबा गेले त्याला अजून वर्ष व्हायचंय पण जाईतोवर त्यांना हृदयासंदर्भात कसलाही त्रास झाला नाही. फक्त (बहुतेक रक्त पातळ होण्यासाठी असते ती ) एक गोळी चालू होती. सुरुवातीस दर महिना आणि नंतर इतक्यात दर सहा महिन्यांनी तपासणी
नियमितपणे चालू होती. दरम्यान त्यांचा दोनदा परदेश प्रवासही झाला.

डॉ. जगदीश हिरेमठ यांची अपॉईण्टमेण्ट घ्या. अ‍ॅण्जिओप्लास्टी डॉ. रणजित जगताप करतात. जहांगीरला सुद्धा चांगली सोय आहे. तसेच बाजूच्याच एन एम वाडीया हॉस्पिटलला दाखवले तरी चालेल.
लांब पडत असेल तर दीनानाथ मंगेशकरला दाखवा.

आम्ही भावंडे 19-20 वर्षांचे असताना वडिलांना पहिला हार्ट अॅटॅक आला. नंतरच्या 2 वर्षांत त्यांना अजून दोन अॅटॅक्स आले. आमच्या घरात वडील एकटेच कमावणारे होते आणि तेच ICU मधे 72 तासांच्या मुदतीवर होते. त्यावेळी आमची महत्वाची व खर्चिक शिक्षणे चालू होती. बाबांची तब्येत रोज वरखाली होत होती. आई गांगरून गेली होती आणि खचली होती. आम्ही भावंडं आळीपाळीनं ICU तच असायचो. तिथंच अभ्यास करायचो, रहायचो व तिथूनच परिक्षेलाही जायचो. वडिलांची परिस्थिती गंभीर असेल तेव्हा डाॅक्टरांचा चेहरा गंभीर असायचा व ते तुटक बोलायचे पण बरं असेल तर हसत हसत काळजी करू नका असं सांगायचे. त्यांचा प्रसन्न चेहरा पाहीला की आम्हाला हुरुप यायचा आणि भिती नाही वाटायची. त्यांना भेटता यावं म्हणून मी व माझा भाऊ त्यांच्या भेटायच्या वेळेस आळीपाळीनं थांबायचो. राउंडच्या वेळी तिथं असण्यासाठी धडपडायचो. डाॅ. खूप मायेनं वागायचे आमच्याशी. गप्पाही मारायचे. बाबा बरे होतील असं त्यांनी सांगितलं की आम्ही निर्धास्तपणे परिक्षेला जायचो. त्यांच्या औषधोपचारांमुळे, वडीलांनी सांभाळलेलं पथ्य आणि व्यायाम आणि देवाची कृपा ह्या सर्वांमुळे आज त्यानंतरही 30 वर्षे वडील चांगले आयुष्य जगत आहेत. 20 वर्षांपूर्वी पेसमेकर बसवला होता त्याची एकदा बॅटरी बदलली व नंतर दुसरा नवा पेसमेकर बसवला. ....ह्या सर्वामुळेच काटदरे डाॅक्टरांचं स्थान देवाच्या बरोबरीनं आमच्या सर्वांच्या मनात आहे.

धन्यवाद मेधावी, तुमचा अनुभव वाचून खरंच धीर आला. माझ्या वडिलांना मी कधीच आजारी पहिले नाही. पण हे ऐकल्यावर जरा काळजी वाटत होती. सॉरी उशिरा प्रतिसाद देत आहे.